Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > गुडघ्यापर्यंत वाढतील केस! रोज खा फक्त १ 'मॅजिकल लाडू', महिन्याभरात केस होतील जाडजूड -पांढरे केस होतील काळे

गुडघ्यापर्यंत वाढतील केस! रोज खा फक्त १ 'मॅजिकल लाडू', महिन्याभरात केस होतील जाडजूड -पांढरे केस होतील काळे

Hair Growth Laddu: Natural Hair Regrowth: Homemade Protein Bars for Hair: आपल्यालाही केसांच्या अनेक समस्यांपासून सुटका हवी असेल तर हा मॅजिकल हेअर ग्रोथ लाडू आपल्यासाठी वरदान ठरेल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2026 16:55 IST2026-03-27T16:26:00+5:302026-03-27T16:55:42+5:30

Hair Growth Laddu: Natural Hair Regrowth: Homemade Protein Bars for Hair: आपल्यालाही केसांच्या अनेक समस्यांपासून सुटका हवी असेल तर हा मॅजिकल हेअर ग्रोथ लाडू आपल्यासाठी वरदान ठरेल.

How to grow hair faster with seeds Best seeds for thick and long hair Moringa powder benefits for hair growth Natural remedy for premature white hair Flaxseeds and Walnut laddu for hair | गुडघ्यापर्यंत वाढतील केस! रोज खा फक्त १ 'मॅजिकल लाडू', महिन्याभरात केस होतील जाडजूड -पांढरे केस होतील काळे

गुडघ्यापर्यंत वाढतील केस! रोज खा फक्त १ 'मॅजिकल लाडू', महिन्याभरात केस होतील जाडजूड -पांढरे केस होतील काळे

लांब केस हे आपल्या सौंदर्यात अधिक भर घालतात. लांबसडक, काळेभोर आणि दाट केस ही केवळ सौंदर्याची खूण नसून ते आपल्या आतील आरोग्याचे प्रतिबिंब असते.(Hair Growth Laddu) सध्याच्या धावपळीच्या जगात व्यवस्थित खाणंपिण नसेल, अतिरिक्त ताण, प्रदूषण आणि पोषणाच्या कमतरतेमुळे केसांवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे कमी वयात केस गळणं, पांढरं होणे आणि विरळ होण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.(Natural Hair Regrowth) आपण केसांना महागडे शाम्पू, तेल किंवा हेअर ट्रिटमेंट्स घेतो. यामुळे केसांचे जास्त प्रमाणात नुकसान होते. केसांच्या आरोग्यासाठी बायोटिन, ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स आणि प्रथिनांची गरज असते. (Homemade Protein Bars for Hair)
आपल्यालाही केसांच्या अनेक समस्यांपासून सुटका हवी असेल तर हा मॅजिकल हेअर ग्रोथ लाडू आपल्यासाठी वरदान ठरेल. यामध्ये असणारे घटक केसांना पुरेसे पोषण देतात, ज्यामुळे केसांची वाढ व्यवस्थित होईल.(Stop Hair Fall Naturally) इतकंच नाही रोज एक लाडू खाल्ल्याने महिन्याभरात आपल्याला केसांच्या गुणवत्तेत फरक पाहायला मिळेल. हा लाडू फक्त केसांसाठीच नाही तर हाडांच्या मजबूतीसाठी आणि रोगप्रतिकारशक्तीसाठीही तितकाच प्रभावी आहे. (Ayurvedic Hair Nutrition)

७ दिवसांत 'डबल चिन' होईल गायब! १० मिनिटं करा 'हे' फेस योगा- जिमशिवाय मिळेल परफेक्ट 'जॉलाईन'- दिसाल तरुण

लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य 

भोपळ्याच्या बिया - १ कप 
खरबूजाच्या बिया - १ कप 
काळे तीळ - १ कप
अळशी - १ कप 
अक्रोड - १ कप
शेवग्याच्या पानांची पावडर - १/२ कप 
खजूर - १२ ते १५
गूळ पावडर - १ कप 
साजूक तूप - ५ ते ६ मोठे चमचे

कृती 

1. सगळ्यात आधी बिया आणि अक्रोड मंद आचेवर हलके भाजून घ्या. ज्यामुळे त्यातील ओलावा निघून जाईल. भाजलेले सर्व साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये घालून त्याची बारीक पावडर तयार करा. 

2. या पावडरमध्ये शेवग्याच्या पानांची पावडर मिसळा. नंतर बिया काढलेले खजूर आणि गूळ पावडर घालून पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्या. ज्यामुळे सर्व घटक एकजीव होतील. हे मिश्रण एका परातीत काढून घ्या. आवश्यकतेनुसार तूप घालून त्याचे छोटे छोटे लाडू वळून घ्या. 


फायदे

अळशी आणि अक्रोडमधील ओमेगा-३ मुळे केसांची मुळे घट्ट होतात. भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक असते. जे नवीन केस येण्यास मदत करते. तीळ आणि शेवग्यातील पोषक तत्वे केसांमधील मेलॅनिन टिकवून ठेवते. ज्यामुळे अकाली पांढरे होणारे केस कमी होण्यास मदत होईल. 

 


Web Title : बालों के विकास के लिए जादुई लड्डू: पाएं घने, लंबे और काले बाल!

Web Summary : इस पौष्टिक लड्डू से बालों का झड़ना और सफ़ेद होना रोकें। बीज, नट्स और जड़ी-बूटियों से भरपूर, यह बालों को अंदर से पोषण देता है, विकास, शक्ति और प्राकृतिक रंग को बढ़ावा देता है, साथ ही प्रतिरक्षा और हड्डियों के स्वास्थ्य को भी बढ़ाता है।

Web Title : Magical Laddu for Hair Growth: Thick, Long, and Black Hair!

Web Summary : Combat hair fall and graying with this nutrient-rich laddu. Packed with seeds, nuts, and herbs, it nourishes hair from within, promoting growth, strength, and natural color while boosting immunity and bone health.