केसांकडे पुरेसं लक्ष देण्यासाठी हल्ली बऱ्याच जणींकडे वेळ नसतो. रोजचीच कामं उरकता उरकत नाहीत तिथे केसांकडे कुठे लक्ष द्यावं असं त्याचं म्हणणं असतं. आणि अर्थातच ते अगदी बरोबर आहे, कारण प्रत्येकीच्याच मागचा कामाचा व्याप खूप वाढला आहे. पण जर केसांकडे नेहमीच अशा पद्धतीने दुर्लक्ष होत गेलं तर ते खूप खराब होतात. चिकट, रुक्ष, कोरडे दिसू लागतात. अगदी निर्जीव असल्यासारखे भासतात आणि आपल्यालाच आपले केस अगदी आवडेनासे होतात (home made hair mask for smooth and shiny hair). म्हणूनच अशा केसांवर हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा (how to get rid of frizzy hair?). यामुळे तुमचे केस मऊ, सिल्की, चमकदार होण्यास नक्कीच मदत होईल.(home made hair mask for reducing hair fall)
केस मऊ, सिल्की, चमकदार होण्यासाठी उपाय
केस चमकदार होण्यासाठी तसेच त्यांचे गळणे कमी होण्यासाठी काय उपाय करावा याविषयीची माहिती comfymeal या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
Gudhi Padva 2025: गुढीसमोर कैरी ठेवण्याला एवढं महत्त्व का? बघा कैरी खाण्याचे ५ फायदे
यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की १ ग्लास पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये २ चमचे जवस आणि २ चमचे तांदळाचे पीठ घाला. सगळं व्यवस्थित कालवून घेतल्यानंतर हे मिश्रण गॅसवर उकळायला ठेवा.
१० ते १२ मिनिटे हे मिश्रण चांगले उकळू द्या. त्यानंतर ते थोडे घट्ट झाले की गॅस बंद करा. आता हे मिश्रण थोडेसे कोमट होऊ द्या. त्यानंतर ते एका गाळण्याने गाळून घ्या.
गाळून घेतलेले मिश्रण म्हणजेच तुमच्या केसांना स्मूथ आणि सिल्की करणारा हेअरमास्क होय. हा हेअरमास्क केसांच्या मुळापासून ते लांबीपर्यंत व्यवस्थित लावा. त्यानंतर २ तास तो तुमच्या केसांवर तसाच ठेवा आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे शाम्पू करून केस धुवून टाका.
घरातली धूळ होईल गायब आणि फर्निचर दिसेल चकाचक! करून बघा १ सोपा उपाय
हा उपाय केल्यानंतर केस अतिशय मऊ आणि सिल्की झाल्यासारखे जाणवतील आणि शिवाय त्यांचं गळणंही बऱ्याच प्रमाणात कमी होईल. केसांवर चांगला परिणाम दिसून येण्यासाठी आठवड्यातून एकदा हा उपाय करायला हवा असं सुचविण्यात आलं आहे.