बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका आपल्या आरोग्यासह केसांवर होतो. महागडे शाम्पू, कंडिशनर आणि पार्लरमधील महागड्या हेअर स्पा ट्रीटमेंट करुनही अनेकदा केसांचा पोत सुधारण्याऐवजी ते अधिकच खराब होतो. (Hair Care Tips)यामुळे आपले केस झाडूंसारखे कोरडे आणि निर्जीव होतात.(Best homemade hair mask for shine) महागड्या पार्लर ट्रिटमेंटसाठी हजारो रुपये मोजणं प्रत्येकाला परवडत नाही. तसेच त्यात असणारे केमिकल्स काही काळानंतर केसांचे नुकसान देखील करतात. (How to treat rough hair naturally)
आपल्या स्वयंपाकघरात अशा काही गोष्टी आहे ज्याचा वापर करुन आपण १० रुपयांत पार्लरसारखे सिल्की आणि मऊ केस मिळवू शकतो. या घरगुती हेअर स्पाच्या मदतीने आपले कोरडे, गुंता झालेले केस अवघ्या काही मिनिटांत रेशमासारखे मऊ आणि चमकदार होऊ शकतात. (How to treat rough hair naturally)
केस गळणे, फाटे फुटणे आणि कोरडेपणा या समस्यांवर मात करण्यासाठी दही आणि मधाचा सगळ्यात जुना आणि प्रभावी उपाय आहे. पार्लरमध्ये हजारो रुपये खर्च करण्याऐवजी हा घरगुती प्रोटीन पॅक केसांना नैसर्गिक चमक देतो. हा मास्क बनवण्यासाठी आपल्याला १ वाटी ताजे दही आणि २ मोठे चमचे मध घ्यावे लागेल. एका बाऊलमध्ये दही घेऊन ते नीट फेटून घ्या. त्यात मध मिसळा आणि दोन्ही घटक एकजीव होईपर्यंत हलवत राहा. जर आपले केस खूप कोरडे असतील तर यात अर्धा चमचा खोबऱ्याचे तेल किंवा बदाम तेल घालू शकता.
सगळ्यात आधी केस विंचरुन त्यातील गुंता काढून घ्या. केसांचे छोटे छोटे भाग करा. हा मास्क मुळांपासून टोकापर्यंत नीट लावा. टाळूवर हलक्या हाताने ५ मिनिटे मसाज करा, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होईल. मास्क लावल्यानंतर ३० ते ४० मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने आणि सौम्य शाम्पू लावून केस धुवा. केस धुताना जास्त गरम पाण्याचा वापर करु नका. यामुळे केस अधिक कोरडे होतात.
दही हे आपल्या केसांना नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करते. यात असणारे लॅक्टिक अॅसिड केसांवरील घाण साफ करते आणि केसांना मऊपणा देण्याचे काम करते. तर मध हे नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. ते हवेतील ओलावा शोषून केसांना हायड्रेट ठेवते, ज्यामुळे केस सिल्की आणि शायनी होतात.
