Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > महागड्या पार्लरची गरज नाही! मेहेंदी कालवताना घाला ५ गोष्टी, आजीचा खास उपाय, केसांना मिळेल सुंदर लाल- बर्गंडी रंग..

महागड्या पार्लरची गरज नाही! मेहेंदी कालवताना घाला ५ गोष्टी, आजीचा खास उपाय, केसांना मिळेल सुंदर लाल- बर्गंडी रंग..

Mehndi for hair: Natural hair color: Homemade mehndi : केसांना मेहेंदी लावण्यापूर्वी त्यात काही खास घटक मिसळल्यास आपल्या केसांना नैसर्गिक रंग मिळेल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2025 17:17 IST2025-12-29T17:07:25+5:302025-12-29T17:17:52+5:30

Mehndi for hair: Natural hair color: Homemade mehndi : केसांना मेहेंदी लावण्यापूर्वी त्यात काही खास घटक मिसळल्यास आपल्या केसांना नैसर्गिक रंग मिळेल.

how to get red burgundy hair color with mehndi at home natural mehndi recipe for deep red hair color homemade henna mix for burgundy hair shade ayurvedic hair color without chemicals | महागड्या पार्लरची गरज नाही! मेहेंदी कालवताना घाला ५ गोष्टी, आजीचा खास उपाय, केसांना मिळेल सुंदर लाल- बर्गंडी रंग..

महागड्या पार्लरची गरज नाही! मेहेंदी कालवताना घाला ५ गोष्टी, आजीचा खास उपाय, केसांना मिळेल सुंदर लाल- बर्गंडी रंग..

सध्या केसांची काळजी घेण्यासाठी आपण हजारो रुपये खर्च करुन पार्लरमध्ये जातो. केमिकलयुक्त हेअर कलर स्ट्रेटनिंग, स्मूदनिंग यामुळे केस क्षणभर का होईना सुंदर दिसतात पण काही काळाने केसगळती, कोरडेपणा, तुटणे किंवा अकाली पांढरे होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते.(Mehndi for hair) अशावेळी पुन्हा आपण आई-आजीच्या खास उपायांकडे जातो. त्यातीलच एक मेहेंदीचा पर्याय. (Natural hair color)
पांढऱ्या केसांची समस्या असणारे अनेक लोक केसांना नवा आकर्षक लूक देण्यासाठी अनेकजण हेअर कलर किंवा डाय लावतात.(Homemade mehndi) बाजारात मिळणारे हे रंग केसांना कलर तर करतात पण त्वचेसाठी धोकादायक ठरु शकतात. यामुळे आपले केस कोरडे होणे, तुटणे किंवा अॅलर्जीसारख्या समस्या देखील वाढतात. जर आपल्यालाही केसांना रंगवायचे असेल तर रासायनिक रंगाचा वापर टाळा. केसांना मेहेंदी लावण्यापूर्वी त्यात काही खास घटक मिसळल्यास आपल्या केसांना नैसर्गिक रंग मिळेल. 

घटस्फोट झाला, नातं संपलं, तरी 'रेहना हे तेरे दिल मै, किरण रावच्या मनात अजूनही नाव आमिरच...

मेहेंदी कालवताना आपण अनेकदा त्यात चहा पावडर, ग्रीन टी, मेथी दाणे असे काही पदार्थ घालतो. ज्यामुळे मेहेंदीला नैसर्गिक लाल गडद रंग येतो. पण या सगळ्यासोबतच एक जादुई पदार्थ मेहेंदीमध्ये मिसळल्यास केसांना खोलवर पोषण मिळते. तसेच केसांना हवा तसा लाल किंवा बर्गंडी रंग देता येतो. पाहूया मेहेंदी भिजवताना कोणत्या गोष्टी त्यात घालायला हव्या. 

मेहेंदी भिजवताना त्यात दोन चमचे जास्वंदीची पावडर, एक चमचा मेथी दाणे, चार कढीपत्त्याची पाने, एक कोरफडीचे पान, एक चमचा रोझमेरी, एक बीटरुट लागेल. मेहेंदी कालवण्यासाठी आपल्याला ओरिजनल मेहेंदी घ्यावी लागेल. सगळ्यात आधी एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात कढीपत्ता, मेथी दाणे आणि रोझमेरी घाला. पाणी अर्धे झाल्यानंतर गाळून घ्या. 

आता मिक्सरच्या भांड्यात कोरफडीचा गर, उकळवलेले सर्व साहित्य घालून त्याची पेस्ट तयार करा. यानंतर मिक्सरमध्ये बीटरुट वाटून त्याची देखील पेस्ट तयार करा. काळ्या कढईमध्ये मेहेंदी घेऊन त्यात जास्वंदीचा पावडर, तयार पेस्ट, गाळून घेतलेले पाणी आणि बीटाचा रस घालून सर्व साहित्य एकजीव करा. मेहेंदी किमान ३ तास व्यवस्थित भिजू द्या. 

३ तासानंतर मेहेंदीची पेस्ट केसांना ब्रशने किंवा हाताने लावा. २ ते ३ तासानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे केसांना नैसर्गिक रंगदेखील मिळेल. आणि केसांना हानी देखील पोहोचणार नाही.


Web Title : प्राकृतिक बालों का रंग: सैलून छोड़ें, इन 5 मेहंदी सामग्री का प्रयोग करें!

Web Summary : महंगे सैलून छोड़ें! सुंदर, क्षति-मुक्त, लाल-बरगंडी बालों के लिए अपनी मेहंदी में हिबिस्कस, मेथी, करी पत्ता, एलोवेरा, रोजमेरी और चुकंदर जैसे प्राकृतिक तत्वों का प्रयोग करें।

Web Title : Natural Hair Color: Ditch the Salon, Use These 5 Mehndi Ingredients!

Web Summary : Skip expensive salons! Use natural ingredients like hibiscus, fenugreek, curry leaves, aloe vera, rosemary, and beetroot in your mehndi for beautiful, damage-free, red-burgundy hair.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.