Lokmat Sakhi >Beauty > मेहेंदीमुळे केशरी, लालसर रंगलेले केस आवडत नाही? मेहेंदीमध्ये 'हा' पदार्थ मिसळा- केसांना नॅचरल रंग येईल

मेहेंदीमुळे केशरी, लालसर रंगलेले केस आवडत नाही? मेहेंदीमध्ये 'हा' पदार्थ मिसळा- केसांना नॅचरल रंग येईल

Natural Remedy to Reverse Grey Hair Without Chemicals: मेहेंदी लावल्यानंतर केसांना येणारा केशरी, लालसर रंग आवडत नसेल तर आता यापुढे मेहेंदी लावताना पुढे सांगितलेल्या काही गोष्टी करून पाहा..(how to apply heena or mehendi on hair?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2025 17:59 IST2025-09-10T17:58:08+5:302025-09-10T17:59:44+5:30

Natural Remedy to Reverse Grey Hair Without Chemicals: मेहेंदी लावल्यानंतर केसांना येणारा केशरी, लालसर रंग आवडत नसेल तर आता यापुढे मेहेंदी लावताना पुढे सांगितलेल्या काही गोष्टी करून पाहा..(how to apply heena or mehendi on hair?)

how to get natural colour to gray hair? how to turn gray hair black, how to apply heena or mehendi on hair  | मेहेंदीमुळे केशरी, लालसर रंगलेले केस आवडत नाही? मेहेंदीमध्ये 'हा' पदार्थ मिसळा- केसांना नॅचरल रंग येईल

मेहेंदीमुळे केशरी, लालसर रंगलेले केस आवडत नाही? मेहेंदीमध्ये 'हा' पदार्थ मिसळा- केसांना नॅचरल रंग येईल

Highlightsमेहेंदी लावल्यानंतर केसांना लालसर रंग न येता ते नॅचरल दिसावेत यासाठी .....

हल्ली बऱ्याच जणांचे केस पांढरे झालेले असतात. पांढरे केस रंगविण्यासाठी मग जर कोणता नॅचरल उपाय पाहिजे असेल तर केसांना मेहेंदी लावणे हा एक चांगला पर्याय आहे. पण कित्येक जणांना मेहेंदीमुळे लालसर, केशरी झालेले केस आवडत नाहीत (how to turn gray hair black?). त्यामुळे मग ते मेहेंदी लावणं टाळतात. तुमचीही हीच अडचण असेल तर एकदा पुढे सांगितलेल्या पद्धतीनुसार मेहेंदी लावून पाहा. केसांना नॅचरल रंग येईल.(Natural Remedy to Reverse Grey Hair Without Chemicals)

 

मेहेंदी लावल्याने केस लालसर, केशरी होऊ नयेत म्हणून....

मेहेंदी लावल्यानंतर केसांना लालसर रंग न येता ते नॅचरल दिसावेत यासाठी काय उपाय करता येऊ शकतो, याविषयीची माहिती dr.priyanka.abhinav_7509 या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

नेहमीच गोड खावं वाटतं? ४ सोप्या गोष्टी लक्षात ठेवा- Sugar Craving आपोआप कमी होईल

हा उपाय करण्यासाठी १ ग्लास पाणी एका पातेल्यामध्ये गॅसवर गरम करायला ठेवा. तुमच्या केसांच्या लांबीनुसार पाणी कमी जास्त करू शकता. यानंतर त्या पाण्यात १ चमचा कलौंजी, १ चमचा तांदूळ आणि १ चमचा चहा पावडर घाला. यानंतर त्या पाण्यात ३ ते ४ चमचे बीटरुटचा किस घाला. पाण्याला चांगली उकळी येऊ द्या. त्यानंतर गॅस बंद करून पाणी गाळून घ्या. या पाण्यात भिजवलेली मेहेंदी केसांना लावा. केसांना लालसर रंग येणार नाही.

 

हे उपायही करून पाहा..

१. मेहेंदीमध्ये भाजून घेतलेली हळद मिक्स करून लावल्यासही केसांना केशरी रंग येत नाही.

फक्त २० रुपयांत चेहऱ्यावर येईल डायमंड फेशियलचा ग्लो! कच्चं दूध चेहऱ्याला 'असं' फक्त लावा

२. जास्वंदाची वाळलेली फुलं तव्यावर टाकून भाजून घ्या. यानंतर त्यांची पावडर करा आणि ती पावडर मेहेंदीमध्ये घाला. केसांना भरपूर पोषण मिळून त्यांना चांगला नॅचरल रंग येतो.

३. लोखंडाच्या कढईमध्ये कॉफी घालून पाणी उकळून घ्या. त्या पाण्यात मेहेंदी भिजवा. यामुळेही केसांना छान रंग येतो, असं म्हटलं जातं. 


 

Web Title: how to get natural colour to gray hair? how to turn gray hair black, how to apply heena or mehendi on hair 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.