Lokmat Sakhi >Beauty > केस नॅचरली काळे करायचेत? खोबरेल तेलात मिसळा ३ पैकी १ गोष्ट; काळेभोर केसांचं सिक्रेट

केस नॅचरली काळे करायचेत? खोबरेल तेलात मिसळा ३ पैकी १ गोष्ट; काळेभोर केसांचं सिक्रेट

How To Get Black Hair Naturally - 3 Home Remedies : फक्त खोबरेल तेल नाही, त्यात ३ पैकी १ गोष्ट मिसळा; याचा फायदा नक्कीच केसांना होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2024 05:20 PM2024-07-23T17:20:29+5:302024-07-23T17:21:09+5:30

How To Get Black Hair Naturally - 3 Home Remedies : फक्त खोबरेल तेल नाही, त्यात ३ पैकी १ गोष्ट मिसळा; याचा फायदा नक्कीच केसांना होईल

How To Get Black Hair Naturally - 3 Home Remedies | केस नॅचरली काळे करायचेत? खोबरेल तेलात मिसळा ३ पैकी १ गोष्ट; काळेभोर केसांचं सिक्रेट

केस नॅचरली काळे करायचेत? खोबरेल तेलात मिसळा ३ पैकी १ गोष्ट; काळेभोर केसांचं सिक्रेट

केसांना तेल लावणे हे केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते (Hair care tips). केसांना खोबरेल तेल लावून मालिश केल्याने केसांच्या मुळांना चांगले पोषण मिळते. ज्यामुळे केस पांढरे होणे, केस गळणे, केसात कोंडा, यासह इतर केसांच्या निगडीत समस्या दूर होतात (Beauty Tips). केस दीर्घकाळ चांगले राहावे यासाठी आपण केसांना खोबरेल तेल लावतो.

खोबरेल तेलात व्हिटॅमिन्स आणि फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असल्याने केसांच्या वाढीस मदत होते. पण केसांसाठी फक्त खोबरेल तेल पुरेसे नाही. आपण यात इतर ३ पदार्थ मिक्स करू शकता. यामुळे पांढऱ्या केसांची समस्या सुटेल, केसांना नवीन जीवनदान मिळेल(How To Get Black Hair Naturally - 3 Home Remedies).

खोबरेल तेल आणि आवळा

आवळा हे एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. ज्यात  व्हिटॅमिन-ई, व्हिटॅमिन-सी आणि टॅनिन नावाचे गुणधर्म असतात. आपण खोबरेल तेलात आवळ्याचे तुकडे घालून, तेल गरम करू शकता. कोमट झाल्यानंतर केसांना तेल लावू शकता. आपण हे तेल स्टोर करूनही ठेवू शकता. यामुळे केसांना नवीन जीवन मिळेल.

केमिकल डाय कशाला? दह्यात फक्त ४ गोष्टी मिसळा; केस वाढतील भरभर - कोंडाही राहणार नाही

खोबरेल तेल आणि कडीपत्ता

केसांसाठी कडीपत्त्याचे अनेक फायदे आहेत. कडीपत्त्यात व्हिटॅमिन सी, बी, प्रोटीन आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. जे स्काल्पमधील रक्ताभिसरणाला चालना देतात. या गुणधर्मांमुळे नवीन केस वाढण्यास मदत मिळते. आपण खोबरेल तेलात कडीपत्ता घालून गरम करू शकता. कोमट झाल्यानंतर केसांना तेल लावू शकता. आपण हे तेल स्टोर करूनही ठेवू शकता.

केस इतके पांढरे की वयस्कर दिसू लागलात? चमचाभर हळदीचा 'करा' स्पेशल डाय; केस होतील काळेभोर

खोबरेल तेल आणि लिंबू

केसांसाठी लिंबाचा रसही फायदेशीर ठरते. लिंबाच्या रसामुळे स्काल्पचा पीएच संतुलित राहण्यास मदत होते. यामध्ये व्हिटॅमिन सी, सायट्रिक अ‍ॅसिड, फ्लेव्होनॉइड्स आणि आयर्न असते. जे केसांच्या वाढीस मदत करते. यासाठी खोबरेल तेलात लिंबाचा रस मिसळून केसांना लावा. यामुळे केसांच्या वाढीस मदत होईल.

Web Title: How To Get Black Hair Naturally - 3 Home Remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.