केस सुंदर-सरळ दिसण्यासाठी आपण केसांना ग्लोबल कलरिंग आणि हायलाईट करतो. सध्या याची क्रेझ तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायलाही मिळत आहे. हायलाईट केल्यावर सुरुवातीला केस खूप छान दिसतात, पण काही दिवसांनंतर त्यातील केमिकलमुळे केसांचा नैसर्गिक ओलावा निघून जातो.(Hair spa at home in Marathi) यामुळे केस मऊ,रेशमी दिसण्याऐवजी ते झाडूसारखे कोरडे, निर्जीव आणि रखरखीत होतात. केमिकल्सच्या अतिवापरामुळे केसगळतीही प्रचंड वाढते. मग आपण पुन्हा पार्लरमध्ये जाऊन महागड्या 'हेअर स्पा' किंवा 'प्रोटीन ट्रीटमेंट'वर हजारो रुपये खर्च करतो, ज्याचा परिणाम फक्त काही दिवसांपुरताच मर्यादित असतो.(Gharguti hair mask)पण आपल्या स्वयंपाकघरात अशा काही गोष्टी ज्या महागड्या पार्लर ट्रीटमेंटपेक्षाही प्रभावी ठरु शकतात. (Kese mulayam honyasathi tips) केमिकलमुळे खराब झालेल्या केसांचे आरोग्य पुन्हा मिळवण्यासाठी आणि केस गळती थांबवण्यासाठी आपण घरच्या घरी 'नॅचरल हेअर स्पा' करू शकतो. पाहूया या जादुई उपायांबद्दल.
केसांसाठी तांदळाचे पाणी आणि मध नैसर्गिक कंडिशनर आहे. तांदळाच्या पाण्यात इनोसिटॉल नावाचे कार्बोहायड्रेट असते. जे खराब झालेल्या केसांना आतून दुरुस्त करते. तर मध केसातील ओलावा टिकवून ठेवते. हे नॅचरल कंडिशनर केसांना लावण्यासाठी तांदळाचे पाणी २४ तास भिजवा. त्यात १ चमचा मध मिसळा. शाम्पू केल्यानंतर या पाण्याने केसांना मसाज करा. १० मिनिटांनी साध्या पाण्याने केस धुवा. यामुळे केस मऊ होण्यास मदत होईल.
केमिकलमुळे केसांची मुळे कमकुवत होऊन केस गळती सुरु होते. कोरफडमध्ये एन्झाईम्स असतात. जे स्कॅल्पचे आरोग्य सुधारतात. तर काळी मिरी रक्ताभिसरण वाढवते. यासाठी ताज्या कोरफडीच्या जेलमध्ये चिमूटभर काळी मिरी पावडर मिसळा. हे मिश्रण केसांच्या मुळांना लावल्यास केस गळती थांबण्यास मदत होईल.
जेव्हा आपले केस झाडूसारखे होतात, तेव्हा त्यांना प्रोटीनची गरज असते. केळामध्ये पोटॅशियम आणि नैसर्गिक तेल असते. एक पिकलेले केळे मॅश करुन त्यात थोडे कच्चे दूध मिसळून पेस्ट तयार करा. हा हेअर मास्क आपल्या केसांना लावा आणि ४० ते ४५ मिनिटे ठेवा. हे मिश्रण केसांना लावल्याने केसांना प्रोटीन ट्रिटमेंट मिळते आणि केस मऊ-मुलायम होतात.
Web Summary : Highlights can damage hair, making it dry and rough. Restore hair health with a natural hair spa using rice water and honey, aloe vera and black pepper, or banana and milk. These remedies help moisturize, reduce hair fall, and provide protein for soft, smooth hair.
Web Summary : हाईलाइट से बाल रूखे और बेजान हो सकते हैं। चावल का पानी और शहद, एलोवेरा और काली मिर्च, या केला और दूध का उपयोग करके नेचुरल हेयर स्पा से बालों को फिर से स्वस्थ बनाएं। ये उपाय बालों को मॉइस्चराइज़ करने, बालों का झड़ना कम करने और मुलायम बालों के लिए प्रोटीन प्रदान करने में मदद करते हैं।