आरशात पाहिल्यावर आपल्यालाही असंच वाटतं ना. केस लांबसडक आणि सुंदर असायला हवे. लांबसडक, काळेभोर, घनदाट असावेत असं प्रत्येकाला वाटतं.(Flaxseed hair treatment) आजच्या धावपळीच्या जीवनात प्रदूषण, चुकीचा आहार आणि रासायनिक शॅम्पूचा अतिवापर यामुळे केस निर्जीव, कोरडे आणि कमकुवत होणे ही एक सामान्य समस्या बनली आहे.(Cornstarch hair mask) अनेक जण केसांच्या वाढीसाठी आणि चकाकीसाठी पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करून 'केराटिन' (Keratin) किंवा 'स्पा' ट्रिटमेंट घेतात. पण आपल्या स्वयंपाकघरात असणाऱ्या काही घटकांचा वापर करुन आपण केसांना लांब, दाट आणि रेशमी करु शकतो. यामुळे आपली केसगळती देखील होणार नाही. (Homemade keratin treatment)
वाटी इडली करा फक्त १५ मिनिटांत, ना इडली पात्राची गरज ना स्टँडची-जाळीदार मऊ इडली झटपट
मागच्या काही काळापासून स्ट्रेटनिंग, रीबाऊंडनिंग आणि केरेटीन यांसारख्या ट्रीटमेंट्स करण्याचे प्रमाण वाढले आहे. केमिकल्सचा वापर करुन केसांचा पोत बिघडवण्यापेक्षा घरच्या घरी नैसर्गिक पदार्थ वापरुन ही ट्रिटमेंट करता येऊ शकते. आपले केस छान सिल्की आणि शायनी करण्यासाठी काय करायला हवं पाहूया.
साहित्य
पाणी - ४ कप
अळशी - १ कप
कॉर्न स्टार्च
ऑलिव्ह ऑइल
कृती
सगळ्यात आधी आपल्याला एका पॅनमध्ये पाणी गरम करावे लागेल. त्यात अळशीच्या बिया घाला. पाणी घट्ट होईपर्यंत ढवळत राहा. आता दुसऱ्या पॅनमध्ये पाणी गरम करुन त्यात कॉर्न स्टार्च घाला, जेल होईपर्यंत मिसळा. दोन्ही गोष्टी व्यवस्थित तयार झाल्यानंतर मिक्स करा.
ही क्रीम आपल्याला आठवड्यातून एकदा केसांना लावायला हवी. केसांना मेहेंदी लावतो अगदी त्याप्रमाणे हे आपल्याला केसांना लावायचे आहे. अळशीच्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. हे घटक केसांच्या मुळांना मजबूत करतात. यामुळे केसगळती थांबते आणि स्काल्प सुधारण्यास मदत होते. अळशीपासून तयार होणारे जेल नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करते. कॉर्न स्टार्च केसांमधील गुंता कमी करण्यास आणि केसांना नैसर्गिक बाउन्स देण्यास मदत करतो. केसांमधील जास्तीचे तेल शोषून घेते आणि केसांना मऊ, रेशमी टेक्स्चर मिळते.
