केसांच्या समस्या सध्या खूपच वाढत आहेत. त्यातल्या काही प्रमुख समस्या म्हणजे केस खूप गळणे, केसांना अजिबातच वाढ नसणे, कमी वयात केस पांढरे होणे आणि डोक्यात खूप कोंडा होणे. या सगळ्या समस्या तुम्हाला एका झटक्यात कमी करायच्या असतील तर पुढे सांगितलेला एक सोपा उपाय करून पाहा. हा उपाय केल्यामुळे केसांवर खूप छान चमक येईल आणि केसांची वाढही चांगली होईल (How to do Hair Spa at Home?). हा उपाय करण्यासाठी आपल्याला घरातलेच पदार्थ वापरायचे असून ही एक प्रकारची घरगुती हेअर स्पा ट्रिटमेंटच आहे.(hair spa at home for hair growth and shiny hair)
घरगुती हेअर स्पा कसा करावा?
हा उपाय करण्यासाठी एका पातेल्यामध्ये १ ग्लास पाणी घ्या. त्यामध्ये १ वाटी तांदळाचं पीठ घाला. आता पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित कालवून घ्या आणि हे मिश्रण गॅसवर गरम करायला ठेवा. गरम होत असताना अधूनमधून हलवत राहा. जेव्हा मिश्रण घट्ट होईल तेव्हा गॅस बंद करा. शिजवून घेतलेलं तांदळाचं पीठ एका भांड्यामध्ये काढा.
भारतात वाढतंय दुसऱ्या लग्नाचं प्रमाण, कारण प्रत्येकाला पार्टनरमध्ये हवीच आहे 'ही' गोष्ट
आता यामध्ये २ ते ३ चमचे जवसाचं घरी तयार केलेलं जेल घाला. यासाठी दिड कप पाण्यात दिड ते दोन चमचे जवस घालायचे आणि हे मिश्रण गॅसवर गरम करायला ठेवायचं.
पाणी थोडं घट्ट झालं की गॅस बंद करायचा आणि मग ते गाळून घ्यायचं. हे जवसाचं जेल केसांना छान चमक आणि मऊपणा देतं.
होळी स्पेशल: लाटताना पुरणपोळी फुटू नये म्हणून २ टिप्स, होळी रे होळी करा परफेक्ट पुरणाची पोळी
तांदळाचं पीठ, जवसाचं जेल एकत्र केल्यानंतर त्यामध्ये २ चमचे दही आणि २ चमचे खोबरेल तेल घाला. आता सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून एकजीव करून घ्या. हा लेप केसांच्या मुळांपासून ते शेवटच्या टोकापर्यंत लावा. पाऊण तासाने एखादा माईल्ड शाम्पू वापरून केस धुवून टाका. आठवड्यातून एकदा हा उपाय केला तर केसांना छान पोषण मिळेल आणि हळूहळू केसांच्या जवळपास सगळ्याच तक्रारी कमी होतील.
