Join us  

डायमंड फेशियलसारखा ग्लो मिळेल घरीच, फेशियलवर भरमसाठ पैसे खर्च करण्यापेक्षा हा उपाय करा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2024 4:25 PM

How To Get Diamond Facial Like Glow?: ब्यूटी पार्लरमध्ये जायला वेळ नसेल तर घरच्याघरी हा एक सोपा उपाय करून पाहा. अगदी डायमंड फेशियलसारखा ग्लो मिळेल... (How to do diamond facial at home?)

ठळक मुद्देवारंवार पार्लरमध्ये जाऊन फेशियल करण्यावर भरमसाठी पैसे खर्च करण्याची इच्छा नसेल, वेळ नसेल तर घरच्याघरी हा एक सोपा उपाय करून पाहा

त्वचेची काळजी घ्यायची असेल तर रोजचं स्किन केअर रुटीन तर महत्त्वाचं आहेच. पण तेवढंच करणं पुरेसं नाही. त्वचेचा पोत चांगला रहावा, त्यावर पिगमेंटेशन येऊ नयेत, त्वचा अकाली सुरकुतल्यासारखी वाटू नये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्वचा निस्तेज दिसू नये, यासाठी फेशियल, क्लिनअप, स्क्रबिंग यासारख्या गोष्टी नियमितपणे करणं गरजेचं आहे. पण वारंवार पार्लरमध्ये जाऊन फेशियल करण्यावर भरमसाठी पैसे खर्च करण्याची इच्छा नसेल (face mask for removing tanning), वेळ नसेल तर घरच्याघरी हा एक सोपा उपाय करून पाहा (How to get diamond facial like glow?). यामुळे तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच डायमंड फेशियल केल्यासारखा ग्लो येईल. (How to do diamond facial at home?)

 

डायमंड फेशियलसारखा ग्लो मिळविण्याचा उपाय

हा उपाय indianbeautysecrets या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. 

हा उपाय करण्यासाठी आपल्याला १ टीस्पून चिया सीड्स, अर्धा कप कच्चं दूध, १ टेबलस्पून मध, १ टेबलस्पून तांदळाचं पीठ, १ टेबलस्पून ॲलोव्हेरा जेल असं साहित्य लागणार आहे.

सुंदर महिलांपेक्षा हॅण्डसम पुरुष खाऊन जातात भाव- भराभर करतात प्रगती, बघा संशोधन काय सांगतं....

सगळ्यात आधी चिया सीड्स दुधात भिजत घाला. साधारण १ तासाने दूध आणि चिया सीड्स मिक्सरमधून फिरवून त्याची पेस्ट करून घ्या. या पेस्टमध्ये मध, तांदळाचं पीठ, ॲलोव्हेरा जेल टाका आणि सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या.

आता हा लेप चेहऱ्याला लावा आणि साधारण अर्ध्या तासाने कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय केल्यास त्वचेवर खूप चांगला परिणाम दिसून येईल.

 

हा उपाय करण्याचे फायदे

१. त्वचेवर खूप छान ग्लो येईल.

२. डल झालेली त्वचा चमकदार होण्यासाठी उपयुक्त.

स्टायलिश लूक देणारे लेटेस्ट फॅशनचे लांब बाह्यांचे ब्लाऊज, ७ सुंदर डिझाईन्स- ट्राय करून पाहा

३. चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट्स आणि पिगमेंटेशन कमी हाेईल.

४. एकसारखा स्किनटोन होण्यासाठी फायदेशीर.

५. टॅनिंग आणि डेड स्किन काढून टाकण्याचा सोपा उपाय.

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी