Join us  

फक्त ३ स्टेप्समध्ये करा बीटरुट फेशियल, व्हॅलेटाईन्स डे ला चेहऱ्यावर येईल मस्त गुलाबी ग्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2024 11:55 AM

How To Do Beetroot Facial At Home?: व्हॅलेटाईन्सच्या दिवशी (valentines day) चेहऱ्यावर छान नॅचरल ग्लो पाहिजे असेल तर बीटरुटचा वापर करून हा घरगुती उपाय करून पाहा....

ठळक मुद्देपार्लरसारखा ग्लो मिळवायचा असेल आणि ते ही अगदी ५- १० रुपयांत तर घरच्याघरी हा एक सोपा उपाय करून पाहा.

चेहऱ्यावरचा ग्लो कमी झाला असेल, त्वचेवरचं टॅनिंग- डेडस्किनचं प्रमाण वाढलं असेल तर दरवेळी पार्लरमध्ये जाऊनच फेशियल किंवा क्लिनअप करण्याची गरज नसते. बऱ्याचदा काही घरगुती उपायही अगदी पार्लरएवढाच ग्लो देऊ शकतात आणि ते ही अगदी कमी पैशांत. म्हणूनच पार्लरसारखा ग्लो मिळवायचा असेल आणि ते ही अगदी ५- १० रुपयांत तर घरच्याघरी हा एक सोपा उपाय करून पाहा. बीटरुटचा वापर करून घरच्याघरी फक्त ३ स्टेप्समध्ये मिनी फेशियल कसं करायचं, हे यामध्ये सांगितलं आहे (How to do beetroot facial at home?). आता व्हॅलेंटाईन्स डे (valentines day) आलाच आहे. त्यानिमित्त हा उपाय करून पाहा (benefits of Beet root for skin). चेहऱ्यावर छान प्रेमाचा गुलाबी ग्लो येईल...(3 Steps mini facial at home for glowing skin)

 

बीटरुट फेशियल कसं करायचं?

बीटरुट वापरून घरच्याघरी फेशियल कसं करायचं, याविषयीचा व्हिडिओ miss.narang या पेजवर शेअर करण्यात आला आहे. 

फक्त १५ मिनिटांत करा मऊ- लुसलुशीत ओट्स इडली; डाळ- तांदूळ भिजविण्याची कटकटच नाही 

पहिली स्टेप

या स्टेपमध्ये आपण चेहऱ्याला स्क्रबिंग करणार आहोत. यासाठी एका वाटीत बीटरुचा थोडासा किस घ्या. त्यामध्ये १ टीस्पून साखर आणि १ टीस्पून मध घाला. हे सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. आता चेहरा थोडा ओलसर करून घ्या आणि या मिश्रणाने चेहऱ्याला स्क्रबिंग करा. यामुळे डेड स्किन निघून जाण्यास मदत होते. 

 

दुसरी स्टेप 

यामध्ये त्वचेवरचं टॅनिंग काढून टाकण्यासाठी आपण उपाय करणार आहोत.

थंडीसाठी काढलेले ब्लँकेट्स पुन्हा ठेवून देण्यापूर्वी 'असे' स्वच्छ करा, कुबट वास जाईल- नेहमीच राहतील फ्रेश

त्यासाठी एका वाटीमध्ये १ टेबलस्पून बीटचा रस घ्या. त्यामध्ये १ टेबलस्पून दही घाला. या मिश्रणाने आता चेहऱ्याला ८ ते १० मिनिटांसाठी मसाज करा. यामुळे त्वचेला पोषण मिळेल.

 

तिसरी स्टेप

या स्टेपमध्ये आपण त्वचेसाठी बीटचा वापर करून फेसपॅक तयार करणार आहोत. यासाठी एका वाटीत बीटचा रस घ्या. त्यात बेसनपीठ, १ टीस्पून गुलाब जल आणि ५ ते ६ थेंब लिंबाचा रस घाला.

३, ५ की १०? दररोज किती बदाम खाणं तब्येतीसाठी चांगलं? नेमकं कधी खावेत? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि चेहऱ्याला लावा. १० ते १५ मिनिटांनी चेहऱ्याला लावलेला लेप सुकला की चेहरा धुवून टाका. यानंतर बघा तुमच्या चेहऱ्यावर कशी छान चमक येते... 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सहोम रेमेडीत्वचेची काळजीव्हॅलेंटाईन्स डे