हल्ली जवळपास प्रत्येकालाच केसाची कोणती ना कोणती समस्या छळते आहे. काही जणांचे केस अजिबातच वाढत नाहीत तर काही जणांचे केस गळून गळून खूप पातळ झालेले असतात. कमी वयात केस पांढरे होण्याची समस्यातर खूपच वाढली आहे. शिवाय हिवाळ्यात डोक्यात खूप कोंडा होतो म्हणून अनेकजण वैतागले आहेत (home hacks to reduce hair loss). आता तुमच्याही केसांची वाढ खुंटली असेल, ते खूपच पातळ झाले असतील आणि त्यांच्यावरची चमक जाऊन ते राठ, कोरडे झाले असतील तर पुढे सांगितलेला एक घरगुती उपाय लगेचच करून पाहा..(use of red onion to reduce hair loss)
केस काळेभोर, लांब, दाट हाेण्यासाठी उपाय
हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक लाल रंगाचा कांदा वापरायचा आहे. एक लाल रंगाचा कांदा घ्या आणि तो किसून घ्या किंवा मिक्सरमधून फिरवून घ्या. यानंतर तो एका कपड्यात घट्ट गुंडाळा आणि त्यातलं पाणी काढून घ्या. आता या पाण्यामध्ये २ ॲस्परिनच्या टॅबलेट्स क्रश करून घाला.
डोक्यातल्या कोंड्यामुळे हैराण हाेऊ नका, चमचाभर कापूर 'या' पद्धतीने वापरा- १ आठवड्यात कोंडा गायब
त्यात आता तुमचा नेहमीचा शाम्पू घाला आणि या पाण्याने केस धुवा. आठवड्यातून एकदा हा उपाय नियमितपणे केल्यास काही दिवसांतच केस वाढतील. त्यांचं गळणं कमी होईल आणि केसांवर छान चमक येईल असं mother.satori या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. पण यामध्ये ॲस्परिन घालण्याचा सल्ला दिला आहे. सगळ्यांनाच ते सहन होईल असं नाही. त्यामुळे हा उपाय करण्यापुर्वी एकदा पॅचटेस्ट जरुर घ्या.
केसांची वाढ होण्यासाठी हे उपायही करून पाहा
कांद्यामध्ये असणारे सल्फर आणि इतर काही घटक केसांची मुळं पक्की होण्यास मदत करतात. त्यामुळे केस गळणं कमी होतं आणि त्यांची चांगली वाढ होते. आठवड्यातून एकदा कांद्याचा रस केसांच्या मुळाशी लावा आणि त्यानंतर अर्ध्या तासाने केस धुवून टाका.
कोल्हापूरचा प्रसिद्ध व्हेज पांढरा रस्सा, हिवाळ्यात करून खायलाच हवा- शाकाहारी लोकांसाठी झणझणीत बेत
कॅस्टर ऑईलदेखील केसांच्या वाढीसाठी खूप फायदेशीर ठरतं. अर्धा चमचा कॅस्टर ऑईल, १ चमचा खोबरेल तेल एकत्र करा. त्यात ४ ते ५ थेंब रोजमेरी ऑईल घाला. या तेलाने डोक्याला मालिश करा आणि एखाद्या तासाने केस धुवा. केस छान वाढतील आणि शिवाय मऊ, सिल्की होतील.
Web Summary : Struggling with hair loss? This article suggests using red onion juice mixed with aspirin and shampoo. Also, onion juice and castor oil with rosemary oil can help strengthen hair roots and promote growth.
Web Summary : बाल झड़ने से परेशान हैं? यह लेख एस्पिरिन और शैम्पू के साथ मिश्रित लाल प्याज के रस का उपयोग करने का सुझाव देता है। इसके अलावा, प्याज का रस और रोजमेरी तेल के साथ अरंडी का तेल बालों की जड़ों को मजबूत करने और विकास को बढ़ावा देने में मदद कर सकता है।