फारच कमी वयात डोक्यावर दिसणारे पांढरे केस म्हणजे अनेकांसाठी अगदी लाजिरवाणी गोष्ट असते. काळ्या केसांमधून मध्येच काही पांढरे केस दिसू लागले की आपला संपूर्ण लूकच खराब होतो. केस एकदा पांढरे होऊ लागले की थांबायचं नावचं घेत नाहीत, अशावेळी आपण लगेच बाजारात मिळणारे केमिकलयुक्त हेअर डाय किंवा कलर्स आणतो. पण, या केमिकल्समुळे केस अधिकच खराब होतात आणि काही दिवसांनी उरलेले काळे केसही पांढरे होऊ लागतात. अशा वेळी आपल्याला आठवण येते ती नैसर्गिक उपायांची... आपल्या स्वयंपाकघरात रोज वापरली जाणारी चहा पावडर आणि कॉफी पावडर केवळ थकवा घालवण्यासाठीच नाही, तर पांढऱ्या केसांना नैसर्गिक रंग देण्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरते. या दोन्ही पदार्थांचा वापर करून आपण घरच्याघरीच स्वस्त आणि मस्त हेअर डाय तयार करू शकतो(how to color hair naturally with tea coffee at home).
चहा पावडर आणि कॉफी पावडरचं हे खास कॉम्बिनेशन पांढऱ्या (tea & coffee powder hair dye for hair) केसांवर एखाद्या जादूच्या छडीसारखं काम करतं. हा घरगुती डाय लावल्यानंतर तुम्ही महागड्या हेअर कलर्सना विसरून जाल...पार्लरमध्ये जाऊन तासंतास बसणं आणि हजारो रुपये खर्च करणं आता विसरा...फक्त चहा पावडर आणि कॉफीचा वापर करून तुम्ही नैसर्गिक हेअर डाय तयार करू शकता, जो तुमच्या केसांना मुळापासून नैसर्गिक काळा रंग देईल. केसांची गळती थांबवून त्यांना दाट आणि काळेभोर (How To Make Tea & Coffee Hair Dye) करणारा हा घरगुती उपाय नेमका कसा करायचा आणि तो केसांसाठी कसा फायदेशीर आहे ते पाहूयात.
पांढरे केस काळे करण्याचा घरगुती उपाय...
सर्वात आधी एक कप पाण्यात २ ते ३ टेबलस्पून चहा पावडर किंवा कॉफी पावडर टाका. केसांवर गडद आणि दाट रंग हवा असेल, तर हे मिश्रण किमान १५ ते २० मिनिटे चांगले उकळून द्या. हे मिश्रण जेवढे जास्त आटवून घट्ट कराल, तेवढाच तुमच्या केसांवर अधिक गडद आणि आकर्षक रंग चढेल. मिश्रण नीट उकळल्यानंतर ते गाळून घ्या आणि पूर्णपणे थंड होऊ द्या. गरम मिश्रण थेट केसांवर किंवा स्काल्पवर लावल्यास इजा होऊ शकते, त्यामुळे ते पूर्णपणे थंड होऊ द्यावे.
केस गळून टक्कल पडण्यापूर्वी करा 'हा' उपाय! केळीची साल केसांवर 'अशी' लावा चटकन....
केसांसाठी हेअर डाय वापरण्याची योग्य पद्धत...
हेअर डाय लावण्यापूर्वी केस शाम्पूने नीट स्वच्छ धुवून घ्या. केसांवरील धूळ, माती आणि तेल पूर्णपणे निघून गेल्यावरच नैसर्गिक रंग केसांच्या टोकांपर्यंत व्यवस्थित लागू शकतो. आता तयार केलेले थंड चहा किंवा कॉफीचे पाणी केसांवर टाका. केसांच्या मुळांपासून ते टोकांपर्यंत हे मिश्रण समान रीतीने लावण्यासाठी तुम्ही हेअर ब्रशचा वापर करू शकता, जेणेकरून कोणताही भाग राहून जाणार नाही. मिश्रण लावल्यानंतर हलक्या हाताने आपल्या टाळूची (Scalp) आणि केसांची मालिश करा. यामुळे रक्ताभिसरण वाढते आणि रंग सर्वत्र सारख्या प्रमाणात पसरण्यास मदत होते. मिश्रण लावल्यानंतर केस शॉवर कॅपने झाकून घ्या आणि ३० ते ६० मिनिटांसाठी तसेच राहू द्या. यामुळे केसांना रंग शोषून घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.
दात पांढरेशुभ्र आणि हिरड्या मजबूत करणारं दंतमंजन, खिशाला परवडणारा घरगुती सुरक्षित उपाय...
जर तुम्हाला अधिक गडद रंग हवा असेल, तर हा उपाय आठवड्यातून २ ते ३ वेळा पुन्हा करा. नैसर्गिक रंगांचा परिणाम हळूहळू वाढतो आणि रंग अधिक गडद होत जातो. पांढरे केस नैसर्गिकरित्या लपवण्यासाठी ही पद्धत अत्यंत फायदेशीर ठरते. चहा आणि कॉफीमधील घटक केसांना केवळ रंगच देत नाहीत, तर त्यांना मऊ आणि चमकदारही बनवतात.
हा उपाय करण्याचे फायदे...
१. चहा आणि कॉफीमधील नैसर्गिक रंगद्रव्य केसांना हलका काळसर-तपकिरी शेड देण्यास मदत करतात.
२. कॉफी आणि चहामधील अँटीऑक्सिडंट्स केसांना नैसर्गिक चमक आणण्यास फायदेशीर ठरतात.
३. हा उपाय पूर्णपणे नैसर्गिक असल्यामुळे केसांवर केमिकल्सचा वाईट परिणाम कमी होतो.
४. चहा पावडरमध्ये नॅचरल टॅनिन्स असतात जे केसांना नैसर्गिक काळा रंग देतात, तर कॉफीमधील कॅफिन केसांच्या वाढीला चालना देते आणि केसांना एक छान चमक येते.
Web Summary : Revert grey hair naturally using tea and coffee. This homemade dye provides a dark shade, shine, and promotes hair growth. A cost-effective and chemical-free solution for beautiful, black hair.
Web Summary : चाय और कॉफी का उपयोग करके प्राकृतिक रूप से सफेद बालों को काला करें। यह घरेलू डाई गहरा रंग, चमक प्रदान करती है और बालों के विकास को बढ़ावा देती है। सुंदर, काले बालों के लिए एक किफायती और रासायनिक मुक्त समाधान।