आपल्याला माहितीच आहे की साडीचा रंग जो आहे, त्याच रंगाचं ब्लाऊज आता घालण्याची फॅशन नाही. उलट साडीमध्ये जो रंग अजिबातच नसतो, त्या रंगाचं ब्लाऊज घालण्याला प्राधान्य दिलं जातं. असे साडी आणि ब्लाऊजचे रंग परफेक्ट कॉन्ट्रास्ट मॅच करण्याची सध्या फॅशन आहे. तिच फॅशन सध्या साडीचा किंवा ड्रेसचा रंग आणि बांगड्यांचा रंग यामध्येही दिसते आहे. त्यामुळे लग्नसराईसाठी किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमासाठी साडी किंवा ड्रेसवर बांगड्या निवडताना पुढे सांगितलेले काही कलर कॉम्बिनेशन्स लक्षात ठेवा (colour combinations for saree and bangles). तुमची बांगड्यांची निवड अगदी परफेक्ट होईल.(how to choose bangles colour according to the colour of outfits or saree?)
साडी किंवा ड्रेसच्या रंगानुसार बांगड्यांची निवड कशी करावी?
१. जर तुम्ही लाल रंगाची साडी नेसणार असाल तर त्यावर लाल किंवा लालसर शेडमध्ये जाणाऱ्या बांगड्या मुळीच घालू नका. त्याऐवजी लाल साडीवर हिरव्या रंगाच्या, काळ्या रंगाच्या किंवा मग पांढऱ्या रंगाच्या बांगड्या घाला. खूप छान लूक येईल.
२. तेच आहे हिरव्या साडीचं. हिरव्या साडीवर गुलाबी, लाल, पर्पल अशा रंगाच्या बांगड्या छान दिसतात. किंवा मग त्या साडीवरचे ब्लाऊज कॉन्ट्रास्ट रंगाचे असेल ब्लाऊजच्या रंगानुसार बांगड्या निवडल्या तरी चालेल.
३. काळ्या रंगाची साडी नेसणार असाल तर त्या साडीवर असणाऱ्या वर्कनुसार मोत्याच्या, गोल्डन रंगाच्या किंवा मग चंदेरी रंगाच्या बांगड्या घाला.
४. पिवळ्या रंगाच्या साडीवर किंवा ड्रेसवर हिरव्या, लाल, मरून, गुलाबी, जांभळ्या अशा रंगाच्या बांगड्या जास्त उठून दिसतात.
५. निळसर किंवा जांभळ्या रंगाचा ड्रेस किंवा साडी असेल तर त्यावर गुलाबी, हिरव्या, पिवळ्या किंवा गोल्डन रंगाच्या बांगड्या घालून पाहा.
६. चंदेरी आणि गोल्डन रंगाच्या साडीवर ब्लॅक रंगाच्या किंवा मल्टीकलर प्रकारातल्या बांगड्या छान दिसतात.
Web Summary : Matching bangles to saree color is outdated. Contrast colors are the new trend. Red saree pairs well with green, black, or white bangles. For yellow outfits, green, red, or purple bangles work best. Silver or golden sarees go well with black or multicolored bangles.
Web Summary : साड़ी के रंग से मेल खाने वाली चूड़ियाँ अब पुरानी हो गई हैं। विपरीत रंग नया चलन है। लाल साड़ी के साथ हरी, काली या सफेद चूड़ियाँ अच्छी लगती हैं। पीले रंग की पोशाक के लिए, हरी, लाल या बैंगनी चूड़ियाँ सबसे अच्छी लगती हैं। चांदी या सुनहरी साड़ियों के साथ काली या बहुरंगी चूड़ियाँ अच्छी लगती हैं।