Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > साडीवर मॅचिंग बांगड्या घालण्याची फॅशन झाली जुनी, बघा साडीच्या रंगानुसार कशा निवडायच्या बांगड्या..

साडीवर मॅचिंग बांगड्या घालण्याची फॅशन झाली जुनी, बघा साडीच्या रंगानुसार कशा निवडायच्या बांगड्या..

Beauty Tips: साडीचा किंवा ड्रेसचा रंग आणि बांगड्यांचा रंग यांचं मॅचिंग कसं करायचं असा प्रश्न पडला असेल तर....(colour combinations for saree and bangles)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2025 12:12 IST2025-12-10T12:10:51+5:302025-12-10T12:12:00+5:30

Beauty Tips: साडीचा किंवा ड्रेसचा रंग आणि बांगड्यांचा रंग यांचं मॅचिंग कसं करायचं असा प्रश्न पडला असेल तर....(colour combinations for saree and bangles)

how to choose bangles colour according to the colour of outfits or saree, colour combinations for saree and bangles  | साडीवर मॅचिंग बांगड्या घालण्याची फॅशन झाली जुनी, बघा साडीच्या रंगानुसार कशा निवडायच्या बांगड्या..

साडीवर मॅचिंग बांगड्या घालण्याची फॅशन झाली जुनी, बघा साडीच्या रंगानुसार कशा निवडायच्या बांगड्या..

Highlightsसाडी किंवा ड्रेसवर बांगड्या निवडताना पुढे सांगितलेले काही कलर कॉम्बिनेशन्स लक्षात ठेवा..

आपल्याला माहितीच आहे की साडीचा रंग जो आहे, त्याच रंगाचं ब्लाऊज आता घालण्याची फॅशन नाही. उलट साडीमध्ये जो रंग अजिबातच नसतो, त्या रंगाचं ब्लाऊज घालण्याला प्राधान्य दिलं जातं. असे साडी आणि ब्लाऊजचे रंग परफेक्ट कॉन्ट्रास्ट मॅच करण्याची सध्या फॅशन आहे. तिच फॅशन सध्या साडीचा किंवा ड्रेसचा रंग आणि बांगड्यांचा रंग यामध्येही दिसते आहे. त्यामुळे लग्नसराईसाठी किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमासाठी साडी किंवा ड्रेसवर बांगड्या निवडताना पुढे सांगितलेले काही कलर कॉम्बिनेशन्स लक्षात ठेवा (colour combinations for saree and bangles). तुमची बांगड्यांची निवड अगदी परफेक्ट होईल.(how to choose bangles colour according to the colour of outfits or saree?)

 

साडी किंवा ड्रेसच्या रंगानुसार बांगड्यांची निवड कशी करावी?

१. जर तुम्ही लाल रंगाची साडी नेसणार असाल तर त्यावर लाल किंवा लालसर शेडमध्ये जाणाऱ्या बांगड्या मुळीच घालू नका. त्याऐवजी लाल साडीवर हिरव्या रंगाच्या, काळ्या रंगाच्या किंवा मग पांढऱ्या रंगाच्या बांगड्या घाला. खूप छान लूक येईल.

२. तेच आहे हिरव्या साडीचं. हिरव्या साडीवर गुलाबी, लाल, पर्पल अशा रंगाच्या बांगड्या छान दिसतात. किंवा मग त्या साडीवरचे ब्लाऊज कॉन्ट्रास्ट रंगाचे असेल ब्लाऊजच्या रंगानुसार बांगड्या निवडल्या तरी चालेल.

३. काळ्या रंगाची साडी नेसणार असाल तर त्या साडीवर असणाऱ्या वर्कनुसार मोत्याच्या, गोल्डन रंगाच्या किंवा मग चंदेरी रंगाच्या बांगड्या घाला.

 

४. पिवळ्या रंगाच्या साडीवर किंवा ड्रेसवर हिरव्या, लाल, मरून, गुलाबी, जांभळ्या अशा रंगाच्या बांगड्या जास्त उठून दिसतात.

५. निळसर किंवा जांभळ्या रंगाचा ड्रेस किंवा साडी असेल तर त्यावर गुलाबी, हिरव्या, पिवळ्या किंवा गोल्डन रंगाच्या बांगड्या घालून पाहा.

६. चंदेरी आणि गोल्डन रंगाच्या साडीवर ब्लॅक रंगाच्या किंवा मल्टीकलर प्रकारातल्या बांगड्या छान दिसतात. 


 

Web Title : पुरानी हो गई मैचिंग चूड़ियाँ? साड़ी के रंग के अनुसार चुनें!

Web Summary : साड़ी और चूड़ियों के रंग का मिलान एक नया फैशन है। लाल साड़ी के लिए हरी या सफेद चूड़ियाँ अच्छी लगती हैं। गुलाबी या बैंगनी रंग की चूड़ियाँ हरी साड़ियों के साथ अच्छी लगती हैं। सुनहरी या चांदी की चूड़ियाँ काली साड़ियों के लिए सबसे अच्छी हैं। पीले रंग की साड़ियों के साथ हरे या बैंगनी जैसे विपरीत रंग अच्छे लगते हैं।

Web Title : Outdated matching bangles? Choose bangles according to saree color!

Web Summary : Matching saree and bangle colors is the new fashion trend. For red sarees, green or white bangles work well. Pink or purple bangles complement green sarees. Golden or silver bangles are best for black sarees. Contrast colors like green or purple enhance yellow sarees.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.