Lokmat Sakhi >Beauty > कोरडे-तेलकट केस चांगले राहण्यासाठी काय करावं? कोणते तेल ठरेल फायदेशीर, तज्ज्ञ सांगतात...

कोरडे-तेलकट केस चांगले राहण्यासाठी काय करावं? कोणते तेल ठरेल फायदेशीर, तज्ज्ञ सांगतात...

Dry oily hair care: Best oil for dry oily hair: Hair care tips for combination hair: केसगळती रोखण्यासाठी स्वयंपाकघरातील काही पदार्थांचा वापर करुन केसांना लावल्यास आपल्याला फायदा होईल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2025 16:05 IST2025-05-13T16:00:00+5:302025-05-13T16:05:01+5:30

Dry oily hair care: Best oil for dry oily hair: Hair care tips for combination hair: केसगळती रोखण्यासाठी स्वयंपाकघरातील काही पदार्थांचा वापर करुन केसांना लावल्यास आपल्याला फायदा होईल.

how to care dry and oil hair which hair oil best for hair falls doctor said how to stop hair problem simple home remedies | कोरडे-तेलकट केस चांगले राहण्यासाठी काय करावं? कोणते तेल ठरेल फायदेशीर, तज्ज्ञ सांगतात...

कोरडे-तेलकट केस चांगले राहण्यासाठी काय करावं? कोणते तेल ठरेल फायदेशीर, तज्ज्ञ सांगतात...

बदलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयींमुळे आपल्या आरोग्यावर जितका परिणाम होतो तितकाच आपल्या केसांवर होतो.(Dry oily hair care) लांबसडक केस हे आपल्या सौंदर्यात अधिक भर घालतात. यामुळे आपला चेहरा अधिक सुंदर दिसू लागतो. परंतु, मागच्या काही काळापासून केसांची वाढ खुंटणे, केसगळती, केस विरळ होणे, केसांत कोंडा होणे आणि केस सतत कोरडे होणे या समस्येला सामोरे जावे लागत आहे. (Best oil for dry oily hair)
केसांची कितीही काळजी घेतली तरी केस कोरडे तर पडतातच पण केसगळती देखील थांबत नाही. केसांच्या वाढीसाठी आपण अनेक महागड्या उत्पादनांचा वापर करतो.(Hair care tips for combination hair) विविध शॅम्पू आणि महागडे तेल यांचा देखील उपयोग करतो. परंतु कितीही काही केले तरी केसगळती काही थांबत नाही. काही घरगुती उपाय करुन केसांचे गळणे थांबते परंतु, काही वेळानंतर पुन्हा केसगळती सुरु होते.(How to maintain dry-oily scalp) अशावेळी नेमकं काय करावं समजत नाही. 

वयाच्या चाळिशीतही पांढरे केस होतील काळे, तेलात मिसळा एक गोष्ट- केसगळतीही थांबेल, सोपा घरगुती उपाय

बाहेरचे वाढते प्रदूषण, खराब पाणी यांचा केसांवर सर्वात जास्त परिणाम होतो. यामुळे केसगळती वाढते. अगदी लहानपणापासून आपल्या आई-आज्जीने केसांना तेल लावलं असेल. साध्या खोबऱ्याच्या तेलाने आपले केस सहज वाढायचे. ज्यामुळे केसांमध्ये कोंडा देखील होत नसे. परंतु, आता वाढत्या प्रदूषणामुळे केसांवर त्याचा परिणाम होताना पाहायला मिळाला आहे. तसेच केसांना तेल लावण्याची पद्धत चुकली की, केसळगती देखील वाढू लागते. अशावेळी तज्ज्ञ सांगतात की, केसगळती रोखण्यासाठी स्वयंपाकघरातील काही पदार्थांचा वापर करुन केसांना लावल्यास आपल्याला फायदा होईल. 

">

तज्ज्ञ म्हणतात की, केसगळती रोखण्यासाठी खोबऱ्याचे तेल चांगले आहे. आयुर्वेदिक तेल बनवण्यासाठी एक वाटी खोबऱ्याचे तेल त्यात १२ ते १५ कढीपत्त्याची पाने, अर्धी वाटी कांदा, मेथीचे दाणे आणि दोन चमचे आवळा पावडर हे मिक्सरमध्ये वाटून गाळून घ्या. ही पेस्ट तेलात शिजवा आणि केसांना लावा. या तेलांने केसांना हलक्या हाताने मसाज करा. तसेच केस धुताना खूप गरम पाणी आणि गार पाणी देखील केसांसाठी वापरु नये. केस धुतल्यानंतर हेअर ड्रायरचा वापर करु नका. केस नैसर्गिक पद्धतीने सुकू द्या.  केसांची योग्य पद्धतीने काळजी घेतल्यास केसगळती आणि कोरड्या केसांच्या समस्येपासून आपली सुटका होऊ शकते. 
 

Web Title: how to care dry and oil hair which hair oil best for hair falls doctor said how to stop hair problem simple home remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.