हल्ली कमी वयातच केस पांढरे होण्याचं प्रमाण खूप जास्त वाढलं आहे. केस पांढरे झाल्यावर ते पुन्हा काळे करण्यासाठी केमिकलयुक्त डाय वापरण्याची अनेकांना भीती वाटते. म्हणूनच अशावेळी हर्बल मेहेंदी लावण्याचा पर्याय अनेकांना आवडतो. पण मेहेंदी लावल्यानंतर केस रखरखीत होतात, कोरडे पडतात असंही काही जणांकडून ऐकलेलं असतं. मेहेंदी लावल्यानंतर केस कोरडे पडण्याचं कारण म्हणजे मेहेंदी लावण्याची चुकीची पद्धत. म्हणूनच आता केसांना मेहेंदी लावण्याची ही एक खास पद्धत पाहा. पुढे सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही केसांना मेहेंदी लावली तर केसांना छान रंग तर येईलच, पण केस छान सिल्की, चमकदार होतील.
केसांना मेहेंदी लावण्याची योग्य पद्धत
सगळ्यात आधी तुम्हाला जेवढी पाहिजे आहे तेवढी मेहेंदी एका भांड्यात काढून घ्या.
यानंतर गॅसवर पातेल्यामध्ये पाणी घाला आणि ते गरम करायला ठेवा. या पाण्यामध्ये १ चमचा जवस, १ चमचा तांदूळ, १ चमचा कलौंजी, १ चमचा मेथी दाणे असं सगळं घाला आणि पाणी उकळायला ठेवा.
एरंडेल तेलाचे फक्त काही थेंब त्वचेला देतील ६ जबरदस्त फायदे, 'या' पद्धतीने लावा- सौंदर्य खुलेल
यानंतर ७ ते ८ जास्वंदाची फुलं हातानेच बारीक कुस्करून घ्या. बीटरुटचे साधारण पाव वाटी बारीक काप घ्या. त्यामध्ये कोरफडीचा वाटीभर गर, दोन आवळ्यांच्या बारीक फोडी आणि अर्धा कांदा एवढं साहित्य मिक्सरच्या भांड्यात घाला आणि थोडं पाणी घालून त्याची अगदी बारीक पेस्ट करून घ्या.
ही पेस्ट गाळणीने किंवा सुती कपड्याने गाळून घ्या. आता हे पाणी मेहेंदीमध्ये टाका. तसेच वेगवेगळे पदार्थ घालून उकळून घेतलेलं पाणीही गाळून मेहेंदीमध्ये घाला. या दोन्ही पाण्यामध्ये मेहेंदी भिजवा.
सामान्य महिलेची मोठी झेप: बरं झालं नोकरीवरून काढलं, स्वत:चा व्यवसाय उभारून आज 'ती' झाली उद्योजक
मेहेंदी भिजविण्यासाठी शक्यतो लोखंडी कढईचाच वापर करा. आता ही मेहेंदी ३ ते ४ तास भिजू द्या आणि मग त्यात थोडे खोबरेल तेल किंवा बदाम तेल घालून मग ती केसांवर लावा. साधारणपणे २ ते ३ तासांनी केस धुवून घ्या. केसांना खूप छान रंग तर येईलच पण केस एकदम मऊ, सिल्की, चमकदार होतील.
