केसांच्या अनेक समस्या आजकाल आपल्यापैकी बऱ्याचजणांना खूप सतावतात. केसांच्या वेगवेगळ्या समस्यांपैकी केसगळती ही फारच कॉमन आणि स्त्री - पुरुष दोघांनाही तितकीच सतावणारी समस्या आहे. केसांतून कंगवा फिरवला की केस तुटून पडणे, अंघोळीच्या वेळी केसांचा पुंजका येणे यामुळे अनेकजणी चिंतेत पडतात. केसगळती थांबवण्यासाठी आपण सगळेचजण अनेक उपाय करुन पाहतो. केसगळती कायमची थांबवण्यासाठी घरगुती आणि नैसर्गिक उपाय करणेच फायदेशीर ठरते. केसांसाठी शाम्पू बदलून किंवा तेल लावूनही केस गळणे थांबत नसेल, तर केसांच्या मुळांना खऱ्या पोषणाची गरज असते. यासाठी एक साधे पण अत्यंत शक्तिशाली 'हेअर टॉनिक' किंवा 'मॅजिकल वॉटर' आपण घरीच तयार करु शकतो(how to apply onion juice for long and strong hair).
कोणतंही महागडं सीरम किंवा तेल नाही, तर फक्त एका खास नैसर्गिक पदार्थांपासून तयार केलेले पाणी सतत होणारी केसगळती थांबवण्यास मदत करते. हे पाणी केस धुण्याआधी दोन तास लावल्याने केसांची मुळे घट्ट होतात. केस धुण्यापूर्वी फक्त दोन तास आधी हे पाणी केसांना लावा आणि अवघ्या काही दिवसात फरक अनुभवा. हे जादुई पाणी नेमकं (nion juice home remedy for long hair) कशाचं आहे किंवा ते कसं तयार करायचं ते पाहूयात...
केसगळती थांबवण्यासाठी वापरा खास 'मॅजिकल वॉटर'...
केसगळती थांबवण्यासाठी खास घरच्याघरीच 'मॅजिकल वॉटर' तयार करण्यासाठी आपल्याला, १ कप कांद्याचा रस, १/२ कप पाणी, १ टेबलस्पून मध, १ टेबलस्पून सैंधव मीठ इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
हे खास मॅजिकल वॉटर कसं तयार करायचं?
सर्वात आधी एका कांद्याची साल काढून त्याचे तुकडे करून घ्या. हे तुकडे मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घ्या. आता ही पेस्ट एका सुती कापडात किंवा गाळणीत ठेवा आणि हाताने दाबून त्याचा सगळा रस एका वाटीत काढून घ्या. आता या कांद्याच्या रसात जेवढा रस आहे, तेवढ्याच प्रमाणात पाणी मिसळा. नंतर या मिश्रणात १ टेबलस्पून प्रमाणात मध घाला. मध तुमच्या केसांमधील ओलावा टिकवून ठेवण्यास आणि त्यांना मऊ करण्यास मदत करते. सर्वात शेवटी, यामध्ये अगदी थोडे मीठ टाका. आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करा. हे नॅचरल 'हेअर ग्रोथ सीरम' म्हणजेच जादुई पाणी वापरण्यासाठी तयार आहे. हे मॅजिकल वॉटर एअर टाईट कंटेनरमध्ये भरुन त्याचे झाकण लावून ३ दिवस म्हणजेच किमान ७२ तासांसाठी फर्मेंटेशन होण्यासाठी ठेवून द्यावे.
घरीच ५ रुपयांत हेअर कलर! पांढऱ्या केसांवर घरगुती रंगाची जादू - हेअर कलरिंग करणे होईल अगदी सोपे...
याचा वापर नेमका केसांसाठी कसा करावा ?
हे मिश्रण किमान ३ दिवस तसेच राहू द्या, ज्यामुळे ते अधिक चांगले फर्मेंट होईल आणि त्यातील पोषक तत्वे दुपटीने वाढतील. ३ दिवसांनंतर, केस धुण्यापूर्वी २ तास आधी हे सीरम केसांच्या मुळांशी आणि संपूर्ण केसांना नीट लावा. २ तासांनंतर एखाद्या सौम्य शाम्पूने केस स्वच्छ धुवून टाका.
हे मॅजिकल वॉटर केसांसाठी कसे आहे फायदेशीर ?
कांद्याच्या रसात सल्फरचे प्रमाण जास्त असते. सल्फर स्कॅल्पमधील छिद्रांना आवश्यक पोषण देण्याचे काम करते. हे सीरम लावल्यामुळे केसांची छिद्रे पुन्हा एकदा अॅक्टिव्ह होतात, ज्यामुळे नवीन केस येण्यास मदत होते. सल्फरमुळे केस पातळ होण्यापासून वाचतात आणि त्यांचे तुटणे कमी होते. कांद्याच्या रसात अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे केसांना अकाली पांढरे होण्यापासून रोखतात.
