Lokmat Sakhi >Beauty > आठवड्यात कितीवेळा केस धुणं महिलांसाठी फायद्याचं? जुन्या काळसारखं फक्त रविवारी की कितीहीवेळा...

आठवड्यात कितीवेळा केस धुणं महिलांसाठी फायद्याचं? जुन्या काळसारखं फक्त रविवारी की कितीहीवेळा...

Hair Wach Tips For Women: काहींना कन्फ्यूजन असतं की रोज केस धुवावे की नाही? किंवा किती वेळा धुवावेत? तुम्हाला सुद्धा असाच प्रश्न पडला असेल तर याबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

By अमित इंगोले | Updated: May 8, 2025 14:15 IST2025-05-08T13:10:15+5:302025-05-08T14:15:05+5:30

Hair Wach Tips For Women: काहींना कन्फ्यूजन असतं की रोज केस धुवावे की नाही? किंवा किती वेळा धुवावेत? तुम्हाला सुद्धा असाच प्रश्न पडला असेल तर याबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

How often should women wash their hair in a week | आठवड्यात कितीवेळा केस धुणं महिलांसाठी फायद्याचं? जुन्या काळसारखं फक्त रविवारी की कितीहीवेळा...

आठवड्यात कितीवेळा केस धुणं महिलांसाठी फायद्याचं? जुन्या काळसारखं फक्त रविवारी की कितीहीवेळा...

Hair Wach Tips For Women: महिलांच्या केसांच्या समस्या हा एक मोठा विषय आहे. कारण पुरूषांपेक्षा त्यांचे केस जास्त मोठे असतात आणि त्यामुळेच त्यांना केसांची अधिक काळजी घ्यावी लागते. नियमितपणे केसांना तेल लावणे, मालिश करणे, केस धुणे या गोष्टी पाळाव्या लागतात. केस धुण्याबाबत नेहमीच महिलांना प्रश्न पडत असतो की, त्यांनी आठवड्यातून किती वेळा केस धुवायला हवेत? तशा तर महिला सामान्यपणे आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा केस धुतात. पण काहींना कन्फ्यूजन असतं की रोज केस धुवावे की नाही? किंवा किती वेळा धुवावेत? (How Often You Should wash Your Hair) तुम्हाला सुद्धा असाच प्रश्न पडला असेल तर याबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार, जर तुमचे केस फार ऑयली असतील तर ते आठवड्यातून 2 ते 3 वेळा धुणं गरजेचं असतं. ऑयली स्कॅल्पवर म्हणजे डोक्याच्या त्वचेवर धूळ, माती, कोंडा जमा होतो, ज्यामुळे केस चिकट व खराब होतात. डोक्याला खाजही येते. तेच ड्राय केस असलेल्या महिलांनी आठवड्यातून केवळ 1 ते 2 वेळाच केस धुवायला हवेत. जेणेकरून केसांमध्ये नॅचरल ओलावा कायम राहील. त्याशिवाय जर डोक्याच्या त्वचेवर जास्त घाम येत असेल किंवा जास्त कोंडा असेल तर आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा केस धुणं चांगलं ठरेल. 

अनेक महिला केस धुण्यासाठी शाम्पू किंवा साबण वापरतात. जर तुम्ही रोज केस धुवत असाल तर केसांमधील नॅचरल ऑइल नष्ट होतं, ज्यामुळे केस रखरखीत आणि कमजोर होतात. पुन्हा पुन्हा शाम्पू केल्यानं डोक्याची त्वचा कोरडी होते. ज्यामुळे कोंडा आणि केसगळतीची समस्या वाढते. त्यामुळे केस जास्त वेळा धुणं टाळलं पाहिजे. तसेच शाम्पू आणि कंडिशनरची निवड केसांच्या टाइपनुसार करावी. जर केस कलर केले असतील तर सल्फेट-फ्री आणि माइल्ड शाम्पू लावा. ऑयली केसांसाठी क्लेरिफाइंग शाम्पू आणि ड्राय केसांसाठी मॉइस्चरायजिंग शाम्पू अधिक चांगलं ठरेल.

अनेक महिला रोज वर्कआउट करतात किंवा काही महिलांना उन्हाळ्यात जास्त घाम येतो. अशावेळी केस शाम्पूऐवजी साध्या पाण्यानं धुवावेत किंवा ड्राय शाम्पूचा वापर करावा. यानं डोक्याच्या त्वचेला आराम मिळेल आणि केस सुरक्षित राहतील. 

हेल्थ एक्सपर्ट्सनुसार, आठवड्यातून केस किती वेळा धुवावे याचा काही फिक्स असा नियम नाही. पण सामान्यपणे 2 ते 3 वेळा केस धुणे जास्तीत जास्त महिलांसाठी जास्त फायदेशीर ठरतं. यानं केसांची क्वालिटी, डोक्याची त्वचा चांगली राहते.

Web Title: How often should women wash their hair in a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.