Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > दोन, तीन की रोज... आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत? एक चुकीची सवय अन् पडू शकते टक्कल!

दोन, तीन की रोज... आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत? एक चुकीची सवय अन् पडू शकते टक्कल!

How often to wash hair: Hair washing routine: Hair fall causes: आपल्या केसांनुसार आठवड्यातून किती वेळा केस धुवायला हवे हे देखील समजणं गरजेचं आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2026 13:12 IST2026-02-26T13:11:32+5:302026-02-26T13:12:08+5:30

How often to wash hair: Hair washing routine: Hair fall causes: आपल्या केसांनुसार आठवड्यातून किती वेळा केस धुवायला हवे हे देखील समजणं गरजेचं आहे.

How many times should I wash my hair per week Does washing hair daily cause hair fall Best hair washing routine for hair growth How to prevent hair loss naturally Hair wash frequency for oily scalp | दोन, तीन की रोज... आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत? एक चुकीची सवय अन् पडू शकते टक्कल!

दोन, तीन की रोज... आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत? एक चुकीची सवय अन् पडू शकते टक्कल!

केस हा आपल्या सौंदर्याचा एक अविभाज्य भाग आहे. आपल्या प्रत्येकाला केस लांब, दाट आणि चमकदार हवे असतात. पण धावपळीची जीवनशैली, वाढते प्रदूषण आणि चुकीच्या सवयींमुळे केस गळतीची समस्या घराघरात पाहायला मिळते.(How often to wash hair)  केसगळती सुरु झाली की आपण महागडे शाम्पू, तेल किंवा सीरम बदलतो पण त्याच्या मुख्य कारणांकडे कायम दुर्लक्ष केले जाते. ते कारण म्हणजे केस धुण्याची पद्धत. (Hair washing routine)
अनेकांना सवय असते की ते रोज केस धुतात, तर काही जण आठवड्यातून एकदाच केस धुतात. पण केस धुण्याच्या एका चुकीच्या सवयीमुळे आपल्याला कायमचे टक्कल पडू शकते.  आपल्या टाळूमध्ये (Scalp) नैसर्गिक तेल असतात, जी केसांच्या मुळांना पोषण देतात.(Hair fall causes) जर आपण चुकीच्या पद्धतीने किंवा गरजेपेक्षा जास्त वेळा केस धुत असू, तर ही नैसर्गिक तेल नष्ट होतात ज्यामुळे केस कोरडे होऊन तुटू लागतात. याउलट, खूप कमी वेळा केस धुण्यामुळे टाळूवर घाण आणि 'सीबम' साचतो, ज्यामुळे कोंडा (Dandruff) आणि इन्फेक्शन होऊन केस मुळापासून गळू लागतात. त्यामुळे आपल्या केसांनुसार आठवड्यातून किती वेळा केस धुवायला हवे हे देखील समजणं गरजेचं आहे. 

शेपवेअरची कटकट विसरा , साडी नेसल्यावर उंच आणि स्लिम दिसण्यासाठी ५ मॅजिक ट्रिक्स; दिसेल परफेक्ट फिगर

1. केस धुण्याची पद्धत ही पूर्णपणे आपल्या केसांच्या प्रकारावर आणि जीवनशैलीवर अवलंबून असते. चुकीच्या वेळी शाम्पू वापरणं म्हणजे केसांच्या आरोग्याशी खेळण्यासारखे आहे. 

2. ज्यांचे केस लवकर तेलकट होतात. त्यांच्या टाळूवरील ग्रंथी जास्त सीबम तयार करतात. अशा लोकांनी आठवड्यातून ४ ते ५ वेळा केस धुवायला हवे. केस न धुतल्यास टाळूतील छिद्रे बंद होऊन केसगळती वाढते. यासाठी रोज शाम्पू लावणं टाळा, त्याऐवजी सौम्य शाम्पूचा वापर करा. 

3. कोरड्या केसांमध्ये नैसर्गिक ओलावा कमी असतो. आपण असे केस वारंवार धुता, तर ते अधिक राठ आणि निर्जीव होतात. कोरड्या केसांसाठी आठवड्यातून १ ते २ वेळाच शाम्पू करणे पुरेसे आहे. केस धुतल्यानंतर चांगल्या कंडिशनरचा वापर करा. 

4. आपले केस तेलकट किंवा कोरडे नसतील तर आठवड्यातून २ ते ३ वेळा केस धुवा शकता. यामुळे केसांमधील नैसर्गिक तेलाचा समतोल राखला जातो आणि केसही स्वच्छ राहतात. केस धुण्यासाठी कधीही खूप गरम पाण्याचा वापर करु नका. कोमट किंवा थंड पाण्याने केस धुवा. शाम्पू टाळूवर लावा आणि हलक्या हाताने केसांना मसाज करा. ओले केस जोरात टॉवेलने घासू नका. 

Web Title : बालों को कितनी बार धोएं? गंजापन रोकने के लिए इस आदत से बचें!

Web Summary : बालों को बहुत ज़्यादा या बहुत कम धोना नुकसानदायक हो सकता है। धोने की आवृत्ति बालों के प्रकार पर निर्भर करती है: तैलीय (4-5 बार/सप्ताह), सूखे (1-2 बार/सप्ताह), या सामान्य (2-3 बार/सप्ताह)। सौम्य शैम्पू और गुनगुने पानी का प्रयोग करें।

Web Title : How Often to Wash Hair? Avoid This Habit to Prevent Baldness!

Web Summary : Washing hair too often or too little can damage it. The frequency depends on hair type: oily (4-5 times/week), dry (1-2 times/week), or normal (2-3 times/week). Use gentle shampoo and lukewarm water.