Join us
Daily Top 2Weekly Top 5

चुकीच्या पद्धतीने केसांना तेल लावल्यास पडते टक्कल, आठवड्यातून 'इतक्या' वेळा लावा; केसगळती होईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2026 14:08 IST

hair oiling mistakes: hair fall solution: reduce hair fall naturally: टक्कल पडण्यापूर्वी केसांना तेल कसे लावायला हवे पाहूया.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रदूषण आणि वाढत्या तणावामुळे केसळतीच्या समस्यांना अनेकांना सामोरे जावे लागत आहे. आरशासमोर उभे राहिल्यावर कंगव्यात अडकलेले केसांचे पुंजके पाहिले की आपल्याला अधिक टेन्शन येते.(hair oiling mistakes) आता टक्कलच पडते की काय असा प्रश्न सतावतो. पूर्वी टक्कल पडणे किंवा केस पांढरे होणे हे वयानुसार होणारे बदल मानले जायचे, पण आज विशी-तिशीतच अनेक मुला-मुलींच्या डोक्यावरचे केस विरळ दिसू लागले आहे.(hair fall solution)

अनेकांना वाटते की रोज तेल लावल्याने केस मजबूत होतात, तर काहींना वाटते की तेल लावल्याने केस जास्त गळतात.(reduce hair fall naturally) जर आपण चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीच्या वेळी तेल लावले, तर आपले केस अधिक वेगाने गळू शकतात. म्हणूनच, टक्कल पडण्यापूर्वी केसांना तेल कसे लावायला हवे पाहूया.

पपई चिरण्याची भन्नाट युक्ती, १ स्टिलचा डबा-१ सुरी एवढं फक्त घ्या- बघा झटपट काम तज्ज्ञ म्हणतात की योग्य प्रमाणात तेल लावणं महत्त्वाच आहे. जास्त तेल लावल्याने टाळूचे छिद्र बंद होतात, ज्यामुळे केस गळतात. तर योग्य प्रमाणात लावल्याने केसांच्या फॉलिकल्सचे प्रभावीपणे पोषण होते. आठवड्यातून २ ते ३ वेळा केसांना तेल लावणं पुरेसे असते. जर आपली टाळू खूप कोरडी असेल तर आठवड्यातून ३ वेळा तेल लावायला हवे. जर आपली त्वचा अधिक तेलकट असेल तर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तेल लावायला हवे. रोज तेल लावल्याने टाळूवर घाण आणि धूळ चिकटते. ज्यामुळे केसांची मुळे कमकुवत होतात आणि केस गळती वाढते. 

केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत 

तेल थोडे कोमट करुन केसांना लावल्यास ते मुळांमध्ये लवकर शोषले जाते. बोटांच्या मदतीने टाळूला ५ ते १० मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. जास्त जोरात घासल्याने केस तुटतात. तेल लावल्यानंतर १ ते २ तास ठेवा. शक्य असेल तर रात्री तेल लावून सकाळी केस धुवावेत. 

केसांना नुसते तेल लावून टक्कल पडत नाही. त्यासोबतच ओल्या केसांत कंगवा न फिरवणे, आहारात प्रथिने आणि लोहाचा समावेश करा आणि भरपूर पाणी प्या. केस धुण्यासाठी सौम्य (Sulphate-free) शाम्पूचा वापर करा.

English
हिंदी सारांश
Web Title : Oiling hair wrong causes baldness; oil this often to reduce fall.

Web Summary : Incorrect hair oiling can worsen hair fall. Oil 2-3 times weekly, gently massaging. Avoid daily oiling as it attracts dirt. Use mild shampoo and a protein-rich diet.
टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी