Lokmat Sakhi >Beauty > केसांना महिन्यातून किती वेळा मेहेंदी लावावी? १ चूक- कोंडा वाढवते, केसही होतात कोरडे- पाहा योग्य पद्धत

केसांना महिन्यातून किती वेळा मेहेंदी लावावी? १ चूक- कोंडा वाढवते, केसही होतात कोरडे- पाहा योग्य पद्धत

Henna for hair : Henna hair care tips: Hair care routine with henna: मेहेंदी लावण्याची योग्य वेळ, पद्धत कोणती जाणून घेऊया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2025 13:48 IST2025-09-11T13:46:42+5:302025-09-11T13:48:26+5:30

Henna for hair : Henna hair care tips: Hair care routine with henna: मेहेंदी लावण्याची योग्य वेळ, पद्धत कोणती जाणून घेऊया.

How many times a month should I apply henna for healthy hair Mistakes to avoid when applying henna on hair | केसांना महिन्यातून किती वेळा मेहेंदी लावावी? १ चूक- कोंडा वाढवते, केसही होतात कोरडे- पाहा योग्य पद्धत

केसांना महिन्यातून किती वेळा मेहेंदी लावावी? १ चूक- कोंडा वाढवते, केसही होतात कोरडे- पाहा योग्य पद्धत

केसांना नैसर्गिक काळे करण्यासाठी, चमकवण्यासाठी मेहेंदीचा वापर हा प्राचीन काळापासून करण्यात आला आहे.(Henna for hair) आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आपण केसांना डाय करण्यासाठी आपण अनेक केमिकल्स उत्पादनांचा वापर करतो. ज्यामुळे केस काळे तर होतात, पण केसांचा पोत खराब होतो. केसांमध्ये कोंडा वाढून कोरडेपणा देखील वाढतो.( Henna hair care tips) परंतु केसांची योग्य प्रकारे काळजी घेतल्यास केसांची चमक वाढते. (Hair care routine with henna)
अनेकांदा केसांना मेहेंदी लावल्यानंतर केस कोरडे होतात, रंग नीट बसत नाही किंवा केसांची चमक देखील हरवते.(Natural hair color tips) केस पांढरे होऊ लागले की, आपण एकाच आठवड्यात केसांना दोनदा मेहेंदी लावतो. अशामुळे केसांवर परिणाम होतो आणि ते अधिक कोरडे होतात.(Prevent dandruff with henna) पण मेहेंदी लावण्याची योग्य वेळ, पद्धत कोणती जाणून घेऊया.(Dry hair solutions) 

गव्हाच्या पिठात कालवून लावा ‘हा’ पदार्थ, फेसवॉश-क्रिम विसराल इतकी त्वचा होइल मऊ-पिंपल्स गायब

सर्वसाधारणपणे केसांना मेहेंदी लावण्याची योग्य वेळ ही दर ३ ते ४ आठवड्यांनी असायला हवी. केसांना रंगवण्यासाठी आणि त्यांचे पोषण करण्यासाठी इतका कालावधी पुरेसा आहे. जर आपण फक्त केसांना रंगवण्यासाठी मेहेंदीचा वापर करत असू तर महिन्यातून एकदा मेहेंदी लावा. आपले केस सतत पांढरे होत असतील तर आपण १५ ते २० दिवसांतून एकदा मेहेंदी लावायला हवी. यामुळे केसांवर मेहेंदीचा रंग टिकून राहिल आणि वारंवार रंगवण्याची गरज भासणार नाही. 

केसांना मेहेंदी लावल्याने नैसर्गिक रंग मिळतो. तसेच डोक्याच्या त्वचेला थंडावा मिळतो. कोंडा आणि खाज सुटण्यापासून आराम मिळतो. केस मजबूत आणि चमकदार बनतात. केसांना जास्त वेळ मेहेंदी लावल्यास आपले केस कोरडे होऊ शकतात. म्हणून जर केस कोरडे असतील तर त्यात दही, अंडी किंवा नारळाच्या दुधात मिसळून मेहेंदी लावायला हवी. रासायनिक असलेली मेहेंदी केसांना लावणे टाळा. नेहमी नैसर्गिक आणि सेंद्रिय मेहेंदी वापरा. मेहेंदी लावल्यानंतर केस पूर्ण धुवा आणि मग शाम्पूने केस धुवा. केसांना जास्त प्रमाणात मेहेंदी लावणं देखील नुकसानदायक ठरु शकतं. 
 

Web Title: How many times a month should I apply henna for healthy hair Mistakes to avoid when applying henna on hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.