'केस' हे आपल्या सौंदर्याचा महत्त्वाचा भाग आहेत. लांबसडक, घनदाट, काळेभोर केस प्रत्येकीला हमखास आवडतात, असे असले तरी प्रत्येकीचे केस तसे असतीलच असे नाही. सध्याच्या बदलत्या लाईफस्टाईलमध्ये, केसांच्या एक ना अनेक समस्या खूपच सतावतात. केस गळणे, केस अकाली पांढरे होणे, केसांची वाढ खुंटणे, केसांना फाटे फुटणे अशा वेगवेगळ्या समस्यांमुळे केसांचे नैसर्गिक सौंदर्य हरवते. केसांच्या याच समस्या कमी करण्यासाठी आपण रोज वेगवेगळे उपाय करून पाहतो, परंतु काहीवेळा त्याचा फारसा फरक देखील दिसून येत नाही. अशावेळी केसांचे नैसर्गिक सौंदर्य पुन्हा आणण्यासाठी घरगुती उपाय करणे फायदेशीर ठरते. आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक पदार्थ दडलेले असतात, जे केसांच्या वाढीसाठी एखाद्या औषधाप्रमाणेच काम करतात( hair growth hair pack).
केसांच्या अनेक समस्या थांबवून त्यांना काळेभोर आणि लांबसडक करण्यासाठी कोणता घरगुती उपाय फायदेशीर ठरतो ते पाहूयात. महागड्या ट्रिटमेंटवर हजारो रुपये खर्च करण्याऐवजी फक्त एकदा हा घरगुती हेअर मास्क वापरून पहा. केसांच्या मुळांना पोषण देऊन त्यांना नैसर्गिकरित्या वाढवण्याची ताकद या उपायांमध्ये आहे. केसांच्या प्रत्येक समस्येवर रामबाण उपाय ठरतील असा खास हेअर मास्क...
केसांच्या अनेक समस्यांवर एक खास आयुर्वेदिक रामबाण उपाय...
केसांच्या अनेक समस्यांवर खास घरगुती उपाय करण्यासाठी आपल्याला, प्रत्येकी १ टेबलस्पून मेथी दाणे, कलौंजी, जिरे, मोहरी, चिया सीड्स, कडीपत्ता, आवळा पावडर किंवा सुक्या आवळ्याच्या फोडी इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
हेअर मास्क बनवण्याची पद्धत...
केसांसाठी हा घरगुती हेअर मास्क तयार करण्यासाठी, एका पॅनमध्ये प्रत्येकी १ टेबलस्पून मेथी दाणे, कलौंजी, जिरे, मोहरी, चिया सीड्स, कडीपत्ता, आवळा पावडर किंवा सुक्या आवळ्याच्या फोडी घेऊन सर्व पदार्थ व्यवस्थित भाजून घ्या. या सर्व गोष्टी हलक्या तपकिरी होईपर्यंत भाजाव्यात; लक्षात ठेवा की त्या पूर्णपणे जळणार नाहीत याची काळजी घ्यावी. त्यानंतर, भाजलेले हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये घालून त्याची बारीक पावडर करून घ्या. आता तुमच्या हेअर मास्कसाठी पावडर तयार आहे.
वापरण्याची पद्धत...
जेव्हा तुम्हाला हा मास्क केसांना लावायचा असेल, तेव्हा आवश्यकतेनुसार पावडर एका वाटीत घ्या. त्यामध्ये मोहरीचे तेल (Mustard Oil) आणि ऑलिव्ह ऑइल (Olive Oil) मिसळून एक पेस्ट तयार करा. हा मास्क केसांच्या मुळांपासून ते केसांच्या टोकापर्यंत व्यवस्थित लावा.
ही पावडर आपण एकदाच बनवून एक महिन्यापर्यंत व्यवस्थित स्टोअर करून ठेवू शकता. तुमच्या केसांच्या लांबीनुसार आणि महिनाभराच्या गरजेनुसार ही पावडर तयार करा आणि महिनाभर आरामात वापरा. केसांवर लावलेली ही पेस्ट ३० मिनिटे ते तासभर केसांवर लावून ठेवू शकता. त्यांनतर शाम्पूचा वापर न करता केस स्वच्छ धुवून घ्या. या उपायामुळे केसांच्या मुळांना मजबूती मिळते आणि केसांची वाढ वेगाने होण्यास मदत होते.
