Lokmat Sakhi >Beauty > मूठभर तुळशीची पाने, चमचाभर गुलाबपाणी, केसांसाठी करा औषधी टोनर - असरदार घरगुती उपाय...

मूठभर तुळशीची पाने, चमचाभर गुलाबपाणी, केसांसाठी करा औषधी टोनर - असरदार घरगुती उपाय...

Using tulsi leafe toner for hair can give you stronger, dandruff-free hair : Homemade Tulsi Leafe Toner For Hair care : Homemade Tulsi Toner For Hair : केस निरोगी, मजबूत व सुंदर ठेवण्यासाठी तुळशीच्या पानांचा टोनर हा सोपा पण फायदेशीर उपाय करून पाहा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2025 14:25 IST2025-07-01T12:38:04+5:302025-07-01T14:25:38+5:30

Using tulsi leafe toner for hair can give you stronger, dandruff-free hair : Homemade Tulsi Leafe Toner For Hair care : Homemade Tulsi Toner For Hair : केस निरोगी, मजबूत व सुंदर ठेवण्यासाठी तुळशीच्या पानांचा टोनर हा सोपा पण फायदेशीर उपाय करून पाहा.

Homemade Tulsi Toner For Hair Homemade Tulsi Leafe Toner For Hair care Using tulsi leafe toner for hair can give you stronger, dandruff-free hair | मूठभर तुळशीची पाने, चमचाभर गुलाबपाणी, केसांसाठी करा औषधी टोनर - असरदार घरगुती उपाय...

मूठभर तुळशीची पाने, चमचाभर गुलाबपाणी, केसांसाठी करा औषधी टोनर - असरदार घरगुती उपाय...

केस म्हटलं की ते काळेभोर, घनदाट, लांबसडकच असावेत असे प्रत्येकीला वाटते. आपले केस आपल्याला हवे तसेच कायम असतील असे नाही. प्रत्येकीला केसांचा काही ना काही प्रॉब्लेम असतोच. केस रुक्ष-निस्तेज होणे, केसगळती, केसांची वाढ खुंटणे, केस पातळ होणे यांसारख्या अनेक समस्या सतावतात. केसांच्या (Using tulsi leafe toner for hair can give you stronger, dandruff-free hair)  या समस्या कमी करण्यासाठी (Homemade Tulsi Leafe Toner For Hair care) आपण काहीवेळा घरगुती उपाय करण्यावरच अधिक भर देतो. केसांसाठी घरगुती उपाय करण्यासाठी आपल्या दारातील हिरवीगार तुळशीची पाने अनेकप्रकारे फायदेशीर ठरतात(Homemade Tulsi Toner For Hair).

आयुर्वेदात तुळशीच्या पानांना औषधी मानलं गेलं आहे, तुळशीची पानं केसांसाठी वरदान ठरतात. यासाठीच, तुळशीच्या पानांचे घरगुती टोनर उपयुक्त ठरु शकते.  तुळशीच्या पानांचे टोनर तयार करून केसांसाठी वापरल्यास केसांना पोषण मिळते, स्कॅल्पवरील बॅक्टेरिया कमी होतात, आणि केसगळती थांबते. शिवाय, तुळशीच्या सुगंधामुळे केसांना फ्रेशनेस येतो. केस निरोगी, मजबूत आणि सुंदर ठेवण्यासाठी तुळशी पानांचा टोनर हा सोपा पण फायदेशीर उपाय नक्कीच करून पाहा. केसांसाठी तुळशीच्या पानांचे टोनर कसे तयार करायचे ते पाहूयात. 

तुळशीच्या पानांचे घरगुती टोनर केसांवर करेल जादू... 

तुळशीच्या पानांचे घरगुती टोनर तयार करण्यासाठी १० ते १५ तुळशीची पाने, ग्लासभर पाणी आणि १ टेबलस्पून गुलाबपाणी इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. 

तुळशीच्या पानांचा टोनर कसा करायचा ? 

तुळशीच्या पानांचा टोनर तयार करण्यासाठी सर्वातआधी एका भांड्यात ग्लासभर पाणी घेऊन ते हलके उकळवून घ्यावे. पाण्याला हलकी उकळी आल्यानंतर त्यात थोडे गुलाबपाणी आणि तुळशीची पाने घालावीत. आता हे सगळे मिश्रण एकजीव करून त्याला एक हलकी उकळी येऊ द्यावी. पाणी उकळवून झाल्यानंतर गॅस बंद करा आणि पाणी पूर्णपणे थंड होऊ द्या. पाणी संपूर्णपणे थंड झाल्यावर गाळून एका स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्यावे. 

स्वयंपाक घरातील 'या' पदार्थाने करा मसाज! डार्क सर्कल्स गायब - डोळे दिसतील सुंदर,आकर्षक...

दिसाल इतक्या सुंदर की बघत राहिल प्रत्येकजण! ‘या’ घरगुती सीरमचे फक्त २ थेंब करतात जादू...

तुळशीच्या पानांच्या टोनरचा वापर केसांवर कसा करावा? 

स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवलेले टोनर आपण रोज रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यावर केसांवर स्प्रे करु शकता. टोनर स्काल्पवर स्प्रे केल्यानंतर बोटांच्या मदतीने हलक्या हाताने स्काल्पचा मसाज देखील करून घ्यावा. त्यानंतर हे टोनर केसांवर तसेच राहू द्यावे, केस धुण्याची गरज नाही. आठवड्यातून आपण हे टोनर केसांवर ४ ते ५ वेळा वापरु शकतो. याचबरोबर, केस धुतल्यावर देखील आपण या टोनरचा वापर करु शकतो. 

१ चमचा खोबरेल तेल-१ चिमूट तुरटी, चेहरा इतका चमकेल की मैत्रिणी विचारतील फेशियलचं नाव...

तुळशीच्या पानांचा टोनर वापरण्याचे फायदे...     

१. केसागळती कमी करून केसांची मुळं मजबूत करतो.

२. स्काल्पवरील इन्फेक्शन आणि डॅंड्रफ दूर ठेवतो.

३. केस मऊमुलायम, चमकदार आणि सुंदर दिसतात.

४. टोनरने मसाज केल्यामुळे स्काल्पला चांगल्या पद्धतीने रक्तपुरवठा होतो आणि केसांची वाढ होण्यास मदत होते.


Web Title: Homemade Tulsi Toner For Hair Homemade Tulsi Leafe Toner For Hair care Using tulsi leafe toner for hair can give you stronger, dandruff-free hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.