मजबूत, घनदाट आणि सुंदर केसांसाठी केसांसोबतच स्काल्पची देखील काळजी घेणे गरजेचे असते. खरंतर, आपली स्काल्प जितकी हेल्दी तितकेच आपले केसही हेल्दी (Homemade Scalp Cleaning Mask) आणि सुंदर राहण्यास मदत होते. आपण केसांची योग्य ती काळजी घेण्यासाठी आठवड्यातून किमान दोन वेळा केस स्वच्छ धुतो. केस स्वच्छ धुवून (Homemade Scalp Cleaning Mask For Itchy Scalp Relief ) आपण केसांची निगा राखतो पण स्काल्पच्या स्वच्छतेचा विचार आपण (Effective Homemade Scalp Cleaning Mask) बहुतेकजण करतच नाही. केस स्वच्छ धुतले म्हणजेच स्काल्पची देखील स्वच्छता झाली असेल आपण मानतो, परंतु हे चुकीचे आहे. कारण केसांप्रमाणेच आपली स्काल्प देखील दिवसभरात धूळ, माती, प्रदूषण यामुळे खराब होते.
आपल्या स्काल्पवर धूळ, माती, घाम चिकटून त्यांचा थर तयार झालेला असतो. ज्यामुळे स्काल्पचे आरोग्य आणि सौंदर्य दोन्ही बिघडू शकते. अशा प्रकारे स्काल्पचे आरोग्य खराब झाले तर केसांच्या अनेक समस्या सतावू लागतात. यासाठीच स्काल्पच्या स्वच्छतेसाठी फक्त शाम्पूचा वापर न करता आपण काही नैसर्गिक पदार्थांचा वापर करून घरगुती स्काल्प क्लिनिंग लेप तयार करु शकतो. हा घरगुती स्काल्प क्लिनिंग लेप घरच्या घरीच कसा तयार करायचा ते पाहूयात.
साहित्य :-
१. रिठा पावडर - १ टेबलस्पून
२. त्रिफळा पावडर - १ टेबलस्पून
३. शिकेकाई पावडर - १ टेबलस्पून
४. ताक - १/२ कप
कतरिना केसांना लावते तिच्या सासूबाईंनी तयार केलेलं खास तेल, पाहा या घरगुती तेलाची सिक्रेट रेसिपी...
फक्त वाटीभर बेसन पिठात मिसळा 'हे' ६ पदार्थ, विकतचे फेसमास्क जाल विसरुन - त्वचा दिसेल सुंदर....
कृती :-
१. सगळ्यांत आधी एका बाऊलमध्ये रिठा, त्रिफळा, शिकेकाई पावडर घ्यावी.
२. त्यानंतर या पावडर चमच्याने हलवून एकजीव करून घ्याव्यात.
३. सगळ्यांत शेवटी या पावडरमध्ये ताजे घरगुती तयार केलेले ताक ओतावे.
४. आता चमच्याने कालवून हे सगळे मिश्रण हलवून एकजीव करून घ्यावे.
५. तयार मिश्रण एका काचेच्या एअर टाईट कंटेनरमध्ये भरुन स्टोअर करून ठेवावे.
केस बिच्चारे, चुकीच्या शाम्पूचे बळी! केसांच्या प्रकारानुसार निवडा शाम्पू, पाहा ‘हे’ घटक आहेत का?
या स्काल्प क्लिनिंग लेपचा वापर कसा करावा ?
हा स्काल्प क्लिनिंग लेप आपण एकदाच आठवड्याभरासाठी तयार करून ठेवू शकतो किंवा जेव्हा वापरायचा तेव्हा ताजा तयार करून देखील वापरु शकतो. हा स्काल्प क्लिनिंग लेप बोटांवर घेऊन तो स्काल्पला लावून घ्यावा. त्यानंतर हलक्या हाताने स्काल्पला मसाज करून घ्यावा. मग ३० मिनिटे हा लेप स्काल्पवर तसाच लावून ठेवावा.
३० मिनिटानंतर कोणत्याही हर्बल शाम्पूने केस आणि स्काल्प स्वच्छ धुवावे. एका धुण्यातच आपल्याला फरक दिसून येईल. हा स्काल्प क्लिनिंग लेप वापरल्याने स्काल्पला चिकटलेली धूळ, माती, प्रदूषण सहजपणे काढून स्काल्पची स्वच्छता ठेवता येईल.