Join us  

फक्त १ मिनिटात घरच्याघरी तयार करा सॅफ्राॅन नाईट क्रिम, डार्क स्पॉट्स- पिंपल्स येणार नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2024 9:11 AM

Night Cream For Young And Beautiful Skin: रोज रात्री झोपण्यापुर्वी चेहऱ्याला या होममेड क्रिमने मसाज करा. डार्क स्पॉट्स, डार्क सर्कल्स, पिंपल्सचा त्रास कायमचा कमी होऊन त्वचा होईल सुंदर. (Homemade saffron night cream for reducing dark spots and pimples)

ठळक मुद्दे एअर टाईट डबीमध्ये ठेवल्यास एक महिना तुम्ही हे क्रिम वापरू शकता. त्वचेवर सुरकुत्या येण्याचं प्रमाण कमी होऊन त्वचा तरुण दिसेल. 

आपली चेहऱ्याची त्वचा अतिशय नाजूक, संवेदनशील असते. आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा त्वचेला कायमच ऊन, धूळ, धूर यांचा सामना करावा लागतो. त्याचा परिणाम त्वचेवर लगेच दिसून येतो आणि मग त्वचेचा पोत खराब दिसू लागतो. चेहऱ्यावर खूप डार्क स्पॉट्स, पिंपल्स येतात. डोळ्यांखाली काळी वर्तूळे दिसू लागतात. त्वचेच्या या सगळ्या तक्रारी दूर करण्यासाठी घरच्याघरी हा एक सोपा उपाय करून पाहा (Homemade saffron night cream for reducing dark spots and pimples). हा उपाय करण्यासाठी आपण केशर आणि इतर काही साहित्य वापरून नाईट क्रिम तयार करणार आहोत (night cream for young and beautiful skin). एअर टाईट डबीमध्ये ठेवल्यास एक महिना तुम्ही हे क्रिम वापरू शकता. (home remedies for getting radiant glow)

 

डार्क स्पॉट्स- पिंपल्स कमी करण्यासाठी नाईट क्रिम

डार्क स्पॉट्स पिंपल्स कमी करण्यासाठी नाईट क्रिम कसं तयार करायचं याविषयीची माहिती त्वचारोग तज्ञ डॉ. रिंकी कपूर यांनी indianexpress.com यांच्याशी बोलताना दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार नाईट क्रिम कसं तयार करायचं ते पाहूया..

बागेत छानसा वेल चढवायचा? बघा ५ प्रकारचे वेल- दिसायला मोहक आणि वाढतील भराभर

साहित्य

केशराच्या ८ ते १० काड्या

२ टेबलस्पून ॲलोव्हेरा जेल

२ व्हिटॅमिन ई कॅप्सूल

१ टेबलस्पून बदाम तेल

गुलाब पाण्याचे ५ ते ६ थेंब

 

कृती

सगळ्यात आधी एका पेपर नॅपकिनमध्ये केशराच्या काड्या गुंडाळा आणि तो नॅपकिन तव्यावर ठेवून केशर थोडं गरम करून घ्या.

आता एका डबीमध्ये केशराच्या गरम केलेल्या काड्या, व्हिटॅमिन ई कॅप्सूल, बदाम तेल, गुलाब पाणी, ॲलोव्हेरा जेल असं सगळं टाका आणि मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. 

संक्रांतीला वाण म्हणून ५० रुपयांपेक्षाही कमी किमतीत लुटता येतील सुंदर दागिने- बघा आकर्षक पर्याय

रोज रात्री झोपताना या क्रिमने त्वचेला मसाज करा. यामुळे डार्क स्पॉट्स, पिंपल्स तर जातीलच पण त्वचाही सुंदर- नितळ होईल.

त्वचेवर सुरकुत्या येण्याचं प्रमाण कमी होऊन त्वचा तरुण दिसेल.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी