Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > डाळिंब खा आणि सालीचा करा हेअर डाय! पांढऱ्या केसांवर ५ रुपयांचा उपाय असरदार - पांढरे केस होतील काळेभोर...

डाळिंब खा आणि सालीचा करा हेअर डाय! पांढऱ्या केसांवर ५ रुपयांचा उपाय असरदार - पांढरे केस होतील काळेभोर...

homemade pomegranate peel hair dye for white hair : pomegranate peel hair dye for grey hair : natural hair dye from pomegranate peel : pomegranate peel hair color for white hair : आता पार्लरचा खर्च वाचणार! फक्त ५ रुपयांत डाळिंबाच्या सालीपासून तयार करा नॅचरल हेअर डाय, पांढरे केस होतील गायब.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2026 19:58 IST2026-01-17T19:37:28+5:302026-01-17T19:58:34+5:30

homemade pomegranate peel hair dye for white hair : pomegranate peel hair dye for grey hair : natural hair dye from pomegranate peel : pomegranate peel hair color for white hair : आता पार्लरचा खर्च वाचणार! फक्त ५ रुपयांत डाळिंबाच्या सालीपासून तयार करा नॅचरल हेअर डाय, पांढरे केस होतील गायब.

homemade pomegranate peel hair dye for white hair pomegranate peel hair dye for grey hair pomegranate peel hair color for white hair | डाळिंब खा आणि सालीचा करा हेअर डाय! पांढऱ्या केसांवर ५ रुपयांचा उपाय असरदार - पांढरे केस होतील काळेभोर...

डाळिंब खा आणि सालीचा करा हेअर डाय! पांढऱ्या केसांवर ५ रुपयांचा उपाय असरदार - पांढरे केस होतील काळेभोर...

'डाळिंब' आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे आपल्याला ठाऊक आहेच, पण डाळिंब खाल्ल्यानंतर आपण ज्या साली कचरा समजून फेकून देतो, त्या प्रत्यक्षात आपली केसांसाठी सौंदर्याचा अस्सल नैसर्गिक खजिना आहेत. आजच्या धावपळीच्या बिझी लाईफस्टाईलमध्ये आणि वाढत्या प्रदूषणामुळे अकाली केस पांढरे होणे ही एक मोठी समस्या बनली आहे. यावर उपाय म्हणून आपण रासायनिक हेअर डाय किंवा आर्टिफिशियल रंगांचा वापर करतो, ज्याने तात्पुरते केस काळे होतात खरे, पण कालांतराने केस अधिक कोरडे, निर्जीव आणि खराब होतात(pomegranate peel hair color for white hair).

बाजारात मिळणारे केमिकलयुक्त हेअर कलर केसांना झटपट रंग तर देतात, पण दीर्घकाळात केसांचे नुकसान करतात. त्यामुळेच अनेकजण आता नैसर्गिक आणि घरगुती हेअर कलर वापरण्याला प्राधान्य देतात. याच नैसर्गिक उपायांपैकी एक नैसर्गिक घरगुती उपाय म्हणजे डाळिंबाच्या सालीपासून तयार केलेला घरगुती हेअर कलर. डाळिंबाची साल फक्त आरोग्यासाठीच नव्हे, तर केसांसाठीही खूप फायदेशीर असते. डाळिंबाच्या सालीमध्ये नैसर्गिक रंगद्रव्ये आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे पांढऱ्या केसांना नैसर्गिक पद्धतीने काळे करण्यास मदत करतात. डाळिंब खाऊन ज्या साली कचरा समजून फेकून देतो, त्यामध्ये केसांचे आरोग्य सुधारण्याचे आणि त्यांना नैसर्गिक रंग देण्याचे आश्चर्यकारक गुणधर्म असतात. डाळिंबाच्या सालीचा हेअर कलर कसा तयार करायचा, त्याचे फायदे आणि वापरण्याची योग्य पद्धत पाहूयात... 

पांढऱ्या केसांना नैसर्गिक पद्धतीने काळे करण्यासाठी, डाळींबाच्या सालींचा नॅचरल व घरगुती हेअर ( pomegranate peel hair dye for grey hair) कलर कसा तयार करायचा याचे सिक्रेट इंस्टाग्रामवरील chefjaspreet.singh या अकाउंटवरुन शेअर करण्यात आले आहे. पांढऱ्या केसांना नैसर्गिक पद्धतीने काळे करण्यासाठी हेअर डाय तयार करताना आपल्याला वाटीभर डाळिंबाच्या साली (हलकेच सुकवून घेतलेल्या), २ टेबलस्पून मोहरीचे तेल, १ टेबलस्पून कलोंजी, २ टेबलस्पून आवळा पावडर इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. 

डाळिंबाच्या सालींचा हेअर कलर कसा तयार करायचा ? 

डाळिंबाच्या सालींचा हेअर कलर तयार करण्यासाठी सर्वात आधी वाटीभर डाळिंबाच्या साली हलकेच वाळवून घ्याव्यात. मग या वाळक्या साली एका  लोखंडाच्या कढईत घेऊन कोरड्याच भाजून घ्याव्यात. सालींचा लाल रंग बदलून पूर्णपणे काळा होत नाही तोपर्यंत या साली मंद आचेवर कोरड्या भाजून घ्याव्यात. मग या सालींमध्ये मोहरीचे तेल, कलोंजी, आवळा पावडर घालून तेलात हे मिश्रण ४ ते ५ मिनिटे व्यवस्थित शिजवून घ्यावे. मग हे मिश्रण चमच्याने हलवत राहून व्यवस्थित शिजवून घ्यावे. मिश्रणाला काळा रंग आल्यावर गॅस बंद करून सगळे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात ओतून गार करून घ्यावे. गार झाल्यावर मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून त्याची पातळ अशी पेस्ट तयार करून घ्यावी. केसांना लावण्यासाठी डाळिंबाच्या सालींचा नॅचरल हेअर कलर तयार आहे. एका बाऊलमध्ये हा हेअर कलर काढून ब्रशच्या मदतीने केसांवर लावून घ्यावा.   

स्पेशल मॅजिक ट्रिक! केसांच्या समस्यांनुसार आवळ्याच्या रसात मिसळून ७ पदार्थ लावा, रुक्ष निस्तेज केस चमकू लागतील...

वापरण्याची पद्धत... 

तयार झालेला हा नॅचरल डाय केसांच्या मुळांपासून टोकापर्यंत लावा. साधारण १ ते २ तास केसांना राहू द्या. त्यानंतर साध्या पाण्याने केस धुवा (शक्यतो त्या दिवशी शाम्पू वापरू नका). 

फक्त खोबरेल तेलच नाही तर नारळाच्या शेंडया पण केसांसाठी वरदान! पाहा कसा करायचा उपयोग...


सकाळी चेहरा धुण्यासाठी करा ३० सेकंदांचा उपाय! फेसवॉश - साबण नाही तर चमचाभर पीठानेही येईल सेलिब्रिटींसारखा ग्लो... 

डाळिंबाच्या सालीचा हेअर कलर केसांसाठी कसा फायदेशीर... 

१. डाळिंबाच्या सालीमध्ये गडद रंगद्रव्ये असतात, जी केसांना नैसर्गिकरित्या गडद रंग देण्यास मदत करतात. 

२. यातील अँटी-ऑक्सिडंट्स केसांच्या मुळांना पोषण देतात, ज्यामुळे केस अकाली पांढरे होण्याची प्रक्रिया मंदावते. 

३. डाळिंबाच्या सालीमध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर असतात, जे केसांची मुळे घट्ट करतात आणि केस गळणे कमी करतात.

४. सालीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे स्काल्पवरील इन्फेक्शन आणि कोंडा दूर करण्यास मदत करतात.

५. याच्या वापराने केसांचा पोत सुधारतो आणि केसांना नैसर्गिक चमक येते.

Web Title : अनार के छिलके से हेयर डाई: सफेद बालों को काला करने का प्राकृतिक तरीका

Web Summary : अनार के छिलके, जिन्हें अक्सर फेंक दिया जाता है, एक प्राकृतिक हेयर डाई हैं। एंटीऑक्सिडेंट और पिगमेंट से भरपूर, वे समय से पहले सफेद होने से लड़ते हैं, जड़ों को मजबूत करते हैं और चमक जोड़ते हैं। लेख में अनार के छिलके, सरसों का तेल, कलौंजी और आंवला पाउडर का उपयोग करके इस घरेलू डाई को बनाने का तरीका बताया गया है ताकि प्राकृतिक रूप से काले, स्वस्थ बाल मिल सकें।

Web Title : Pomegranate peel hair dye: Natural way to darken grey hair.

Web Summary : Pomegranate peels, often discarded, are a natural hair dye. Rich in antioxidants and pigments, they combat premature graying, strengthen roots, and add shine. The article details how to make this homemade dye using pomegranate peels, mustard oil, kalonji, and amla powder for naturally darker, healthier hair.