सध्याच्या धावपळीत आपण केसांच्या अनेक समस्यांना तोंड देत असतो, यातच पांढऱ्या केसांची समस्या देखील अनेकजणींना सतावते. अगदी लहान वयातच किंवा अचानकपणे केस पांढरे झाले तर असे पांढरे केस म्हणजे आपल्याला खूप लाजिरवाणी गोष्ट वाटते. केसांना स्टायलिश लूक देण्यासाठी किंवा पांढरे केस लपवण्यासाठी आपण अनेकदा बाजारातील हेअर कलर्स वापरतो. मात्र, या कलर्समधील अमोनिया आणि इतर रसायनांमुळे केस कोरडे होणे, गळणे आणि टाळूची जळजळ होणे अशा समस्या उद्भवू शकतात. केसांसाठी केमिकल डाईजचा वापर आपण करतोच, पण त्याचे परिणाम तात्पुरते असतात आणि केसांचे कायमस्वरूपी नुकसान करतात(homemade natural hair colour).
पार्लरमधील महागड्या ट्रीटमेंट आणि केमिकल कलरिंगमुळे सुरुवातीला केस छान दिसतात खरे, पण हळूहळू त्यांची नैसर्गिक चमक हरवते. अशा परिस्थितीत, जर आपल्याला केसांचे आरोग्य आणि सौंदर्याशी तडजोड न करता त्यांना सुंदर रंग द्यायचा असेल, तर होममेड हेअर कलर हा सर्वोत्तम पर्याय आहे. कोणत्याही साईड इफेक्टशिवाय केसांना हवा तसा रंग देणारे 'घरगुती हेअर कलर्स' सध्या ट्रेंडमध्ये आहेत. हे कलर्स केवळ केसांना रंग देत नाहीत, तर त्यांना कंडिशनिंग करून मऊ आणि सिल्की देखील करतात. जर आपल्यालाही केस नैसर्गिकरित्या काळे, ब्राऊन किंवा बरगंडी रंगाचे करायचे असतील, तर स्वयंपाकघरातील काही वस्तू जादू करू शकतात. केसांच्या गरजा ओळखून त्यांना नैसर्गिक पोषण देणारे हेअर कलर्स घरी (natural hair colour for white hair) कसे तयार करायचे आणि ते वापरण्याची योग्य पद्धत काय, ते पाहूयात.
केसांसाठी खास घरगुती हेअर कलर...
केसांसाठी घरगुती हेअर कलर तयार करण्यासाठी आपल्याला प्रत्येकी १ टेबलस्पून मेथी दाणे, कलोंजी, चहा पावडर, सुकलेली जास्वंदीची फुले २ ते ३, किसलेला आणि सुकवून घेतलेला १ टेबलस्पून बीटाचा किस, २ ते ३ टेबलस्पून मेहेंदी पावडर, १ टेबलस्पून भृंगराज पावडर, १ टेबलस्पून रिठा पावडर, १ टेबलस्पून जास्वंदीच्या फुलांची पावडर, १ टेबलस्पून शिकेकाई पावडर, १ टेबलस्पून आवळा पावडर, २ ते ३ टेबलस्पून दही, ३ ते ४ कप पाणी इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
घरगुती हेअर कलर कसा तयार करायचा ?
घरगुती हेअर कलर तयार करण्यासाठी सर्वातआधी एका भांड्यात पाणी घेऊन ते व्यवस्थित गरम करून घ्यावे. या गरम पाण्यात मेथी दाणे, कलोंजी, चहा पावडर, सुकलेली जास्वंदीची फुले, किसलेला आणि सुकवून घेतलेला बीटाचा किस असे सगळे जिन्नस घालून पाण्याला एक हलकीशी उकळी येऊ द्यावी. दुसऱ्या भांड्यात मेहेंदी पावडर, भृंगराज पावडर, रिठा पावडर, जास्वंदीच्या फुलांची पावडर, शिकेकाई पावडर, आवळा पावडर, दही घालावे हे सगळे जिन्नस एकत्रित करावेत त्यानंतर गरम केलेली पाणी गाळणीच्या मदतीने गाळून या पावडरच्या मिश्रणात घालवे. मग चमच्याने सगळे मिश्रण कालवून घ्यावे. तयार हेअर पॅक झाकून ३ ते ४ तास ठेवून द्यावा. मग ही तयार पेस्ट केसांवर लावावी.
केसांवर हा घरगुती हेअर कलर लावण्याचे फायदे...
१. मेहेंदी, आवळा यांसारखे घटक नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करतात. यामुळे केस फक्त रंगीतच दिसत नाहीत, तर ते मऊ, रेशमी आणि चमकदार होतात.
२. नैसर्गिक रंगांमध्ये असणारे पोषक घटक केसांच्या मुळांना पोषण देतात. यामुळे केस गळणे कमी होते आणि केसांची वाढ होण्यास मदत होते.
३. चहापूड, भृंगराज पावडर यांसारखे नैसर्गिक घटक केसांचा नैसर्गिक रंग टिकवून ठेवण्यास मदत करतात.
४. घरगुती रंगांमध्ये वापरले जाणारे नैसर्गिक घटक (भृंगराज पावडर, जास्वंद) केसांच्या मुळांना पोषण देतात. यामुळे केस गळणे कमी होते आणि केसांची वाढ होण्यास मदत होते.
