बदलत्या जीवनशैलीनुसार केसगळती, अकाली पांढरे होणे किंवा केसांचा पोत खराब होणे ही समस्या घरोघरी पाहायला मिळत आहे. आपण सहसा केसांवर तेल, शाम्पू किंवा महागड्या हेअर स्पावर हजारो रुपये खर्च करतो. पण केसांचे आरोग्य हे केवळ बाह्य उपचारांवर अवलंबून नसून आपण काय खातो यावर अवलंबून असते.(Hair growth mukhwas recipe marathi) केसांना मुळापासून मजबूत करण्यासाठी लोह, प्रथिने, ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स आणि झिंक यांसारख्या पोषक तत्वांची गरज असते.(Kesgalti thambvanyasathi gharguti upay)
हे सर्व पोषक घटक एकत्रितपणे मिळवण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे हेअर ग्रोथ मुखवास. जेवल्यानंतर अनेकांना मुखवास खाण्याची सवय असते. आपण जर या मुखवासमध्ये केसांसाठी उपयुक्त घटकांचा समावेश केला तर ते औषधांसारखे काम करेल.(Pandhre kes kale karnyacha upay) हा मुखवास फक्त आपली पचनशक्ती सुधारणार नाही तर रक्ताभिसरण वाढवून केसांच्या मुळांना पोषण देईल. दाट आणि लांबसडक केसांसाठी हा जादूई मुखवास कसा बनवायचा, ते पाहूया.
काखेतील काळपटपणा- दुर्गंधीपासून मिळेल सुटका! १० रुपयांत घरीच करा नॅचरल रोल-ऑन, घामाचा वासही होईल कमी
साहित्य
अळशी - १/३ कप
तीळ -१/३ कप
कांद्याची बी- १/३ कप
सूर्यफुलाच्या बिया -१/३ कप
भोपळ्याच्या बिया- १/३ कप
बडीशेप- १/३ कप
धना डाळ- २ मोठे चमचे
ओवा- १ मोठा चमचा
चिया सीड्स- २ मोठे चमचे
मीठ- चवीनुसार
हळद- अर्धा चमचा
१ लिंबाचा रस
कृती
1. एका मोठ्या बाऊलमध्ये अळशी, तीळ, कलोंजी, सूर्यफूल बिया, भोपळा बिया, बडीशेप, धना डाळ, ओवा आणि चिया सीड्स एकत्र करून नीट मिक्स करा.
2. या मिश्रणात चवीनुसार मीठ, हळद पावडर घाला आणि वरून लिंबाचा रस पिळा. सर्व बियांना मीठ-हळद आणि लिंबाचा रस व्यवस्थित लागेल अशा प्रकारे हाताने किंवा चमच्याने कालवून घ्या.
3. आता गॅसवर एक कढई ठेवा. गॅसची फ्लेम मंद (Low) ठेवा. तयार केलेले बियांचे मिश्रण कढईत टाकून साधारण १० मिनिटे सतत ढवळत भाजून घ्या. बियांचा खमंग वास सुटला आणि त्या कुरकुरीत झाल्या की समजावे मुखवास तयार आहे.
4. भाजलेला मुखवास पूर्णपणे थंड होऊ द्या. त्यानंतर हवाबंद बरणीत भरून ठेवा.
