lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > केसांत खूपच कोंडा झाला, खूप गळतात? करा आजी- आई करायच्या तो जास्वंदाचा खास उपाय

केसांत खूपच कोंडा झाला, खूप गळतात? करा आजी- आई करायच्या तो जास्वंदाचा खास उपाय

Hair Care Tips For Dandruff: केसातला कोंडा वाढला असेल, केस अकाली पांढरे होत असतील, तर हा आजीबाईच्या बटव्यातील एक जुना उपाय करून पाहा..(Homemade herbal oil). 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2023 05:03 PM2023-08-14T17:03:40+5:302023-08-14T17:04:23+5:30

Hair Care Tips For Dandruff: केसातला कोंडा वाढला असेल, केस अकाली पांढरे होत असतील, तर हा आजीबाईच्या बटव्यातील एक जुना उपाय करून पाहा..(Homemade herbal oil). 

Homemade hibiscus oil, How to make herbal oil for hair? Home remedies for gray hair, dandruff and hair fall | केसांत खूपच कोंडा झाला, खूप गळतात? करा आजी- आई करायच्या तो जास्वंदाचा खास उपाय

केसांत खूपच कोंडा झाला, खूप गळतात? करा आजी- आई करायच्या तो जास्वंदाचा खास उपाय

Highlightsया तेलात जास्वंदासोबतच इतरही अनेक पदार्थ आहेत जे आपल्या डोक्याच्या त्वचेचं पोषण करण्यासाठी उपयुक्त ठरतील.

केसांची समस्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. कोणाचे केस खूप गळतात, तर कोणाचे केस अकाली पांढरे ( gray hair) होऊ लागतात. कोंड्याची समस्या तर बहुसंख्य लोकांना जाणवते. डोक्याच्या त्वचेची पीएच पातळी संतुलित न राहिल्याने ती त्वचा कोरडी पडते आणि त्यामुळे डोक्यात कोंडा होतो (dandruff and hair fall). कोंडा घालविण्यासाठी डोक्याच्या त्वचेला पुरेसे पोषण मिळणे गरजेचे असते. पण बऱ्याचदा आपल्या आहारातून आणि डोक्यासाठी वापरत असलेल्या तेलामधून (Homemade hibiscus oil) किंवा इतर हेअर कॉस्मेटिक्समधून पुरेसे पोषण मिळत नसल्याने कोंड्याची, केस गळण्याची समस्या वाढत जाते. म्हणूनच हा बघा त्यावरचा एक जुना उपाय..(Hair Care Tips)

 

केसांमधला कोंडा कमी करायचा असेल तर आहारातही बदल करायला पाहिजे. यासाठी तज्ज्ञ सांगतात की व्हिटॅमिन सी असणारी फळं जास्तीतजास्त आपल्या आहारात असणे गरजेचे आहे.

 

मान- पाठ आखडून गेली? अंग जड पडले? १ योगासन करा, सांधे होतील मोकळे

पण आहारासोबतच हे एक होममेड तेलही वापरून बघा. या तेलात जास्वंदासोबतच इतरही अनेक पदार्थ आहेत जे आपल्या डोक्याच्या त्वचेचं पोषण करण्यासाठी उपयुक्त ठरतील. जेणेकरून कोंड्यासकट केसांच्या इतर समस्याही कमी होण्यास मदत होईल. 

 

कसं तयार करायचं जास्वंदाचं तेल?
१. हे तेल तयार करण्यासाठी आपल्याला दिड वाटी खोबरेल तेल, ५ ते ७ जास्वंदाची फुले, कढीपत्त्याची मुठभर पाने, ८- १० जास्वंदाची पाने, ८- १० तुळशीची पाने, काेरफडीचा गर, ८ ते १० ब्राह्मीची पाने आणि १ टेबलस्पून मेथ्या असं साहित्य लागणार आहे.

सालांसह करा लिंबाची चटपटीत झटपट चटणी, महिनाभर टिकेल- फायदेही भरपूर

२. सगळ्यात आधी खोबरेल तेल तापवायला ठेवा. तेल तापल्यानंतर त्यात वरील सर्व साहित्य घाला आणि तेल आणखी गरम होऊ द्या. हळूहळू आपण टाकलेले सगळे जिन्नस कोरडे पडतील आणि तेलाला हिरवट पिवळा रंग येईल. असे झाले की गॅस बंद करा. तेल थंड झाले की एका बाटलीत भरून ठेवा. तीन ते चार दिवसांतून एकदा या तेलाने केसांना मसाज करा. 

Web Title: Homemade hibiscus oil, How to make herbal oil for hair? Home remedies for gray hair, dandruff and hair fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.