Join us
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच वॉशनंतर केस होतील सिल्की-शायनी! कोरड्या केसांसाठी होममेड जास्वंद-अळशीचा कंडिशनर- आठवड्याभरात दिसेल जादू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2026 15:56 IST

Homemade Conditioner for Dry Hair: Natural Beauty Remedies: कोरड्या केसांसाठी अवघ्या ५ मिनिटांत घरातच 'नॅचरल कंडिशनर' ट्रीटमेंट कशी करायची.

आपलेही केस लांबसडक, सुंदर आणि दाट असावे असं प्रत्येकीला वाटतं. पण बदलेली जीवनशैली, प्रदूषण, उन्हाळा आणि केमिकल रसायनांचा अतिवापर यामुळे केसांचे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते.(Hair care tips) यामुळे केस कोरडे, निर्जीव आणि रफ होणे ही प्रत्येकाचीच मोठी समस्या बनली आहे. यावर उपाय म्हणून आपण कंडिशनर किंवा केरेटिन ट्रिटमेंट करतो. सुरुवातीला या केमिकल्समुळे केस छान वाटतात खरं पण काही दिवसांतच पुन्हा कोरडे आणि निर्जीव होतात. (Homemade Hibiscus Conditioner)
आपल्यालाही कोणत्याही केमिकल्सशिवाय मऊ, चमकदार आणि लांबसडक केस हवे असतील तर निसर्गाने आपल्याला एक अप्रतिम खजिना दिला आहे. जो आपल्या केसांसाठी चांगला आहे.(Hair Care Routine for Dry Hair) जास्वंदीची फुले आणि अळशीच्या बिया हे निसर्गाचे दोन घटक एकत्र आले की केसांसाठी उत्तम नॅचरल होममेड कंडिशनिंगचे काम करते.(Flaxseed Hair Conditioner) याचा वापर केल्यास पहिल्याच वॉशमध्ये केस सिल्की आणि शायनी होतील. जाणून घेऊया, अवघ्या ५ मिनिटांत घरातच 'नॅचरल कंडिशनर' ट्रीटमेंट कशी करायची. 

प्रेम म्हणजे..नक्की काय असतं, महागडं गिफ्ट की रोमॅण्टिक मेसेज? खरंखुरं प्रेम ओळखण्यासाठी ५ टिप्स

जास्वंदीच्या फुलात आणि पानांमध्ये म्युसिलेज नावाचा चिकट पदार्थ असतो. जो केसांना खोलवर मॉइश्चयराईज करण्याचे काम करतो. यामध्ये अमिनो अॅसिड आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. जे केस गळती रोखून नवीन केस येण्यास मदत करते. तर अळशीच्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते. अळशीच्या बियांमध्ये असणारे घटक केसातील कोरडेपणा कमी करतात. 

होममेड कंडिशनर ट्रिटमेंट करण्यासाठी आपल्याला जास्वंदीची फुले ४ ते ५, जास्वंदीची पाने ५ ते ६, अळशीच्या बिया २ चमचे आणि २ ग्लास पाणी लागेल. कंडिशनर बनवण्यासाठी सगळ्यात आधी एका पातेल्यात जास्वंदीची फुले, पाने,  अळशीच्या बिया आणि पाणी घालून सर्व साहित्य नीट मिक्स करा. गॅसवर हे पातेल ठेवून उकळी येऊ द्या. मिश्रण मंद आचेवर ५ ते ७ मिनिटे चांगले उकळू द्या. जसजसे पाणी उकळेल तसतसा पाण्याचा रंग बदलेल आणि अळशी व जास्वंदामुळे पाणी जेलसारखे होईल. मिश्रण गरम असताना चाळणीच्या मदतीने एका बाऊलमध्ये गाळून घ्या. हे मिश्रण थंड झाल्यावर घट्ट होते, त्यासाठी गरम असतानाच गाळा. 

आता नेहमीच्या शाम्पूने केस स्वच्छ धुवून घ्या. ज्यामुळे केसातील तेल आणि घाण निघून जाईल. त्यानंतर केस थोडे कोरडे करा. तयार केलेले जास्वंद- अळशीचे जेल केसांच्या मुळांपासून ते टोकापर्यंत व्यवस्थित लावा. जेल लावल्यानंतर हलक्या हाताने २ मिनिटे मसाज करा आणि केसांना अंबाडा बांधून २० ते २५ मिनिटांसाठी तसेच राहू द्या.२५ मिनिटांनंतर केस कोणत्याही शॅम्पूशिवाय, फक्त साध्या कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यास केसातील कोरडेपणा कमी होईल. 


English
हिंदी सारांश
Web Title : Silky-shiny hair after first wash! Homemade hibiscus-flaxseed conditioner magic

Web Summary : Dry, rough hair? This homemade hibiscus and flaxseed conditioner moisturizes deeply. Amino acids and vitamin C prevent hair fall. Omega-3 and vitamin E reduce dryness. Use weekly for soft, shiny hair.
टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी