'केसगळती' ही केसांच्या अनेक समस्यांपैकी एक फारच कॉमन समस्या आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला केसांकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळच मिळत नाही. चुकीचा आहार, ताणतणाव, प्रदूषण आणि रासायनिक ब्यूटी प्रॉडक्स्टचा अतिवापर यामुळे केस कमकुवत होऊन तुटतात. केसगळतीची समस्या (Homemade Hair Oil Recipe) फारच कॉमन असली तरी केस गळण्याचे प्रमाण वेगवेगळे असते. कुणाचे केस तर अगदी पुंजकेच्या पुंजके गळू लागतात तर कुणाचे केसात हात फिरवल्यावर लगेच केस गळून (Hairfall control oil) हातात येतात. केसगळतीला एकदा सुरुवात (best homemade hair oil for hair growth) झाली की, ती थांबायचे नावच घेत नाही. काहीवेळा तर केसगळती इतक्या प्रमाणात होते की केस गळून टक्कल पडेल की काय अशी भीती वाटू लागते.
अनेकजणी केसगळती थांबवण्यासाठी महागड्या उपायांचा वापर करतात, पण अनेकदा त्यांचा हवा तसा परिणाम दिसत नाही. यावर एक सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे घरगुती तेल. नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले हे तेल केसांच्या मुळांना पोषण देते, केस मजबूत करते आणि त्यांची वाढ होण्यास मदत करते. हे तेल केसांना आतून पोषण देते, ज्यामुळे केसगळती थांबून केस घनदाट आणि चमकदार बनतात. हे तेल तयार करण्यासाठी लागणारे सर्व घटक तुमच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असतात. या तेलाचा नियमित वापर केल्यास केसगळती थांबते, केस मजबूत होतात आणि त्यांची वाढही चांगली होते. केसगळती थांबवण्यासाठी घरच्याघरी तयार करता येणारे तेल हे सुरक्षित, परिणामकारक आणि केमिकल-फ्री असल्याने ते केसगळतीच्या समस्येवर अधिक फायदेशीर ठरते. केसगळती थांबवण्यासाठी घरच्या घरी तेल कसे तयार करायचे ते पाहूयात.
केसगळती कमी करणारं घरगुती औषधी तेल कसं करायचं ?
केसगळती थांबवणारे सहज घरच्याघरीच तयार करता येणारे हे तेल नैसर्गिक पदार्थांनी तयार केलेलं असून केसांना मुळापासून पोषण देतात आणि गळती थांबवण्यास मदत करतात. हे घरगुती नैसर्गिक, औषधी केसगळती थांबविणारे तेल तयार करण्यासाठी आपल्याला १ कप मोहरीचे तेल, १ टेबलस्पून मेथी दाणे, १ कप कांदा बारीक चिरलेला, १ टेबलस्पून अळशी इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
औषधी घरगुती तेल तयार करण्याची कृती :-
हे तेल तयार करण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी एक मोठा लोखंडाचा तवा घ्यावा लागेल. लक्षात ठेवा, या उपायामध्ये लोखंडाच्या तव्याचा वापर अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यानंतर तव्यावर मोहरीचं तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा आणि मेथीचे दाणे घालून चांगले परतून घ्यावे. हे दोन्ही घटक काळसर होईपर्यंत परतवावेत. तेल थोडं थंड झाल्यावर गाळून एका काचेच्या बाटलीत काढून ठेवा. यानंतर या तेलामध्ये अळशीच्या बिया मिसळा आणि संपूर्ण रात्रभर त्या तेलात भिजत ठेवा.
हे घरगुती नैसर्गिक तेल वापरणे अगदी सोपे आहे...
हे घरगुती औषधी तेल वापरण्यासाठी तुम्हाला काही वेगळं करण्याची गरज नाही. फक्त केस धुण्यापूर्वी साधारण २ तास आधी हे तेल केसांच्या टोकांपासून मुळांपर्यंत चांगल्या पद्धतीने लावून बोटांच्या मदतीने मसाज करून घ्यावा. तेल लावून हलकी मालीश करा आणि २ तासांनी केस सौम्य शाम्पुने स्वच्छ धुवून घ्यावे. या तेलाचा वापर केल्यानंतर काही दिवसांतच तुम्हाला तुमच्या केसांत फरक जाणवू लागेल.
पावसाळ्यात पायांची त्वचा आणि नखांना फंगल इन्फेक्शन होतेच, लावा हे आयुर्वेदिक तेल - धोका टाळा...
हे घरगुती औषधी तेल लावण्याचे फायदे...
१. या तेलात असलेले कांदा व मेथी यांतील पोषक घटक केसांच्या मुळांना बळकट करून केस गळण्याची समस्या कमी करतात.
२. अळशीच्या बिया आणि मोहरीचं तेल स्काल्पमधील रक्ताभिसरण वाढवतात, ज्यामुळे केसांची नैसर्गिक वाढ जलद होते.
३. हे तेल केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत खोलवर पोषण देऊन त्यांना निरोगी ठेवतं.
४. कांद्यातील अँटीफंगल गुणधर्मामुळे स्काल्पवरील कोंडा कमी होतो.
५. हे तेल नैसर्गिक असल्याने यामध्ये कोणतेही रासायनिक घटक नसतात, त्यामुळे ते सुरक्षित असून कोणत्याही प्रकारच्या साइड इफेक्टचा धोका नसतो.