Join us

खोबरेल तेलात ठेवा बाल्कनीतल्या औषधी रोपांची २ पाने! लावताच दिसेल फरक, लांब-दाट होतील केस...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2025 15:05 IST

homemade hair oil for hair growth : natural hair oil at home : how to make hair oil at home : best homemade oil for strong hair : ayurvedic homemade hair oil : केसांच्या समस्यांवर उपाय म्हणून कोरफड व कडीपत्ता वापरून तयार केलेलं तेल केसांसाठी औषधी ठरते.

आपल्यापैकी बहुतेकांच्या घरात किंवा बाल्कनीमध्ये, एखादं तरी कोरफड आणि कडीपत्त्याचे रोपं असतेच. ही दोन्ही रोप औषधी आणि फायदेशीर असतात. कोरफड आणि कडीपत्त्याच्या रोपांच्या (natural hair oil at home) पानांचा वापर सौंदर्यापासून, आरोग्यापर्यंत अनेक कारणांसाठी केला जातो. कोरफड आणि कडीपत्ता (best homemade oil for strong hair) या दोन्ही रोपांची पाने केसांचे आरोग्य व सौंदर्य चांगले टिकवून ठेवण्यास अतिशय उपयुक्त ठरतात. कोरफडमध्ये असलेले मॉइश्चरायझिंग आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म तसेच कडीपत्त्यातील पोषक तत्वे केसांच्या अनेक समस्यांवर असरदार ठरतात(ayurvedic homemade hair oil).

केस गळणे, कोरडेपणा आणि केसांची चमक हरवणे या समस्या आजकाल फारच कॉमन झाल्या आहेत. केसांच्या समस्यांवर उपाय म्हणून कोरफड व कडीपत्ता वापरून तयार केलेलं तेल केसांसाठी उपयुक्त ठरते. हे तेल केसांना मजबूत करून, त्यांची वाढ दुप्पट वेगाने होण्यास मदत करते. यासाठीच, केसांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी, खोबरेल तेलात कोरफड आणि कडीपत्त्याची पाने मिसळून घरच्याघरीच औषधी तेल कसं तयार करायचं ते पाहूयात... 

केसांच्या अनेक समस्या कमी करण्यासाठी घरगुती तेल... 

केसांसाठी खास घरगुती तेल तयार करण्यासाठी, आपल्याला १० ते १२ कडीपत्त्याची पाने, १ मध्यम आकाराचा कांदा, १ कोरफडीचे पान, १/२ कप मेथी दाणे, १/२ कप कलोंजी आणि २ ते ३ कप खोबरेल तेल इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. 

वयाच्या तिशीतच केस झाले पांढरेशुभ्र? जेवणात रोज खा 'ही' चमचाभर चटणी - पांढरे केस दिसणारच नाहीत...

स्काल्पची त्वचा वारंवार कोरडी पडतेय? ३ पदार्थांनी करा मिनिटभर स्काल्पचा मसाज - कोरडेपणा होईल दूर... 

केसांसाठी घरगुती तेल कसे तयार करायचे ? 

केसांसाठी फायदेशीर असे घरगुती तेल तयार करण्यासाठी, सर्वात आधी एका पॅनमध्ये खोबरेल तेल घेऊन ते हलके गरम करून घ्या. आता त्यात कोरफडीचा गर, कडीपत्त्याची पाने, मेथीचे दाणे, कलौंजी आणि कांदा घाला. हे सर्व मिश्रण चांगले उकळून घ्या. जेव्हा तेलाचा रंग गडद होईल, तेव्हा ते गाळून घ्या आणि एका बाटलीत भरून ठेवा. अशा प्रकारे, केसांसाठी गुणकारी व औषधी घरगुती तेल वापरण्यासाठी तयार आहे. 

या तेलाचा वापर केसांसाठी कसा करावा ?

केसांसाठी तयार झालेल घरगुतीतर तेल लावण्याची पद्धत देखील माहित असणे आवश्यक आहे. नाहीतर तेल बनवण्याची मेहनत वाया जाईल. हे तेल थोडे - थोडे करून तळहातावर घ्यावे मग केसांना आणि स्काल्पला तेल लावून मसाज करा. हे तेल कमीत कमी २ तास केसांना लावून ठेवा आणि त्यानंतर सौम्य  शॅम्पूने केस स्वच्छ धुवा. आपल्याला केसांमध्ये फरक दिसून येईल. केस मुलायम आणि रेशमी होतील सोबतच्या केसांची मुळे देखील मजबूत होण्यास मदत होते. 

हे तेल केसांवर लावण्याचे फायदे... 

१. खोबरेल तेल :- खोबरेल तेल केसांना मुळांपासून पोषण देऊन केसांचे तुटणे आणि गळणे कमी करते.

२. एलोवेरा जेल :- एलोवेरा जेल स्काल्पला थंडावा देऊन कोंडा कमी करते आणि केसांना मऊमुलायम ठेवते.

३. कलोंजी :- कलोंजी केस गळणे रोखून केसांची वाढ वेगाने होण्यास मदत करते.

४. कडीपत्त्याची पाने :- कडीपत्त्याची पाने केस काळे, दाट आणि चमकदार बनवतात.

६. मेथीचे दाणे :- केस गळणे आणि कोंडा कमी करून केस मजबूत करतात.

७. कांदा :- केसांच्या मुळांमध्ये रक्ताभिसरण वाढवून नवीन केस येण्यास मदत करतो.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडीघरगुती उपाय