Join us
Daily Top 2Weekly Top 5

गुडघ्यापर्यंत लांब केस हवे तर करा 'या' तेलानंमसाज, केस इतके वाढतील, की सांभाळणंही कठीण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2025 18:53 IST

homemade hair oil for fast hair growth : homemade hair oil for hair growth : natural hair oil for fast hair growth : नैसर्गिक पदार्थांनी तयार केलेलं तेल केसांच्या मुळांपर्यंत पोहोचून पोषण देते, केस मजबूत करते आणि केस वाढण्यास मदत करते.

केसांशी संबंधित कोणती ना कोणती समस्या आजकाल प्रत्येकीला सतावत आहे. केस गळणे, केसांची वाढ थांबणे, कोंडा, कोरडेपणा आणि केस पातळ होणे अशा एक ना अनेक तक्रारी असतात. आपले केस निरोगी, दाट आणि लांबसडक असावेत, अशी प्रत्येकीचीच इच्छा असते. परंतु सध्याची बदलती लाईफस्टाईल, चुकीचा आहार, सततचा ताण, प्रदूषण, हार्मोनल बदल आणि केमिकलयुक्त हेअर प्रॉडक्ट्समुळे केसांच्या अनेक समस्या निर्माण होतात. केसांशी संबंधित अनेक समस्या कमी करण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करतो, या उपायांचा कधी फायदा होतो तर बरेचदा केसांची स्थिती 'जैसे थे' अगदी तशीच राहाते(homemade hair oil for fast hair growth).

आपल्या आजी-पणजींच्या काळात केसांच्या समस्या कमी होत्या, कारण त्या घरीच तयार केलेल्या नैसर्गिक तेलांचा वापर करत असत. केसांचे सौंदर्य,आरोग्य आणि वाढीसाठी 'घरगुती आयुर्वेदिक तेल' हा सर्वात जुना आणि खात्रीशीर पारंपरिक उपाय मानला जातो. घरच्याघरी तयार केलेले नैसर्गिक तेल केसांसाठी अधिक सुरक्षित आणि परिणामकारक ठरते. नैसर्गिक पदार्थांनी तयार केलेलं हे तेल केसांच्या मुळांपर्यंत पोहोचून पोषण देते, केस मजबूत करते आणि केस झटपट वाढण्यास मदत करते. केसांच्या अनेक समस्या (homemade hair oil for hair growth) कमी करून केसांच्या वाढीसाठी घरगुती तेल नेमकं कसं तयार करायचं याची साधीसोपी कृती पाहूयात. 

घरगुती नैसर्गिक तेल तयार करण्यासाठी... 

केसांच्या अनेक समस्या कमी करून, केसांची वाढ दुप्पट वेगाने होण्यासाठी घरगुती आययुर्वेदिक तेल तयार करण्यासाठी बदाम १० ते १२, खोबरेल तेल २ कप,  मेथी दाणे २ टेबलस्पून, लवंग काड्या १० ते १२, कडीपत्त्याची पाने १० ते १५ इतके साहित्य लागणार आहे. 

तेल तयार करण्याची कृती... 

केसांसाठी घरगुती नैसर्गिक तेल तयार करण्यासाठी सर्वातआधी बदाम हलकेच ठेचून त्याची जाडसर भरड तयार करून घ्यावी. त्यानंतर, एका मोठ्या भांड्यात खोबरेल तेल घेऊन ते व्यवस्थित मंद आचेवर गरम करून घ्यावे. या गरम तेलात बदामाची जाडसर पूड, मेथी दाणे, लवंग काड्या, मेथी दाणे आणि कडीपत्त्याची पाने घालावीत. आता मंद आचेवर तेल व्यवस्थित गरम करून हलकेच एक उकळी काढून घ्यावी. या तेलातील सगळ्या घटक पदार्थांचा नैसर्गिक रंग बदलून जोपर्यंत ते संपूर्णपणे काळे होत नाहीत तोपर्यंत तेल मंद आचेवर व्यवस्थित गरम करून घ्यावे. त्यानंतर गॅस बंद करून तेल व्यवस्थित गाळणीच्या मदतीने गाळून घ्यावे. तेल थोडे थंड होऊ द्यावे, तेल थंड झाल्यावर एका एअर टाईट कंटेनरमध्ये भरून स्टोअर करून ठेवावे. 

डोक्यावर पांढरे केसच जास्त दिसतात ? फक्त १ उपाय करेल केस मुळापासूनच काळेभोर - एकही पांढरा केस दिसणार नाही... 

हिवाळ्यात साजूक तूप नेमक कधी आणि किती खावं? डाएटिशियन सांगतात अचूक प्रमाण - थंडीतही तब्येत रहाते ठणठणीत... 

केसांसाठी या तेलाचा नेमका वापर कसा करावा ? 

या तेलाने केसांना आठवड्यातून किमान ३ वेळा मसाज करावा. हे तेल केसांना रात्रभर लावून ठेवून दुसऱ्या दिवशी केस शाम्पूने व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यावेत. किमान महिनाभर सलग हा उपाय केल्यास आपल्याला लगेच फरक दिसून येईल. 

हे घरगुती नैसर्गिक तेल केसांना लावण्याचे फायदे... 

१. बदाम :- बदाम तेलामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते, केस गळणे कमी होते आणि केस अधिक मजबूत व चमकदार बनतात. बदामातील व्हिटॅमिन-ई मुळे केसांना नैसर्गिक चमक मिळते आणि केसांचा कोरडेपणा दूर होऊन ते मऊ होतात.

२. खोबरेल तेल :- खोबरेल तेल केसांमधील ओलावा टिकवून ठेवते, कोंडा कमी करते आणि केसांची वाढ सुधारण्यास मदत करते. तेल केसांच्या मुळाशी जाऊन खोलवर पोषण देते आणि केसांना फाटे फुटण्यापासून वाचवते.

३. कडीपत्त्याची पाने :- कडीपत्त्यामुळे केसांच्या मुळांना बळकटी मिळते, अकाली पांढरे होणे कमी होते आणि नवीन केस उगवण्यास मदत होते.

४. मेथी दाणे :- मेथी दाणे केस गळती कमी करून केस दाट व मऊ बनवतात आणि स्काल्पचा कोरडेपणा दूर करतात. मेथी दाण्यांमध्ये प्रथिने आणि निकोटिनिक ॲसिड असते, जे केसांची मुळे मजबूत करून केस झटपट वाढवण्यास मदत करतात.

५. लवंग काड्या :- लवंग काड्यांमुळे टाळूमधील रक्तसंचार वाढतो, केसांच्या मुळांना पोषण मिळते आणि केसांची वाढ जलद होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Homemade hair oil recipe for fast hair growth and thickness.

Web Summary : Struggling with hair issues? This article shares a simple Ayurvedic oil recipe using readily available ingredients like coconut oil, almonds, and curry leaves to boost hair growth and health.
टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडीघरगुती उपाय