Join us

पातळ केस काही दिवसांतच भराभर वाढून होतील दाट! 'हे' घरगुती तेल लावा, केस गळणं थांबेल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2025 16:33 IST

Home Hacks For Long Thick Hair: केस गळणं कमी होऊन त्यांची भरपूर वाढ होण्यासाठी हा एक घरगुती उपाय करून पाहा..(homemade hair oil for fast growth of hair)

ठळक मुद्देआठवड्यातून २ वेळा हे तेल डोक्याला लावून मालिश करा आणि त्यानंतर दोन तासाने नेहमीप्रमाणे केस धुवून टाका.

केस गळण्याची समस्या हल्ली खूप वाढली आहे. अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळ्यांचेच केस गळतात. याच  वेगात केस गळत राहिले तर काही दिवसांत टक्कल पडेल की काय अशी भीती अनेकांना वाटते. कारण एकीकडे केस तर गळतातच पण त्याचबरोबर त्यांची वाढही अजिबातच होत नाही. तुमच्याही केसांची हीच समस्या असेल तर हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा (Which is the best home remedy for fast hair growth?). यामध्ये काही पदार्थ घेऊन घरच्याघरी केसांसाठी तेल कसे तयार करायचे आहे ते पाहूया (Home Hacks For Long Thick Hair).. त्यासाठी कोणते पदार्थ वापरायचे आणि तेल कसे तयार करायचे ते बघा..(homemade hair oil for fast growth of hair)

 

केस वाढण्यासाठी घरच्याघरी तेल कसे तयार करावे?

गॅसवर कढई गरम करायला ठेवा. त्या कढईमध्ये दोन वाट्या तुमच्याकडचे नेहमीचे खोबरेल तेल घाला. 

जुन्या लेदर बुटांवर सुरकुत्या आल्या? घ्या उपाय- ५ मिनिटांत सुरकुत्या जाऊन बूट होतील नव्यासारखे कडक

यानंतर तेलामध्ये एक टेबलस्पून कलौंजी घालावी. नवरात्रीच्या दिवसांत मातीमध्ये गहू टाकून जसे धान्य उगवले जाते, तसे धान्य उगवून घ्या. हे धान्य बारीक कापून ते सुद्धा कढईमधल्या तेलात टाका.

कढीपत्त्याची मूठभर पाने घेऊन ती खलबत्त्यात बारीक कुटून घ्या आणि नंतर कढईमध्ये घाला. 

तेलाला उकळी यायला लागली की त्यामध्ये सदाफुलीची काही फुलं आणि एक टेबलस्पून मेथीदाणे घाला.

 

तेलाला उकळी येऊन त्याचा रंग काळपट हिरवा झाला की गॅस बंद करा. आता यावेळी तेलामध्ये एक वाटी कोरफडीचा ताजा गर घाला. सगळं मिश्रण हलवून घ्या. कोरफडीचा गर घातल्यावर तेलाला बुडबुडे येतील. ते बुडबुडे एकदा शांत झाले आणि तेल थोडं कोमट झालं की ते गाळून बाटलीमध्ये भरून ठेवा. 

फक्त ४९९ रुपयांत घ्या कॉटनचे गाऊन- उन्हाळ्यात घरात घालायला हलक्याफुलक्या कपड्यांची स्वस्त खरेदी

आठवड्यातून २ वेळा हे तेल डोक्याला लावून मालिश करा आणि त्यानंतर दोन तासाने नेहमीप्रमाणे केस धुवून टाका. हा उपाय नियमितपणे केल्यास काही दिवसांतच केसांची खूप वाढ झालेली दिसेल. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी