Join us

केसगळती थांबवते, केस वाढतात भरभर-लावा ‘हे’ जादुई तेल! एक चंपी-डोकं शांत-केस सुंदर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2025 17:43 IST

Homemade Hair Growth Oil : homemade hair oil for hair growth : hair oil for fast hair growth : how to make hair growth oil at home : केसगळती थांबवून, केसांची झपाट्याने वाढ करणारं घरगुती आयुर्वेदिक तेल कसं करायचं ते पाहा...

केसांच्या अनेक समस्यांपैकी केसगळतीची समस्या फारच त्रासदायक वाटते. केसगळतीला एकदा सुरुवात झाली की थांबायचं नावच घेत नाही. केस गळू लागले की केसांचे प्रमाण हळुहळु (Homemade Hair Growth Oil) कमी होऊन आपल्याला टक्कल पडेल की काय अशी अनेकींना भीती असते. केस एकदा का गळू लागले की, फक्त केसगळती सुरु राहते पण नवीन केस मात्र(homemade hair oil for hair growth) येत नाहीत, अशा परिस्थितीत, केसांचं आरोग्य आणि सौंदर्य हरवून जात. दररोज केसगळती होऊन हातात येणारा केसांचा पुंजका पाहून या केसगळतीवर काहीतरी ठोस उपाय करायला हवा असं नक्कीच वाटतं(how to make hair growth oil at home).

सतत सुरु असणारी केसगळती थांबवून, त्या जागी नवीन केस उगवण्यासाठी आपण काही घरगुती साधेसोपे उपाय करुन पाहू शकतो. केसगळतीचे प्रमाण कमी करुन नवीन केस उगवून त्यांची झरझर वाढ व्हावी यासाठी खास घरगुती पदार्थांच्या मदतीने आपण खास पारंपरिक पद्धतीचं तेल तयार करु शकतो. या घरगुती तेलाचा मसाज केसांवर केल्यास केसगळती (hair oil for fast hair growth) थांबून त्या जागी नवीन केस उगवून आपले केस लांबसडक, घनदाट आणि मजबूत होण्यास मदत मिळते. केसगळती थांबवून, केसांची झपाट्याने वाढ करणारं घरगुती  आयुर्वेदिक तेल कसं करायचं ते पाहा...   

केसगळती थांबवून केस लांबसडक होण्यासाठी घरगुती उपाय... 

केसगळती थांबवून नवीन केस उगवण्यासाठी आपण एका खास घरगुती आयुर्वेदिक तेलाचा वापर करु शकतो. केसांच्या वाढीसाठी फायदेशीर असणारे हे घरगुती तेल घरच्याघरीच नेमके कसे तयार करायचे याची सोपी कृती beautifulyoutips या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आली आहे. हे खास औषधी आयुर्वेदिक घरगुती तेल तयार करण्यासाठी आपल्याला प्रत्येकी २ टेबलस्पून मेथी दाणे, तांदूळ, कडीपत्त्याची २० ते २५ पाने, कोरफडीचे पान आणि कपभर खोबरेल तेल इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. 

केसांच्या वाढीसाठी फायदेशीर तेल कसे तयार करायचे ? 

हे घरगुती तेल तयार करण्यासाठी सर्वातआधी एका बाऊलमध्ये थोडं पाणी घेऊन त्यात मेथी दाणे व तांदूळ रात्रभर भिजत ठेवावेत. दुसऱ्या दिवशी मिक्सरच्या भांडयांत मेथी दाणे व तांदूळ पाण्यासहीत ओतून घ्यावेत. मग त्यात कडीपत्त्याची पाने व सालीसकट कोरफडीच्या पानांचे छोटे तुकडे करून घालावेत. मग हे सगळं साहित्य एकत्रित मिक्सरला वाटून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. एका भांडयात खोबरेल तेल घेऊन ते व्यवस्थित गरम करून घ्यावे. या गरम खोबरेल तेलात मिक्सरमध्ये वाटून घेतलेली तयार पेस्ट घालावी. आता मंद आचेवर चमच्याने हलवत हे मिश्रण हलकेसे गरम करून घ्यावे. ५ ते ७ मिनिटे मिश्रण व्यवस्थित गरम झाल्यावर गॅस बंद करून तेल थोडे थंड होऊ द्यावे. तेल थंड झाल्यावर एका काचेच्या बरणीत व्यवस्थित सुती कापडातून किंवा गाळणीच्या मदतीने गाळून, बाटलीत भरून स्टोअर करावे. 

तुरटी त्वचेसाठी फायदेशीर म्हणून चेहऱ्याला लावाल तर पस्तावाल! पाहा कुणी तुरटी वापरु नये...

याचा वापर कसा करावा ? 

हे तयार औषधी, घरगुती तेल महिनाभर स्काल्पपासून ते केसांच्या खालच्या टोकांपर्यंत लावून मसाज करून घ्यावा. मग रात्रभर हे तेल केसांवर तसेच राहू द्यावे. दुसऱ्या दिवशी सौम्य शाम्पूने केस स्वच्छ धुवून घ्यावेत. हा उपाय महिनाभर केल्यास आपल्याला केसांत फरक दिसून येईल. केसगळती थांबून त्या जागी नवीन केस उगवून त्यांची चांगली वाढ होईल. 

केस अचानकच पांढरे व्हायला लागलेत? ‘हे’ घरगुती तेल ठरते असरदार, केसांचं पांढरं होणं ‌थांबवतं...

रापलेल्या आणि काळवंडलेल्या कोपरांना-ढोपरांना-गुडघ्यांना लावा थोडीशी टूथपेस्ट, पाहा १ भन्नाट उपाय...

हे तेल वापरण्याचे फायदे... 

१. मेथी दाणे :- मेथी दाण्यातील प्रथिने आणि निकोटिनिक अ‍ॅसिड केसांची मुळे मजबूत करतात आणि केसगळती कमी करतात.

२. तांदूळ :- भिजवलेला तांदूळ केसांना पोषण देऊन त्यांची वाढ आणि नैसर्गिक चमक वाढवते.

३. कडीपत्त्याची पाने :- कडीपत्ता केसांना आवश्यक असलेले अँटीऑक्सिडंट्स व जीवनसत्त्वं देतो, जे नवीन केसांची वाढ करतात.

४. कोरफडीची पाने :- कोरफड केसांची मुळं हायड्रेट करून स्काल्पचा कोरडेपणा आणि कोंडा कमी करत केसांच्या वाढीस चालना देतो. 

५. खोबरेल तेल :- खोबरेल तेल केसांच्या मुळांपर्यंत पोषण पुरवून केसांना मजबूत व निरोगी बनवतं आणि केसांची वाढ होण्यास मदत करतं.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडीघरगुती उपाय