लांबसडक, दाट आणि निरोगी केस हे प्रत्येकाच्या सौंदर्यात भर घालतात. आपल्यापैकी अनेकींना वाटते की, आपले केस लांबसडक आणि घनदाट असावेत परंतु कित्येकदा केसांची अनेक प्रकारे काळजी घेऊनही केस हवेत तसे वाढत नाहीत. केसांची वाढ खुंटते किंवा केसांची लांबी वर्षानुवर्षे आहे तितकीच राहते काही केल्या केसांची लांबी वाढतच नाही. यासाठी केसांची थांबलेली वाढ पुन्हा पहिल्यासारखी करण्यासाठी आणि केसांची लांबी वाढावी म्हणून घरगुती उपाय करण कधीही फायदेशीर ठरेल... अशा परिस्थितीत, स्वयंपाकघरातील नैसर्गिक घटकांपासून तयार केलेलं 'घरगुती तेल' केसांसाठी वरदान ठरू शकते. पिढ्यानपिढ्या आपल्या आजी-पणजींनी वापरलेले आयुर्वेदिक घरगुती उपाय आजही तितकेच फायदेशीर आहेत(How To Make Homemade Hair Growth Hair Oil).
नैसर्गिक तेलांमुळे केवळ केसांची लांबी वाढत नाही, तर ते मुळांपासून मजबूत आणि चमकदार होतात. या तेलांमध्ये हानिकारक केमिकल्स नसल्यामुळे त्यांचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. या घरगुती तेलामध्ये वापरले जाणारे नैसर्गिक घटक केसांच्या मुळांना पोषण देतात, स्काल्प मजबूत करतात आणि केसांची लांबी नैसर्गिकरित्या (Homemade Hair Growth Hair Oil) वाढवण्यास मदत करतात. असं हे अस्सल पारंपरिक पद्धतीचं केसांची लांबी वाढवणारं घरगुती तेल नेमकं कस तयार करायचं आणि त्याचे फायदे नेमके काय आहेत ते पाहूयात...
साहित्य :-
१. कांदा - २ (छोटे तुकडे करून घ्या.)२. आलं - १ छोटा तुकडा३. लवंग काड्या - ८ ते १० काड्या ४. खोबरेल तेल - २ टेबलस्पून ५. एरंडेल तेल - २ टेबलस्पून
कृती :-
सगळ्यात आधी एका मिक्सरच्या भांड्यात कांद्याचे मध्यम आकाराचे तुकडे घाला. मग त्यातच आल्याचा तुकडा आणि लवंग काड्या घालून पाणी न घालता मिश्रण मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट तयार करुन घ्यावी. तयार पेस्ट एका सुती कापड किंवा बारीक जाळीच्या गाळणीने गाळून घ्यावी. गाळून घेतलेल्या या पेस्टमध्ये प्रत्येकी २ टेबलस्पून खोबरेल तेल व एरंडेल तेल घालावं. हे सगळे जिन्नस चमच्याने कालवून एकजीव करावे. तयार आहे केसांसाठी मॅजिकल हेअर ऑईल हे तेल एका हवाबंद बाटलीत भरून स्टोअर करून ठेवावं.
उशी, फरशीवर केसांचे मोठाले पुंजके ? आजीबाईच्या बटव्यातील औषधी तेल - केसगळती थांबून वाढ होईल भरभर...
केस गळणं थांबून केस लागतील चमकायला, पाहा घरगुती जास्वंद-डिंक हेअर कंडिशनर-लांबसडक केसांचं सिक्रेट
केसांसाठी या तेलाचा वापर कसा करावा ? तयार केलेलं घरगुती मॅजिकल हेअर ऑईल हातांवर घेऊन बोटांच्या मदतीने स्काल्पवर लावून मसाज करावा. तासभर हे तेल केसांवर तसेच ठेवून द्यावे. मग सौम्य शाम्पूने केस स्वच्छ धुवून घ्यावेत. हा उपाय महिनाभर आठवड्यातून दोन वेळा केल्यास केसांची वाढ अगदी भरभर होईल. इतकच नाही तर आपल्याला केसांच्या लांबीत चांगलाच फरक झालेला देखील दिसेल.
केसांसाठी हे तेल वापरण्याचे फायदे...
१. कांदा :- कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात सल्फर असते, जे केसांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या 'कोलेजन' उत्पादनास मदत करते. हे केसांची मुळे मजबूत करते आणि केस गळणे थांबवते.
२. आलं :- आलं स्काल्पचे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते. यामध्ये फॅटी ॲसिड्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, जे हेअर फॉलिकल्सना नैसर्गिकरित्या पोषण मिळवून देण्यास मदत करते. आल्यामुळे केसांमधील कोंडा कमी होतो आणि केस मुळापासून निरोगी होतात.
३. लवंग काड्या :- लवंगमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि 'युजेनॉल' नावाचा घटक असतो, जो केसांचा रंग टिकवून ठेवण्यास आणि केस पांढरे होण्यापासून रोखण्यास मदत करतो. लवंग रक्ताभिसरण वाढवून केसांच्या लांबीमध्ये वेगाने भर घालते आणि केसांना नैसर्गिक चमक देते.
४. खोबरेल तेल :- खोबरेल तेल केसांना खोलवर मॉइश्चराईझ करते, यामुळे केस मऊ, मुलायम होतात.
५. एरंडेल तेल :- एरंडेल तेल हे नैसर्गिकरित्या केसांची घनता वाढवण्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. यामुळे पातळ झालेले केस पुन्हा दाट होतात आणि केसांची लांबी वाढवण्याची प्रक्रिया जलद होते.
Web Summary : Struggling with hair growth? Try this homemade oil twice a week! This traditional Ayurvedic recipe uses onion, ginger, clove, coconut, and castor oils to nourish the scalp, strengthen hair roots, and promote faster, natural hair growth. See visible results in 30 days.
Web Summary : बालों के विकास से जूझ रहे हैं? इस घरेलू तेल को सप्ताह में दो बार आजमाएं! यह पारंपरिक आयुर्वेदिक नुस्खा प्याज, अदरक, लौंग, नारियल और अरंडी के तेल का उपयोग करके खोपड़ी को पोषण देता है, बालों की जड़ों को मजबूत करता है और तेजी से, प्राकृतिक बालों के विकास को बढ़ावा देता है। 30 दिनों में दृश्यमान परिणाम देखें।