दाट, रेशमी आणि लांबसडक केस हे केवळ केसांचं सौंदर्य नसून ते तुमच्या उत्तम आरोग्याच चांगलं लक्षण आहे. पण आजच्या धकाधकीच्या जीवनात, प्रदूषण आणि केमिकलच्या अतिवापरामुळे केसांचे आरोग्य बिघडत. कंगवा फिरवला की हातात येणारे केस पाहून अनेकींच्या काळजाचा ठोका चुकतो. केसांचं आरोग्य आणि सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी आपण महागडे उपाय करून हजारो रुपये खर्च करतो, पण परिणाम मात्र शून्य असतो. केसगळती एकदा सुरु झाली की थांबायचं नावाचं घेत नाही...उशी, फरशी, किंवा कंगव्यात केसचं केस दिसू लागतात अशा परिस्थितीत, केसगळतीवर एकच ठोस घरगुती उपाय करणे फायदेशीर ठरते(homemade hair fall control oil).
केसांच्या आरोग्यासाठी औषधी वनस्पतींपासून तयार केलेल्या तेलाला विशेष महत्त्व दिले जाते. घरच्याघरीच सहज उपलब्ध असलेल्या काही नैसर्गिक पदार्थांचा वापर करून तयार केलेले औषधी तेल केसांच्या मुळांना पोषण देण्यास, केस मजबूत करण्यास आणि केसगळती कमी करण्यास मदत करू शकते. कोणत्याही (hair fall control oil at home) केमिकलशिवाय आणि कमी खर्चात तयार होणार हे घरगुती औषधी तेल केसांच गळणं थांबवून त्यांना नवीन लूक देते. आपल्या स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या केसांच्या (homemade ayurvedic hair oil recipe) मुळांना पोषण देऊन त्यांना नैसर्गिकरित्या मजबूत करू शकतात. केसगळतीवर परिणामकारक ठरणारे घरगुती औषधी 'मॅजिकल हेअर ऑईल' नेमके कसे तयार करायचे ते पाहूयात...
साहित्य :-
१. आवळ्याच्या किस - २ ते ३ कप २. कडीपत्त्याची पानं - १/२ कप (बारीक चिरलेली)३. ब्राह्मीची सुकलेली पाने - १ कप ४. रोझमेरीची पाने - १ कप ५. खोबरेल तेल - २ कप ६. तिळाचे तेल - २ कप ७. काळे तीळ - १ टेबलस्पून ८. मेथी दाणे - १ टेबलस्पून ९. व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूल - २ गोळ्या १०. एरंडेल तेल - २ टेबलस्पून११. लवंग काड्या - ४ ते ५ काड्या
कृती :-
१. एका मोठ्या कढईत किसलेला आवळा घालून, त्यात बारीक चिरलेली कडीपत्त्याची पानं, ब्राह्मीची सुकलेली पाने, रोझमेरीची पाने असे सगळे घटक एकत्रित घालून चमच्याने कालवून मिश्रण एकजीव करून घ्यावे. २. मग या मिश्रणात खोबरेल तेल आणि तिळाचे तेल घालावे. चमच्याने सगळे मिश्रण कालवून मिश्रणाचा रंग पूर्णपणे बदलून काळा होत नाही तोपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यावे. ३. मिश्रणाचा रंग बदलू लागल्यावर त्यात मेथी दाणे आणि काळे तीळ आणि लवंग काड्या घालाव्यात.
नको कडू काढे आणि डाएटचे पाढे, हा घ्या बॉडी डिटॉक्सचा सोपा आणि निवांत उपाय तो ही फुकट...
४. सगळे मिश्रण चमच्याने कालवून एकजीव करून घ्यावे. मिश्रण व्यवस्थित शिजेपर्यंत मध्यम आचेवर गरम करून घ्यावे. तेलाचा रंग बदलताच गॅस बंद करून मिश्रण व्यवस्थित गाळून घ्यावे. आपण हे तेल रात्रभर तसेच ठेवून दुसऱ्या दिवशी देखील गाळू शकता. ५. तेल गाळून थोड थंड करून घ्यावे. थंड झाल्यावर त्यात एरंडेल तेल आणि व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूल फोडून घालाव्यात.
तयार झालेलं तेल एका काचेच्या बाटलीत भरून स्टोअर करून घ्यावं. हे तेल वर्षभर चांगले व्यवस्थित टिकून राहते.
'हे' तेल वापरण्याचे फायदे...
१. या तेलातील मेथी दाणे आणि आवळा केसांच्या मुळांना पोषण देऊन केस मजबूत करतात, ज्यामुळे केसगळती कमी होण्यास मोठी मदत होते.
२. ब्राह्मी आणि रोझमेरीची पाने केसांच्या वाढीला चालना देतात आणि केसांना नैसर्गिकरीत्या मजबूत बनवतात.
३. तेलामध्ये वापरल्या जाणाऱ्या लवंग आणि कडीपत्त्यामुळे स्काल्पवरील संसर्ग कमी होतो आणि कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत होते.
४. खोबरेल तेल, तिळाचे तेल आणि व्हिटॅमिन 'ई' मुळे केसांना नैसर्गिक आर्द्रता मिळते, परिणामी केस रेशमी आणि चमकदार दिसू लागतात.
५. कडीपत्ता आणि काळ्या तिळाचा नियमित वापर केसांचा नैसर्गिक काळा रंग टिकवून ठेवण्यास आणि अकाली केस पांढरे होण्यापासून रोखण्यास मदत करतो.
६. एरंडेल तेलामुळे केसांची वाढ जलद वेगाने होते आणि स्काल्पचे आरोग्य सुधारते.
Web Summary : Combat hair fall with this homemade Ayurvedic oil! Amla, curry leaves, and other natural ingredients nourish hair, promoting growth, strength, and shine. This cost-effective remedy prevents dandruff and premature graying for healthy, lustrous locks.
Web Summary : घर पर बने आयुर्वेदिक तेल से बालों का झड़ना रोकें! आंवला, करी पत्ता और अन्य प्राकृतिक तत्व बालों को पोषण देते हैं, विकास, मजबूती और चमक को बढ़ावा देते हैं। यह किफायती उपाय रूसी और समय से पहले सफ़ेद होने से रोकता है।