Join us

चहा पावडरचा सुपरहिट हेअर कलर! केसांवर येईल सुंदर रंग - पार्लरचा खर्च वाचेल असा बजेट फ्रेंडली उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2025 17:19 IST

How to Make Hair Colour from Tea Powder : chaipatti for black hair : tea leaves hair colour pack : natural hair dye with tea : how to use tea leaves for hair colour : homemade hair colour with tea : चहा पावडरचा हेअर कलर तयार करण्याची आणि केसांसाठी वापरण्याची इन्स्टंट ट्रिक...

आजकाल तरुण वयातच किंवा अकाली केस पांढरे होण्याची समस्या अगदी कॉमन झाली आहे. पांढरे झालेले केस लपवण्यासाठी आपण ते सरळ हेअर कलरने रंगवतो किंवा डाय लावतो, असे अनेक आर्टिफिशियल उपाय करतो. या उपायांमुळे पांढरे केस तर लपवले जातात परंतु, वारंवार अशाप्रकारे केसांवर डाय, आर्टिफिशियल हेअर कलर लावणे केसांसाठी (natural hair dye with tea) हानिकारक ठरु शकते. खरंतर, पांढऱ्या केसांना रंग देण्यासाठी बाजारातील डाय किंवा केमिकलयुक्त हेअर कलर वापरणे हे नेहमीच केसांसाठी सुरक्षित नसते. यामुळे केस कोरडे होणे, तुटणे किंवा नुकसान होण्याची (How to Make Hair Colour from Tea Powder) शक्यता वाढते. पण काळजी करू नका, कारण आपल्या स्वयंपाकघरातील साधी चहा पावडर यावर नैसर्गिक उपाय ठरू शकते. जर केसांना नैसर्गिकरीत्या काळे आणि चमकदार करायचे असेल, तर घरात उपलब्ध असलेल्या चहा पावडरचा वापर आपण करू शकतो(homemade hair colour with tea).

चहा पावडर केवळ केसांचा रंगच गडद करत नाही, तर त्यांना नैसर्गिक पोषण देऊन निरोगी बनवते. चहा पावडर वापरुन केसांना सुंदर नैसर्गिक तपकिरी-काळसर असा रंग देता येते आणि ते ही कोणत्याही साइड इफेक्टशिवाय. त्यामुळे पांढऱ्या केसांना घरच्याघरीच सोप्या पद्धतीने कलर करायचा असेल तर हा उपाय नक्कीच करून बघाच. चहा पावडरपासून हेअर कलर बनवण्याची आणि केसांसाठी   वापरण्याची योग्य पद्धत पाहूयात. 

 चहा पावडरपासून हेअर कलर तयार करण्याची सोपी युक्ती... 

चहा पावडरपासून हेअर कलर तयार करण्यासाठी, ४ ते ५ मोठे चमचे चहा पावडर घ्या आणि ती २ कप पाण्यात उकळा. पाण्याचा रंग गडद आणि तपकिरी होईपर्यंत मंद आचेवर हळूहळू उकळू द्या. आपल्या आवडीनुसार आपण त्यात १ ते २ दालचिनीचे तुकडे किंवा लवंगा घालू शकता, ज्यामुळे रंगाचा सुगंध अधिक चांगला येतो तसेच कलर अधिक गडद होण्यास मदत मिळते. पाणी उकळल्यानंतर गॅस बंद करून पाण्याला थोडे थंड होऊ द्या आणि नंतर गाळणीने  हे पाणी गाळून घ्या. आता केसांवर लावण्यासाठी नॅचरल हेअर कलर तयार आहे. तयार हेअर कलर आपण स्प्रे बाटलीमध्ये भरून ठेवू  शकता किंवा थेट वाटीत घेऊन ब्रशच्या मदतीने केसांवर लावू शकता. 

पांढऱ्या केसांना 'या' पद्धतीने लावा घरगुती तेल! होतील काळेभोर घनदाट - एकही पांढरा केस दिसणार नाही...

 साडी कोणतीही असो, शोभून दिसतील असे ब्लाऊजचे ६ नेक पॅटर्न्स! प्रत्येकीकडे असायलाच हवे अशा डिझाइन्सचे ब्लाऊज...  

हेअर कलर केसांवर लावण्याची योग्य पद्धत... 

केसांना थोडे ओले करा. तयार केलेला हेअर कलर केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत ब्रशच्या मदतीने केसांवर व्यवस्थित लावून घ्या. हा हेअर कलर केसांवर  लावल्यानंतर शॉवर कॅप घाला आणि कमीत कमी ३० ते ४० मिनिटांसाठी तसेच राहू द्या. यामुळे रंग केसांमध्ये चांगल्या प्रकारे मुरेल. यानंतर, फक्त पाण्याने केस धुवा. त्या दिवशी शाम्पूचा वापर करू नका, कारण त्यामुळे रंग लवकर निघून जाऊ शकतो. 

नॅचरल चहा पावडरचा हेअर कलर वापरण्याचे फायदे... 

जर आपले केस अधिक जास्त प्रमाणात पांढरे झाले असतील, तर पहिल्या वेळी किंवा फक्त एकदाच हा उपाय करुन रंग फार गडद येणार नाही. अशावेळी, आठवड्यातून २ ते ३ वेळा ही प्रक्रिया पुन्हा करा. नियमितपणे लावल्याने केस हळूहळू नैसर्गिकरित्या काळे आणि चमकदार होतील.

चहा पावडरमध्ये असलेले टॅनिन केसांचा रंग गडद तपकिरी - काळा करण्यास मदत करतात. चहा पावडरचा रंग केसांना फक्त सुंदरच नाही, तर मजबूत आणि निरोगी देखील बनवतो. यात असलेले अँटिऑक्सिडंट्स केस गळणे थांबवतात आणि स्काल्पचे पोषण करतात. जर तुम्हाला आणखी गडद रंग हवा असेल, तर चहा पावडरच्या मिश्रणात थोडीशी कॉफी पावडर मिसळू शकता. हे मिश्रण केसांना आणखी गडद तपकिरी रंग देईल. 

हा उपाय करण्यापूर्वी घ्या काळजी... 

१. पहिल्यांदा वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट (patch test) नक्की करा, जेणेकरून ॲलर्जीची समस्या होणार नाही.

२. नेहमी ताजा हेअर कलर तयार करून मगच त्याचा वापर करा, जुन्या हेअर कलरचा रंग कमी होऊ शकतो.

३. जे लोक नेहमी रासायनिक हेअर डाय वापरतात, त्यांनी हा नैसर्गिक उपाय वापरण्याआधी केसांवरील रासायनिक हेअर डायचा कृत्रिम रंग संपूर्णपणे जाऊ द्यावा.   

अशा प्रकारे, चहा पावडरपासून तयार केलेला नैसर्गिक हेअर कलर केसांना काही मिनिटांतच काळे, चमकदार आणि निरोगी बनवण्याचा एक सोपा मार्ग आहे. हा एक सुरक्षित, स्वस्त आणि घरगुती उपाय आहे, ज्यामुळे तुम्ही कोणत्याही हानीशिवाय सुंदर केस मिळवू शकता.

English
हिंदी सारांश
Web Title : Tea powder hair color: Budget-friendly, natural dye for beautiful hair.

Web Summary : Combat gray hair naturally with tea powder! This budget-friendly method darkens hair, adds shine, and promotes scalp health. Learn how to easily prepare and apply this homemade hair color for best results.
टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडीघरगुती उपाय