Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > काचेसारखे चमचमणारे केस हवेत ? ‘असं’ बनवा अळशीचं नॅचरल हेअर जेल - महागड्या स्पापेक्षा भारी...

काचेसारखे चमचमणारे केस हवेत ? ‘असं’ बनवा अळशीचं नॅचरल हेअर जेल - महागड्या स्पापेक्षा भारी...

homemade flaxseed gel for hair : flaxseed gel for shiny hair : flaxseed gel for hair growth : how to make flaxseed gel at home : homemade hair gel for frizzy hair : अळशीच्या बियांचे घरगुती हेअर जेल वापरल्यास केसांना पोषण मिळतेच, शिवाय केस सिल्की आणि स्मूद दिसतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2026 15:40 IST2026-02-17T15:40:00+5:302026-02-17T15:40:01+5:30

homemade flaxseed gel for hair : flaxseed gel for shiny hair : flaxseed gel for hair growth : how to make flaxseed gel at home : homemade hair gel for frizzy hair : अळशीच्या बियांचे घरगुती हेअर जेल वापरल्यास केसांना पोषण मिळतेच, शिवाय केस सिल्की आणि स्मूद दिसतात.

homemade flaxseed gel for hair flaxseed gel for shiny hair flaxseed gel for hair growth how to make flaxseed gel at home | काचेसारखे चमचमणारे केस हवेत ? ‘असं’ बनवा अळशीचं नॅचरल हेअर जेल - महागड्या स्पापेक्षा भारी...

काचेसारखे चमचमणारे केस हवेत ? ‘असं’ बनवा अळशीचं नॅचरल हेअर जेल - महागड्या स्पापेक्षा भारी...

आजकाल आपल्यापैकी अनेकींना केसांच्या अनेक लहान - मोठ्या समस्या फार सतावतात. केस गळणे, कोरडेपणा, फ्रिझीनेस आणि नैसर्गिक चमक हरवणे अशा समस्या प्रामुख्याने फार मोठ्या प्रमाणांत पाहायला मिळतात. आपले केस मऊमुलायम, लांबसडक असावेत सोबतच केसांना नैसर्गिक चमक असावी असं प्रत्येकीला वाटत. केसांना हवी तशी नॅचरल शाईन आणि मऊमुलायमपणा मिळत नसल्याने आपण वेगवेगळे उपाय करतो. परंतु केसांना नैसर्गिक पद्धतीने शाईन आणि मऊमुलायमपणा हवा असल्यास घरगुती उपायांमध्ये 'अळशीच्या बिया' अत्यंत फायदेशीर ठरतात. या बियांमध्ये प्रथिने, आयर्न, व्हिटॅमिन्स आणि पोषक घटक भरपूर प्रमाणात असल्यामुळे केस मजबूत होऊन, ड्रायनेस कमी होण्यास आणि केसांना नैसर्गिक चमक येण्यास मदत होते(how to make flaxseed gel at home).

अळशीच्या बियांचे घरगुती हेअर जेल वापरल्यास केसांना पोषण मिळतेच, शिवाय केस सिल्की आणि स्मूद दिसतात. अगदी कमी साहित्यामध्ये आणि सोप्या पद्धतीने हे (homemade flaxseed gel for hair) नैसर्गिक हेअर जेल घरी तयार करता येते. जर तुमचे केस कोरडे, निस्तेज झाले असतील किंवा खूप गळत असतील, तर अळशीच्या बियांचे जेल एक वरदान ठरू शकते. केसांना नॅचरल शाईन (flaxseed gel for shiny hair) देणारे अळशीच्या बियांचे घरगुती हेअर जेल नेमकं कसं तयार करायचं आणि ते वापरण्याची योग्य पद्धत काय आहे, ते पाहूयात... 

अळशीच्या बियांचे घरगुती हेअर जेल तयार करण्यासाठी लागणारे साहित्य... 

१. पाणी - २ कप 
२. अळशीच्या बिया - ३ ते ४ टेबलस्पून 
३. खोबरेल तेल - १ टेबलस्पून 
४. एरंडेल तेल - १ टेबलस्पून
५. मध - १ टेबलस्पून

अळशीच्या बियांचे घरगुती हेअर जेल कसे तयार करायचे ? 

अळशीच्या बियांचे घरगुती हेअर जेल तयार करण्यासाठी सर्वात आधी एका पॅनमध्ये पाणी घेऊन ते व्यवस्थित गरम करून घ्यावे. मग या गरम उकळत्या पाण्यात अळशीच्या बिया घालाव्यात. त्यानंतर मंद आचेवर हे हलकेच उकळू द्यावे जोपर्यंत या पाण्याचे चिकट जेलमध्ये रूपांतर होत नाही तोपर्यंत हे मिश्रण मंद आचेवर गरम करून घ्यावे. या मिश्रणावर झाकण ठेवून एक हलकीच वाफ काढून घ्यावी. मग हे पाणी थोडे कोमट झाल्यावर गाळणीच्या मदतीने गाळून घ्यावे. मग या पाण्यांत प्रत्येकी १ टेबलस्पून खोबरेल तेल, एरंडेल तेल, मध घालावे. सगळे मिश्रण चमच्याने कालवून एकजीव करून घ्यावे. तयार आहे अळशीच्या बियांचे घरगुती नॅचरल हेअर जेल...   

शिवजयंती विशेष : चंद्रकोर कडीयाल पैठणीचा शाही थाट, नऊवारी नेसा किंवा सहावारी ! रुप सुंदरच...

वाढतं वय, त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी चित्रांगदा सिंग पिते कडूकडू ज्यूस! त्वचेवर येतो विशीतल्या तरुणीसारखा ग्लो... 

हेअर जेल केसांसाठी कसं वापरावं... 

अळशीच्या बियांचे हे घरगुती हेअर जेल केसांच्या मुळांपासून शेंड्यापर्यंत व्यवस्थित लावा. हलक्या हाताने ५ मिनिटे मसाज करा. साधारण ३० ते ४५ मिनिटे हे जेल केसांवर राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने आणि माईल्ड शाम्पुने केस स्वच्छ धुवा. हे जेल तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून ७ ते १० दिवसांपर्यंत वापरू शकता. आठवड्यातून किमान एकदा याचा वापर केल्यास केस मऊमुलायम आणि शायनी दिसू लागतील. 

केसगळती होऊन टक्कल पडायच्या आधी लावा हे 'काळं तेल'! केसांच्या समस्यांवर एकच उपाय - वाढतील दुपटीने भराभर... 


अळशीच्या बियांचे हेअर जेल वापरण्याचे फायदे... 

१. अळशीच्या बियांमध्ये लोह आणि प्रथिने मुबलक असतात, जे केसांच्या वाढीसाठी आवश्यक आहेत. 

२. यात असलेल्या व्हिटॅमिन 'ई' मुळे केसांना नॅचरल शाईन येते.

३. मुळांना मजबुती देऊन हे जेल केस गळणे कमी करते.

Web Title : अलसी हेयर जेल: घर पर पाएं चमकदार, रेशमी बाल, प्राकृतिक रूप से

Web Summary : घर पर बने अलसी के जेल से बालों की समस्याओं से लड़ें! पोषक तत्वों से भरपूर, यह बालों को मजबूत करता है, रूखापन कम करता है और चमक बढ़ाता है। सरल सामग्री के साथ बनाना आसान, यह बालों को रेशमी और चिकना बनाता है। सर्वोत्तम परिणामों के लिए साप्ताहिक उपयोग करें।

Web Title : Flaxseed Hair Gel: Get Shiny, Silky Hair at Home Naturally

Web Summary : Combat hair problems with homemade flaxseed gel! Rich in nutrients, it strengthens hair, reduces dryness, and adds shine. Easy to make with simple ingredients, it leaves hair silky and smooth. Use weekly for best results and hair that shines.