डोळ्यांना सुंदर आणि रेखीव दिसण्यासाठी आपण त्यावर काजळ, आयलाइनर, मस्करा आणि इतर ब्यूटी प्रोडक्ट्सचा वापर करतो.(Homemade gel eyeliner) काजळ आणि आयलाइनर हल्ली प्रत्येक स्त्री आपल्या डोळ्यांना लावते. ज्यामुळे डोळ्यांचा लूक अधिक सुंदर दिसतो. बाजारात आपल्याला अनेक प्रकारचे ब्यूटी प्रोडक्ट्स मिळतात. (chemical-free eyeliner)परंतु, यामध्ये काही अंशी केमिकल्स असल्यामुळे डोळ्यांचे नुकसान होते. (Natural eyeliner recipe)
अनेकदा काजळ, लायइनर लावल्यानंतर डोळ्यांची आग होते, डोळ्यांतून पाणी येऊ लागते, डोळे झोंबतात किंवा लाल होतात ज्याचा आपल्याला त्रास होतो.(How to make eyeliner at home) घरच्या घरी सोप्या पद्धतीने आयलाइनर बनवल्यास आपल्या डोळ्यांना नुकसान देखील होणार नाही. तसेच अगदी कमी खर्चात आयलाइनर बनेल. कसे बनवायचे पाहूया. (Organic gel eyeliner)
फक्त २ रुपयांचा कापूर ठरतो केसांसाठी संजीवनी! विरळ होणारे केस होतील दाट-टक्कलही पडणार नाही
आयलाइनर बनवण्यासाठी आपल्याला चारकोलचा वापर करता येईल. त्वचेची काळजी घेण्यासाठी आयलाइनरमध्ये कोळसा वापरला जातो. यासाठी आपल्याला अर्धा चमचा कोळसा पावडर, नारळाचे तेल अर्धा चमचा आणि कोरफड जेलचा वापर करायला हवा.
हे बनवण्यासाठी आपल्याला कोळसा पावडरमध्ये नारळाचे तेल आणि कोरफडचा गर घालून पुन्हा चांगले मिक्स करा. एका छोट्या डब्यात भरून ठेवा. या आयलाइनरमुळे डोळ्यांची आग होणार नाही तसेच डोळे सुंदर आणि छान दिसतील.
उन्हाळ्यात 'या' पद्धतीने चेहऱ्यावर लावा मुलतानी माती, त्वचेला मिळेल गारवा, जळजळ-टॅनिंग होईल कमी
आयलाइनर बनवण्यासाठी आणखी एक सोपी पद्धत आहे. यामध्ये आपण कोको पावडर अर्धा चमचा, कोरफडीचा गर आणि नारळाचे दोन थेंब वापरु शकतो. हे बनवण्यासाठी आपण तिन्ही पदार्थ एकजीव करुन तपकिरी रंगाचे आयलाइनर तयार करु शकता. यामुळे डोळ्यांच्या लूकमध्ये आणखी भर पडेल आणि ते उठावदार दिसतील.