सकाळी उठल्यावर उशीवर पडलेले केस असोत किंवा विंचरताना कंगव्यात अडकलेले केसांचे पुंजके आपलं टेन्शन वाढवतात. आपलेही केस सुंदर-लांबसडक आणि काळेभोर असावे असं प्रत्येकाला वाटतं.(Hair Care Tips) केसांची काळजी घेण्यासाठी आपण महागडे शाम्पू बदलतो, कंडिशनर्सवर हजारो रुपये खर्च करतो पण तरीही जेव्हा केस विरळ होतात, तेव्हा आत्मविश्वास ढासळू लागतो.(Homemade ayurvedic shampoo for hair fall) पण केसांच्या सर्व समस्या या आयुर्वेदाच्या कुशीत दडलेले आहे. (Best oil for thin hair to make it thick)
आयुर्वेदातल्या काही घटकांचा वापर करुन आपण खास तेल बनवू शकतो. हेअर फॉल्समुळे हैराण असाल आणि नैसर्गिक पद्धतीने केसांचे सौंदर्य परत मिळवू इच्छित असाल, तर हे खास आयुर्वेदिक तेल आपल्यासाठी मॅजिकल सोल्युशन ठरणार आहे.(Rosemary oil benefits for hair growth Marathi tips) इतकंच नाही तर आपण घरगुती शाम्पू देखील केसांना लावल्यास काही दिवसात फरक जाणवेल. हे तेल आणि शाम्पू कसं तयार करायचं पाहूया.
केसांसाठी घरी तयार केलेले शुद्ध मोहरीचे तेल घ्यावं लागेल. हे तेल बनवण्यासाठी मोहरीच्या तेलात मेथीचे दाणे आणि कढीपत्ता टाकून ते चांगले उकळवून घ्या. त्यानंतर हे तेल आठवड्यातून दोन वेळा केसांना लावा. सलग दोन महिने या तेलाचा वापर केल्यास आपल्याला फरक पाहायला मिळेल.
शाम्पू तयार करण्यासाठी आपल्याला आवळा पावडर २ चमचे, रिठा पावडर ४ चमचे, शिकाकाई पावडर २ चमचे, जास्वंदाच्या फुलांची पावडर २ चमचे, मुलतानी माती २ चमचे, भृंगराज पावडर २ चमचे, रोजमेरी एसेन्शियल ऑइल ३ ते ४ थेंब इत्यादी साहित्य लागेल.
शाम्पू बनवण्यासाठी सगळ्यात आधी सर्व पावडर एका काचेच्या किंवा लोखंडी भांड्यात मिक्स करा. यात थोडे कोमट पाणी घालून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट रात्रभर पाण्यात भिजत ठेवल्यास त्याचे गुणधर्म अधिक वाढतात. सकाळी शाम्पू केसांना लावण्यापूर्वी रोजमेरी ऑइलेचे थेंब त्यात चांगले मिसळा. केस ओले करुन त्यावर तयार केलेली पेस्ट टाळूवर आणि केसांच्या लांबीवर व्यवस्थित लावा. ५ ते ७ मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर साध्या पाण्याने केस स्वच्छ धुवा.
यात असणारे आयुर्वेदिक घटक केसगळती रोखण्यास मदत करते. भृंगराज आणि आवळा विरळ केसांना जाडजूड करतात. नियमित वापरल्यास अवघ्या दोन महिन्यांत केसांची लांबी वाढलेली दिसेल. यात सल्फेट किंवा पॅराबेन्स नसल्यामुळे केसांचे नैसर्गिक तेल टिकून राहते. मुलतानी माती आणि शिकाकाई टाळूला निरोगी ठेवण्यास मदत होते.
