Join us

आल्याचा तुकडा, कांद्याची सालं, मेथी दाण्यांचे आयुर्वेदिक तेल! केसगळती थांबून, दुप्पट वेगाने होईल केसांची वाढ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2025 14:35 IST

Get long, thick, & shiny hair with this powerful DIY hair growth oil : Homemade Ayurvedic Hair Oil : home-made ayurvedic hair oils to reduce hair fall & hair problems : How to make Ayurvedic Hair Oils for Hair growth At Home : घरच्याघरीच एक खास आयुर्वेदीक तेल करा झटपट, केसांचे सौंदर्य खुलण्यास होईल मदत...

आपले केस लांबसडक, काळेभोर, घनदाट असावेत अशी प्रत्येकीचीच इच्छा असते. परंतु आपले केस आपल्याला हवेत तसे होत नाहीत. केसांच्या काही ना काही समस्या (Get long, thick, & shiny hair with this powerful DIY hair growth oil) असतातच. कधी केसगळती, केसांची वाढ न होणे, केसांत कोंडा वाढणे, केस रुक्ष व निस्तेज होणे अशा एक (Homemade Ayurvedic Hair Oil) ना अनेक समस्या असतात. केसांच्या बाबतीत (home-made ayurvedic hair oils to reduce hair fall & hair problems) कधीही कमी न होणाऱ्या या समस्या सारख्या वाढतच जातात. आपण वेळच्यावेळीच या समस्यांकडे लक्ष देत नसल्याने मग कालांतराने या समस्या आणखीनच वाढत जातात. असे होऊ नये आणि केस कायम छान राहावेत यासाठी वेळीच उपचार केलेले केव्हाही चांगले(How to make Ayurvedic Hair Oils for Hair growth At Home).

केस धुण्याआधी आपण केसांना आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तेल लावतो. हे तेल साधारणपणे बाजारात मिळणारे खोबरेल तेल किंवा बदाम, आवळा तेल असते. पण त्यापेक्षा केस लांबसडक आणि दाट होण्यासाठी घरच्या घरी एक खास आयुर्वेदीक तेल तयार केल्यास केसांचे सौंदर्य खुलण्यास मदत होते. हे तेल तयार करण्यासाठी आपण घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांच्या मदतीने अगदी तासाभरात तयार करू शकतो. केसांच्या अनेक समस्यांवर असरदार असे घरगुती आयुर्वेदिक तेल कसे करायचे ते पाहूयात.   

साहित्य :- 

१. मेथी दाणे - ३ टेबलस्पून २. आलं - १ छोटा तुकडा ३. कांद्याच्या साली - १ वाटी ४. एरंडेल तेल - १ कप  ५. खोबरेल तेल - १ कप ६. व्हिटॅमिन ई कॅप्सूल - ४ कॅप्सूल 

उन्हाळ्यात कलिंगडाची सालं म्हणजे त्वचेसाठी वरदान! जादुई फेसमास्क करेल टॅनिंग दूर - मिळेल नैसर्गिक थंडावा...

वर्षानुवर्षे डोळ्यांखाली असणारे डार्क सर्कल्स होतील गायब, फक्त २ स्टेप्स - स्वयंपाक घरातील 'हे' पदार्थ असरदार...

कृती :- 

१. एका मिक्सरच्या भांड्यात मेथी दाणे, आल्याचा तुकडा, कांद्याच्या साली असे सगळे जिन्नस एकत्रित घेऊन पाणी न घालता त्याची सुकी पेस्ट तयार करून घ्यावी. पेस्ट एकदम बारीक पावडर सारखी न करता थोडी जाडसर भरड करून घ्यावी. २. मिक्सरमधील तयार मिश्रण एका काचेच्या बाटलीत भरून घ्यावे. त्यानंतर याच बाटलीत सर्वात आधी एरंडेल तेल आणि नंतर खोबरेल तेल समप्रमाणात ओतून घ्यावे. बाटली संपूर्ण भरेल इतके तेल ओतून घ्यावे. 

सोनाक्षी सिन्हाच्या सुंदर केसांचे सिक्रेट! वापरते 'या' आयुर्वेदिक पदार्थांनी तयार केलेला घरगुती हेअर स्प्रे...

३. सगळ्यात शेवटी या बाटलीत ४ व्हिटॅमिन ई च्या कॅप्सूल फोडून घालाव्यात. त्यानंतर चमच्याने हे सगळे बाटलीतील मिश्रण हलवून एकजीव करून घ्यावे. मग बाटलीचे झाकण लावून बाटली बंद करून पुढील ३ ते ४ दिवस थेट सूर्यप्रकाशात ठेवावी. ४. ३ ते ४ दिवस बाटली सूर्यप्रकाशात ठेवल्यानंतर हे तेल केसांना लावण्यासाठी तयार आहे. 

हे तेल केसांना लावण्याचे फायदे...  

१. या तेलामध्ये, कांद्याच्या साली, आलं, मेथी दाणे घातल्याने हे पदार्थ आपल्या केसांचे आरोग्य आणि सौंदर्यासाठी अधिक फायदेशीर ठरतात. २. केसांच्या मुळांना यामुळे मजबुती मिळते. याचबरोबर, केस गळती रोखण्यास आणि त्यांना लांब आणि दाट करण्यास मदत होते. ३. एरंडेल आणि खोबरेल तेलामुळे केसांना नैसर्गिक थंडावा मिळतो. डोक्यातील कोंडा आणि केसांसंबंधित इतर समस्या देखील कमी होण्यास मदत होते.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी