Join us
Daily Top 2Weekly Top 5

फक्त २० रुपयांत मिळेल ‘ॲण्टी हेअर फॉल स्प्रे’! केसांचं गळणं थांबलंच म्हणून समजा, मिळवा मजबूत केस...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2026 15:23 IST

homemade anti hair fall spray : anti hairfall spray at home : homemade hair fall control spray : hair fall stopping spray home remedy : कोणतीही केमिकल्स न वापरता, घरीच अवघ्या १० मिनिटांत हा हेअर ग्रोथ स्प्रे कसा तयार करायचा ते पाहा...

दाट, लांबसडक आणि चमकदार केस असावेत अशी प्रत्येकीचीच इच्छा असते. परंतु आजकाल वाढती केसगळती ही पुरुष - महिला दोघांसाठीही मोठी चिंता बनली आहे. कंगवा हातात घेतला की मुळासकट उपटून येणारे केस पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो. केसगळती कमी करण्यासाठी आपल्यापैकी बरेचजण अनेक महागडे उपाय देखील करून पाहतात. पण त्याचा परिणाम हमखास मिळेलच असे नाही. अशावेळी नैसर्गिक, सुरक्षित आणि घरच्याघरी तयार करता येणारा उपाय अधिक फायदेशीर ठरतो. घरगुती 'अँटी हेअर फॉल स्प्रे' हा असाच एक फायदेशीर उपाय असून तो केसांच्या मुळांना पोषण देतो, स्काल्प निरोगी ठेवतो आणि केसगळती कमी करण्यास मदत करतो(hair fall stopping spray home remedy).

साध्या घरगुती घटकांपासून तयार होणारा हा स्प्रे नियमित वापरल्यास केस मजबूत, घनदाट आणि चमकदार होण्यास फायदेशीर ठरतो. आपल्या स्वयंपाकघरातील नेहमीच्याच वापरातील काही पदार्थ असे असतात की जे, केसांची मुळे अधिक मजबूत करण्याची आणि नवीन केस उगवण्यासाठी फायदेशीर ठरतात. केसांसाठी वरदान ठरणारा 'नॅचरल अँटी हेअर फॉल स्प्रे' (anti hairfall spray at home) घरीच कसा तयार करायचा आणि त्याच्या वापरामुळे केस गळणे थांबून ते काळेभोर आणि घनदाट होतील! 'मॅजिकल अँटी हेअर फॉल स्प्रे' जो केसांसाठी एखाद्या 'अमृता'सारख काम करेल. हा स्प्रे फक्त केस गळणे थांबवणार नाही, तर नवीन केस येण्यासही मदत करेल. कोणतीही केमिकल्स न वापरता, घरीच अवघ्या १० मिनिटांत हा हेअर ग्रोथ स्प्रे कसा तयार करायचा, ते पाहूयात... 

अँटी हेअर फॉल स्प्रे कसा तयार करायचा? 

साहित्य :- 

१. जास्वंदीची फुले - २  फुले २. रोजमेरी - १/२ कप ३. मेथी दाणे - १ टेबलस्पून४. कलोंजी - १ टेबलस्पून ५. भृंगराज पावडर किंवा सुकी पाने - २ पाने ६. कडीपत्त्याची पाने - १० ते १२ पाने७. लवंग काड्या - २ ते ३ काड्या ८. पाणी - ग्लासभर

अँटी हेअर फॉल स्प्रे तयार करण्यासाठी... 

केसांसाठी 'अँटी हेअर फॉल स्प्रे' तयार करण्यासाठी सर्व साहित्य पाण्यांत साधारण १० ते १५ मिनिटांपर्यंत व्यवस्थित उकळवून घ्यायचे आहे. उकळल्यानंतर हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्या. मिश्रण थंड झाल्यावर ते एका गाळणीने गाळून घ्या आणि एका स्प्रे बाटलीमध्ये भरून स्टोअर करून ठेवा.

आंघोळ करताना महिलांनी वापरावेत 'हे' ८ 'मस्ट-हॅव' ब्यूटी टूल्स! त्वचा दिसेल सुंदर - छोटासा बदल पाडेल सौंदर्यात भर... 

घरीच ५ रुपयांत हेअर कलर! पांढऱ्या केसांवर घरगुती रंगाची जादू  - हेअर कलरिंग करणे होईल अगदी सोपे... 

हा अँटी हेअर फॉल स्प्रे वापरण्याची पद्धत... 

आपण हा हेअर स्प्रे दिवसातून एकदा आणि एक दिवस आड वापरू शकता. हा स्प्रे केसांवर लावण्यासाठी संध्याकाळी ४:०० वाजेपूर्वीची वेळ सर्वोत्तम आहे. सकाळी किंवा दुपारी तुम्ही हा स्प्रे केसांच्या मुळांशी व्यवस्थित लावू शकता. एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा की, हा स्प्रे रात्रीच्या वेळी केसांवर लावू नका.

साऊथ इंडियन महिलांचा १ रुपयाचा घरगुती उपाय! काळ्याभोर, रेशमी केसांसाठी पितात खास ड्रिंक - केस वाढतील वेगाने... 

अँटी हेअर फॉल स्प्रे केसांवर लावण्याचे फायदे... 

१. या स्प्रेमधील नैसर्गिक घटकांमुळे केसांच्या मुळांना आवश्यक पोषण मिळते, ज्यामुळे मुळे घट्ट होतात आणि केस गळणे कमी होते.

२. हा स्प्रे स्काल्पचे रक्ताभिसरण सुधारतो, ज्यामुळे केसांची मुळे पुन्हा अ‍ॅक्टिव्ह होतात आणि नवीन केस उगवण्यास मदत होते.

३. याच्या नियमित वापरामुळे केस मऊ, रेशमी आणि चमकदार होतात. केसांचा कोरडेपणा कमी होऊन ते हायड्रेटेड राहतात.

४. स्प्रेमधील कडीपत्ता किंवा रोजमेरी, स्काल्पवरील संसर्ग आणि कोंडा दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात.

५. घरगुती स्प्रेमध्ये वापरले जाणारे नैसर्गिक घटक केसांचा नैसर्गिक काळा रंग टिकवून ठेवण्यास मदत करतात आणि अकाली केस पांढरे होण्यापासून रोखतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Anti-hair fall spray for just ₹20! Get strong hair.

Web Summary : Struggling with hair fall? This article suggests a homemade anti-hair fall spray using ingredients like hibiscus, rosemary, and fenugreek. Regular use strengthens hair roots, promotes new growth, and adds shine. Apply during the day for best results.
टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडीघरगुती उपाय