हिवाळ्यात बाजारात हिरवेगार, टवटवीत आणि औषधी गुणांनी समृद्ध असलेले 'आवळे' मोठ्या प्रमाणात विकायला ठेवलेले दिसू लागतात. आयुर्वेदात आवळ्याला 'अमृतफळ' मानले जाते, जे केवळ आरोग्यासाठीच नाही तर केसांच्या सौंदर्यासाठीही वरदान ठरते. आजकाल बाजारात केसांच्या समस्यांवर अनेक प्रकारची तेल मिळतात, पण त्यात असणारी केमिकल्स अनेकदा फायद्यापेक्षा तोटाच जास्त करतात. ताज्या, रसरशीत आवळ्यापासून घरच्या घरी तयार केलेलं पारंपरिक आवळ्याचं तेल केसांना मजबुती, चमक आणि केसांचं आरोग्य व सौंदर्य जपण्यास मदत करतं. हानिकारक रासायनिक घटक असलेले बाजारातील तेलापेक्षा, घरगुती आवळ्याचं तेल अधिक सुरक्षित आणि केसांसाठी फायद्याचे ठरते(how to make amla oil at home for hair).
अशावेळी, आपल्या आजी-पणजीच्या काळातील घरगुती पारंपरिक आवळा तेल हा केसांच्या सर्व समस्यांवरचा रामबाण उपाय ठरू शकतो. पांढरे होणारे केस, केसांची गळती, कोंडा किंवा निस्तेज केस यांवर हे नैसर्गिक तेल अत्यंत असरदार ठरते. हिवाळ्यात मिळणाऱ्या ताज्या आवळ्यांपासून कोणत्याही भेसळीशिवाय, शुद्ध आणि पोषक असं तेल घरच्याघरीच करणं सोपं आहे. घरगुती (homemade amla oil for hair fall control) पद्धतीने आवळ्याचं तेल तयार करण्याची सोपी आणि पारंपारिक पद्धत पाहा...
घरच्याघरीच नैसर्गिक पद्धतीने आवळ्याचं तेल कसं करायचं ?
घरच्याघरीच नैसर्गिक पद्धतीने आवळ्याचं तेल तयार करण्यासाठी आपल्याला १० ते १५ आवळे, कडीपत्त्याची पाने वाटीभर, मोहरीचे तेल १/२ कप, तिळाचे तेल १/२ कप, खोबरेल तेल १ कप इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
आवळ्याचं तेल तयार करण्याची कृती...
आवळ्याचं घरगुती तेल तयार करण्यासाठी सर्वात आधी ताजे, रसरशीत आवळे स्वच्छ धुवून, पुसून घ्यावेत. मग या आवळ्याचे छोटे - छोटे तुकडे करावेत. मिक्सरच्या मोठ्या भांड्यात आवळ्याचे तुकडे आणि कडीपत्त्याची पाने घालून ती एकत्रित वाटून घ्यावीत. मग त्यात मोहरीचे तेल घालून पुन्हा एकदा सगळे मिश्रण मिक्सरमध्ये एकत्रित मिक्सरमधून फिरवून घ्यावे. एक पॅन घेऊन तो गॅसच्या मंद आचेवर व्यवस्थित गरम करावा मग यात मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं मिश्रण घालावे मिश्रण हलकेच परतवून घ्यावे मग यात तिळाचे आणि खोबरेल तेल घालावे. हे सगळे मिश्रण चमच्याने सारखे हलवत मंद आचेवर मिश्रणाचा रंग बदलून पूर्णपणे काळा होईपर्यंत गरम करून घ्यावे. त्यानंतर गॅस बंद करून तेल गाळणीने गाळून एका एअर टाईट कंटेनरमध्ये भरून स्टोअर करून ठेवावं.
गुडघ्यापर्यंत लांब केस हवे तर करा 'या' तेलानं करा मसाज, केस इतके वाढतील , की सांभाळणंही कठीण...
घरगुती पारंपरिक पद्धतीचं आवळ्याचं तेल केसांसाठी कसं फायदेशीर...
१. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन 'सी' आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे तेल केसांच्या मुळांना पोषण देऊन ती अधिक मजबूत करतात, ज्यामुळे केस गळण्याचे प्रमाण कमी होते.
२. आवळा तेल केसांचा नैसर्गिक काळा रंग टिकवून ठेवण्यास मदत करते. ज्यांना कमी वयात केस पांढरे होण्याची समस्या आहे, त्यांच्यासाठी हे तेल वरदान आहे.
३. हे तेल लावल्यामुळे केसांना नैसर्गिक चमक मिळते आणि केस मऊ व रेशमी होतात.
४. आवळ्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. हिवाळ्यात होणारा कोंडा आणि टाळूला येणारी खाज यावर हे घरगुती तेल अत्यंत फायदेशीर ठरते.
५. हे तेल स्काल्पचे रक्ताभिसरण सुधारते. जेव्हा केसांच्या मुळांना योग्य रक्तपुरवठा मिळतो, तेव्हा केसांची वेगाने वाढ होते.
