Join us
Daily Top 2Weekly Top 5

खांद्यावर पडणारा कोंडा होईल गायब! खोबरेल तेलात २ पानं मिसळून करा मसाज - डँड्रफ वाढण्याची डोकेदुखी होईल कमी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2026 17:32 IST

home remedy to reduce dandruff at home : home remedy to reduce dandruff at home : natural remedies for dandruff : how to get rid of dandruff at home : केसांतील डँड्रफ कायमचा काढण्यासाठी, खोबरेल तेलात काही घरगुती पदार्थ मिसळून मालिश केल्यास दिसेल चांगला फरक...

हिवाळा सुरू झाला की त्वचा आणि केस दोन्ही कोरडे पडू लागतात. विशेषतः थंडीच्या दिवसांत केसांमध्ये वाढणारा डँड्रफ ही समस्या अनेकांना सतावते. स्काल्प  कोरडी होणे, खाज सुटणे, खांद्यावर सतत डँड्रफचे पांढरे कण पडणे अशा तक्रारी वाढतात. वेळेवर डँड्रफ स्वच्छ केला नाही तर केस गळणे, स्काल्पला संसर्ग होणे आणि केसांची वाढ खुंटणे यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. केसांत झालेला कोंडा केवळ खाज आणि जळजळ निर्माण करत नाही, तर यामुळे केस गळण्याचे प्रमाणही वाढते(how to get rid of dandruff at home).

थंडीच्या दिवसांत हवेतला कोरडेपणा वाढल्यामुळे टाळूतील नैसर्गिक ओलावा कमी होतो आणि त्याचा थेट परिणाम केसांमध्ये डँड्रफ वाढण्यावर होतो. सुरुवातीला हलकी खाज किंवा पांढरे कण दिसतात, पण वेळेवर काळजी घेतली नाही तर डँड्रफ जाड थराच्या स्वरूपात जमा होऊन खूपच त्रासदायक ठरतो. अशा परिस्थितीत, घरात उपलब्ध असलेल्या काही नैसर्गिक पदार्थांच्या मदतीने केसांतील डँड्रफ अगदी सहजपणे काढणे शक्य होते. केसांतील डँड्रफ कायमचा काढण्यासाठी, खोबरेल तेलात काही घरागुती पदार्थ मिसळून त्याने केसांवर मालिश केल्यास बराच फरक पडतो. केसातील वाढलेला डँड्रफ कमी (home remedy to reduce dandruff at home) करण्यासाठी खोबरेल तेलात नेमके कोणते पदार्थ मिसळून लावावेत ते पाहूयात... 

केसांतील वाढता डँड्रफ कमी करण्यासाठी घरगुती उपाय... 

केसांतील वाढलेला डँड्रफ कमी करण्यासाठी घरगुती उपाय करण्यासाठी, १ कप खोबरेल तेल, १ कप कडीपत्त्याची पाने, १ कप कडुलिंबाची पाने, आणि १  दालचिनीचा छोटा तुकडा इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. 

नेमका घरगुती उपाय काय आहे ?

एका कढईत ५०० ग्रॅम खोबरेल तेल घ्या आणि ते मंद आचेवर गरम करायला ठेवा. आता या तेलात १ कप कडीपत्त्याची पाने आणि काही कडुलिंबाची पाने घाला. हे मिश्रण तोपर्यंत गरम करा जोपर्यंत कडीपत्ता आणि कडुलिंबाच्या पानांमधील ओलावा पूर्णपणे निघून जात नाही आणि पाने कुरकुरीत होत नाहीत. पाने नीट तळली गेल्यानंतर, त्यात १ ते २ इंचाचा दालचिनीचा तुकडा टाका आणि थोडा वेळ पुन्हा शिजवून घ्या. तेल थोडे थंड झाल्यावर ते गाळून एका स्वच्छ काचेच्या बाटलीत भरून ठेवा. डँड्रफ कमी करण्यासाठी हे तेल आठवड्यातून ३ वेळा केसांना आणि स्काल्पला लावा. तेल लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी केस स्वच्छ धुवून टाका. 

केमिकलयुक्त ब्लिच आता विसरा, फक्त १० रुपयांत घरीच तयार करा आयुर्वेदिक ब्लिच - पहिल्याच वापरात दिसेल फरक...

सुंदर साडी नेसूनही मेकअप उठून दिसत नाही? करा साडीच्या रंगानुसार परफेक्ट शेडचा मेकअप - दिसाल चारचौघीत उठून... 

केसांवर हे तेल लावण्याचे फायदे... 

१. खोबरेल तेल :- खोबरेल तेल स्काल्पला नैसर्गिक ओलावा देऊन कोरडेपणा कमी करते, ज्यामुळे कोरड्या हवेमुळे होणारा कोंडा रोखण्यास मदत होते.

२. कडीपत्त्याची पाने :- कडीपत्त्यातील पोषक घटक स्काल्पवरील डेड स्किन काढून टाकण्यास आणि केसांच्या मुळांना संसर्गापासून वाचवण्यास मदत करतात.

३. कडुलिंबाची पाने :- कडुलिंबामध्ये शक्तिशाली अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे कोंडा निर्माण करणाऱ्या बुरशीचा मुळापासून नायनाट करतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Erase Dandruff: Coconut Oil, Leaves Massage – Reduce Dandruff Woes!

Web Summary : Winter dandruff woes? Coconut oil infused with curry and neem leaves, plus cinnamon, can help. Massage this homemade oil blend onto the scalp to combat dryness, itching, and dandruff buildup effectively. Regular use promotes a healthy, dandruff-free scalp.
टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडीघरगुती उपाय