सध्याच्या धावपळीच्या जीवनात वाढते प्रदूषण, रासायनिक उत्पादनांच्या अतिवापरामुळे केस गळणे आणि त्वचा निस्तेज होणे या समस्या सामान्य झाल्या आहेत. हजारो रुपये पार्लर किंवा महागड्या कॉस्मॅटिक्सवर खर्च करतो पण त्याचा योग्य प्रकारे आपल्याला परिणाम मिळत नाही.(hair fall remedy) सततचा ताण, चुकीचा आहार, केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स आणि बदलतं हवामान याचा थेट परिणाम केसांवर होतो. अनेकजण महागडे शॅम्पू, सीरम किंवा ट्रीटमेंट्स करुनही केसगळती वाढते.(dry scalp treatment) आता टक्कलच पडते की काय? अशी भीती देखील सतावू लागते. (home remedy for hair fall)
पूर्वी आई-आजी आपल्या केसात हात घालायची तेव्हा केसांच्या एकही समस्या आपल्याला जाणवत नव्हती. अशावेळी आजी-आजोबाच्या काळापासून सगळेच करत असणारा घरगुती व साधा उपाय म्हणजे नारळाचे तेल. १० ते २० रुपयांना मिळणारे तेल केसांना योग्य पद्धतीने लावल्यास महिन्याभरात केसांची वाढ होण्यास मदत होते. तसेच केस पुन्हा दुप्पट वेगाने वाढतात.
न भिजवता, न वाटता करा जाळीदार बेन्ने डोसा; १५ मिनिटांत होईल नाश्ता, पाहा सोपी साउथ इंडियन रेसिपी
नारळाचे तेल त्वचेला खोलवर हायड्रेट करते. कोरड्या त्वचेवर लावल्यास त्वचा मऊ आणि चमकदार होते. नारळाचे तेल त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे. ते त्वचेसाठी नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते. त्याला लॉरिक अॅसिड, फॅटी अॅसिड आणि इतर अनेक पोषक घटक असतात.हे आपल्या कोरड्या त्वचेला मॉइश्चरायझ करते. तसेच केसांना खोलवर मजबूत करते. केसांतील कोंडा कमी होतो ज्यामुळे केसगळती रोखता येते. त्वचेची जळजळ आणि ऍलर्जी टाळण्यासही नारळाच्या तेलाचा उपयोग होतो.
केस मजबूत ठेवण्यासाठी कांद्याच्या रसात नारळाचे तेल मिसळून लावू शकता. आठवड्यातून एकदा या तेलाने मालिश करावी. या उपायामुळे केस गळती कमी होते आणि केसांची वाढ देखील होऊ शकते. नारळाचे तेल केसांना योग्य पद्धतीने लावल्यास केसांच्या मुळांना मजबुती मिळते.
