Join us

अमोनियायुक्त हेअर कलर्सना म्हणा नाही! मेथी दाणे, हळद, अळशीचा नॅचरल हेअर कलर - केस दिसतील काळेभोर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2025 18:17 IST

Home Remedy for Gray Hair : Home Remedy to Get Rid of Grey Hair : 1 Best Home Remedy For Premature Greying Hairs : पांढरे केस काळे करण्यासाठी कृत्रिम, आर्टिफिशियल व महागड्या उपायांपेक्षा घरगुती नैसर्गिक उपाय कधीही उत्तमच...

आजकाल कमी वयातही केस पांढरे होण्याची समस्या फारच कॉमन झाली आहे. सध्या स्त्री असो किंवा पुरुष केस अकाली पांढरे होण्याच्या समस्येने सगळेच हैराण आहेत. वाढते प्रदूषण, ताणतणाव, खाण्यापिण्याच्या चुकीच्या पद्धती आणि केमिकल्सयुक्त ब्यूटी प्रॉडक्ट्स या सगळ्यांचा कमी - अधिक परिणाम (Home Remedy for Gray Hair) आपल्या केसांवर होतो, यामुळे काहीवेळा अकाली केस (1 Best Home Remedy For Premature Greying Hairs) पिकण्याची समस्या ओढवते. पांढरे केस काळे करण्यासाठी केसांना वेगवेगळे महागडे हेअर कलर लावणे, हेअर डाय लावणे असे अनेक उपाय हमखास प्रत्येकजण एकदा ना एकदा करून पाहतोच(Home Remedy to Get Rid of Grey Hair).

बाजारात मिळणारे केमिकलयुक्त हेअर डाय तात्पुरता परिणाम दाखवतात, परंतु त्याचे दुष्परिणाम कायम केसांवर दिसू शकतात. केस गळणे, केसांची वाढ खुंटणे, केसांचा पोत बिघडणे, केसांचे नैसर्गिक सौंदर्य हरवणे असे असंख्य दुष्परिणाम केसांवर दिसू लागतात. यासाठीच, पांढरे केस काळे करण्यासाठी कृत्रिम, आर्टिफिशियल आणि महागड्या उपायांपेक्षा घरगुती नैसर्गिक उपाय करणे कधीही उत्तमच राहील. अशा घरगुती उपायांमध्ये केमिकल्स नसतात, आणि ते केसांना रंग देण्याबरोबरच पोषणही देतात. यासाठीच, पांढरे केस काळे करण्यासाठी घरच्याघरीच नैसर्गिक पदार्थांपासून हेअर कलर कसा तयार करायचा ते पाहूयात.      

साहित्य :- 

१. मेथी दाणे - १/२ कप २. अळशीच्या बिया - १/२ कप ३. हळद - १/२ कप ४. एलोवेरा जेल - १ टेबलस्पून ५. खोबरेल तेल - १ ते २ टेबलस्पून 

कृती :- 

१. सगळ्यातआधी एक लोखंडी तवा किंवा आप्पे पात्र घ्यावे. २. आता यात मेथी दाणे घालून ते हलकेच २ ते ३ मिनिटे कोरडे भाजून घ्यावेत. ३. त्यानंतर, यात अळशीच्या बिया घालून त्या देखील भाजून घ्याव्यात. ४. अळशीच्या बिया भाजून त्यांचा रंग बदलून काळा झाला की, त्यात हळद घालावी. 

रात्रभर लॅपटॉपवर काम केल्याने, डोळयांच्या पफीनेस वाढला, फक्त २ स्टीलचे चमचे करतील जादू...

५. आता सगळ्यात शेवटी हे तिन्ही जिन्नस एकत्रितपणे भाजून घ्यावेत. जोपर्यंत हे मिश्रण भाजताना त्यातून धूर येत नाही तसेच मिश्रणाचा रंग बदलून संपूर्णपणे काळा होत नाही तोपर्यंत हे भाजून घ्यावे. ६. मिश्रण भाजून झाल्यावर ते एका डिशमध्ये काढून घ्यावे. मिश्रण थोड थंड होऊ द्यावं. मिश्रण थंड झाल्यावर एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यात घेऊन ते मिक्सरमध्ये वाटून त्याची बारीक पूड करून घ्यावी.      

याचा वापर कसा करावा ? 

मेथी दाणे, अळशीच्या बिया, हळद यांच्या भाजून घेतलेल्या मिश्रणाची तयार पावडर एका बाऊलमध्ये घेऊन, त्यात प्रत्येकी १ टेबलस्पून एलोवेरा जेल, खोबरेल तेल घेऊन त्याची पातळसर पेस्ट तयार करून घ्यावी. ही पेस्ट पांढऱ्या केसांवर ब्रशच्या मदतीने लावून घ्यावी. २ तास केसांवर ही पेस्ट अशीच लावून ठेवावी.

नाकावरच्या ब्लॅकहेड्समुळे चेहरा निस्तेज दिसतो? १ सोपा उपाय - ५ मिनिटांत ब्लॅकहेड्स गायब, दुखणारही नाही...

जया बच्चन सांगतात त्यांच्या आजीचा घरगुती उपाय, उन्हात काळवंडलेल्या त्वचेसाठी खास उपाय - चेहरा चमकतो...

त्यानंतर केस स्वच्छ धुवून घ्यावेत. त्यानंतर आपण पाहू शकता की पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे झालेले असतील. या नॅचरल पद्धतीने केस काळे केल्यास पुढचे किमान ६ ते ८ महिने तरी आपले पांढरे केस दिसून येणार नाहीत. सोबतच, हा नॅचरल हेअर मास्क मेहेंदी, केमिकल्सयुक्त हेअर डाय यांच्यापेक्षा बराच काळ केसांवर टिकून राहतो.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी