Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > महागडा हेअर कलर ८ दिवसांतच फिका पडतो, हे ५ घरगुती उपाय करा, केसांचा रंग टिकेल भरपूर

महागडा हेअर कलर ८ दिवसांतच फिका पडतो, हे ५ घरगुती उपाय करा, केसांचा रंग टिकेल भरपूर

hair color care: hair color fading: home remedies for colored hair: हेअर कलर दीर्घकाळ टिकवून ठेवणाऱ्या ५ खास घरगुती ट्रिक्स.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2026 15:55 IST2026-02-05T15:54:44+5:302026-02-05T15:55:21+5:30

hair color care: hair color fading: home remedies for colored hair: हेअर कलर दीर्घकाळ टिकवून ठेवणाऱ्या ५ खास घरगुती ट्रिक्स.

home remedies to prevent hair color fading how to make hair color last longer naturally tips to maintain hair color after dyeing natural ways to protect colored hair | महागडा हेअर कलर ८ दिवसांतच फिका पडतो, हे ५ घरगुती उपाय करा, केसांचा रंग टिकेल भरपूर

महागडा हेअर कलर ८ दिवसांतच फिका पडतो, हे ५ घरगुती उपाय करा, केसांचा रंग टिकेल भरपूर

आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी आपण उत्साहाने महागडा हेअर कलर करतो. पार्लरमधून बाहेर पडताना आरशात  चमकणारे केस पाहून मन प्रसन्न होतं. (hair color care) पण दोन-तीन वेळा केस धुताच तो रंग फिका पडू लागतो आणि केसांच्या मुळाचा पोत कोरडा, निर्जीव दिसू लागतो. हजारो रुपये खर्च करूनही जर आठवडाभरातच रंग उतरू लागला, तर आपला हिरमोड होतो. (hair color fading)
केसांचा रंग लवकर जाण्यामागे प्रदूषण, चुकीचा शॅम्पू करण्याची पद्धत आणि केसांच्या पोषणाकडे होणारे दुर्लक्ष ही मुख्य कारणे असतात. आपला हेअर कलर महिनोंमहिने फ्रेश आणि चमकदार ठेवण्यासाठी महागड्या ट्रिटमेंट्सची नाही, तर स्वयंपाकघरातील काही प्रभावी घटकांची गरज आहे. हेअर कलर दीर्घकाळ टिकवून ठेवणाऱ्या ५ खास घरगुती ट्रिक्स.(home remedies for colored hair)

Mutual Feelings नंतर, आधी Mutual Funds मध्ये इन्व्हेस्ट करा! जेन झी ‘हा’ व्हायरल सल्ला ऐकेल?

1. अनेकांना केस गरम पाण्याने धुण्याची सवय असते. पण गरम पाणी केसांची छिद्रे उघडते. ज्यामुळे केसांमधील रंग लवकर निघून जातो. थंड पाण्याने केस धुतल्यास केसांची मुळे बंद होतात आणि रंग हळूहळू निघून जाण्यास मदत होते. त्यामुळे केस धुताना कोमट किंवा शक्य असल्यास थंड पाण्याचा वापर करा. 

2. बाजारात मिळणाऱ्या शाम्पूमध्ये सल्फेट आणि पॅराबेन्सचे प्रमाण जास्त असते. हे घटक केसांमधील नैसर्गिक तेल आणि रंग दोन्ही काढून टाकतात. केसांना रंग लावल्यानंतर नेहमी माइल्ड किंवा सल्फेट मुक्त शाम्पू निवडा. आठवड्यातून दोन वेळाच केस धुवा. ज्यामुळे रंग जास्त काळ टिकेल. 

3. कोरफडीचा गर हा केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करतो. हेअर केलर केल्यानंतर केस कोरडे पडतात. अशावेळी आपण ताज्या कोरफडीचा गर आणि खोबऱ्याचे तेल एकत्र करुन केसांना लावू शकतो. यानंतर ३० मिनिटांनी केस धुवा. यामुळे केसांवर थर तयार होईल जो सूर्यप्रकाश आणि धुळीपासून संरक्षण करेल. 

4. अॅपल व्हिनेगर हे केसांची पीएच पातळी संतुलित राखण्यास मदत करते. एक कप पाण्यात दोन चमचे व्हिनेगर मिसळा आणि केस धुतल्यानंतर शेवटी पाण्याने केस धुवा. यामुळे केसांना लावलेला रंग घट्ट चिकटून बसतो आणि केसांना एक वेगळी चमक येते. 

5. दही आणि मधाचा हेअर मास्क हा केसांसाठी चांगला मानला जातो. दह्यातील लॅक्टिक अॅसिड केसांची घाण स्वच्छ करते, तर मध ओलावा टिकवून ठेवते. हा मास्क लावल्याने कलर केलेले केस हायड्रेटेड राहतात आणि केसांचा रगंही जात नाही. 

 

Web Title : महंगा हेयर कलर रहेगा बरकरार, ये 5 घरेलू उपाय आजमाएं।

Web Summary : महंगा हेयर कलर जल्दी फीका पड़ जाता है? ठंडे पानी, सल्फेट-फ्री शैम्पू, एलोवेरा, एप्पल साइडर विनेगर और दही-शहद मास्क का उपयोग करके रंग को चमकदार और बालों को स्वस्थ रखें।

Web Title : Keep expensive hair color vibrant longer with these 5 home remedies.

Web Summary : Expensive hair color fades fast? Combat fading with simple home remedies. Use cool water, sulfate-free shampoo, aloe vera, apple cider vinegar, and a yogurt-honey mask to keep your color vibrant and hair healthy for longer.