Join us  

पायांवर उन्हामुळे चपलांच्या टॅनिंगचे डाग? हातही काळवंडले? २ घरगुती उपाय-पाय चमकतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2024 1:52 PM

Home Remedies For Tanned Feet : पायांचे टॅनिंग घालवण्यासाठी ‘या’ घरगुती उपायांची मदत घ्या..

उन्हाळ्यात सूर्यप्रकाश आणि गरमीमुळे त्वचेच्या संबंधित समस्या निर्माण होतात (Tanned feet). स्किन टॅन होते. शिवाय पाय काळेही पडतात (Beauty Tips). कारण उन्हाळ्यात सूर्यप्रकाश, धूळ आणि प्रदूषणामुळे पायांची त्वचा काळी पडते. त्याचबरोबर पाय काळवंडल्याने अनेकदा चारचौघात लाजिरवाणे वाटते (Skin care Tips). काळवंडलेले पायाची टॅनिंग दूर करण्यासाठी बरेच जण, ब्यूटी पार्लरमध्ये जातात.

पण स्किनवर केमिकल उत्पादनांचा वापर करण्यापेक्षा आपण, घरगुती उपायांनी देखील स्किन क्लिन करू शकता. बऱ्याचदा केमिकल उत्पादनांमुळे स्किन खराब होते. जर पाय आणि हाताची टॅनिंग घालवायची असेल तर, नैसर्गिक उत्पादनांचा वापर करा. हात-पाय दिसतील स्वच्छ(Home Remedies For Tanned Feet).

बटाटा आणि लिंबू

पायाचा काळेपणा दूर करण्यासाठी आपण बटाटा आणि लिंबूचा वापर करू शकता. मध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे असतात जे आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी उत्तम मानले जाते. तर लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी यासह इतर पोषक घटक असतात. ज्यामुळे पायाचा काळेपणा दूर होण्यास मदत होते.

लालबुंद कलिंगड बिंधास्त खाताय? त्या कलिंगडाला इंजेक्शन तर टोचलेलं नाही? जीवावर बेतेल कारण..

बटाटा आणि लिंबाचा वापर कसा करावा?

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये बटाट्याचा रस घ्या. त्यात लिंबाचा रस मिसळा. तयार पेस्ट पाय आणि हाताला लावा, आणि काही वेळासाठी मसाज करा. २० ते ३० मिनिटानंतर थंड पाण्याने पाय धुवा. या उपायांनी पायाचा काळेपणा दूर होईल.

गुलाब पाणी आणि कच्चे दूध

गुलाब पाण्यामध्ये अनेक गुणधर्म असतात. ज्याचा फायदा महिलांच्या स्किनला होतो. यासह कच्च्या दुधात क्लींजिंग एजेंट असतात. यासह अनेक पोषक घटक असतात. जे आरोग्यासोबतच त्वचेसाठीही फायदेशीर ठरते. या गोष्टींचा वापर आपण पायाचा काळेपणा दूर करण्यासाठी करू शकता.

कमी वेळात बारीक व्हायचं? न चुकता '४' प्रकारचे पदार्थ नाश्त्याला खा; ढेरी घटेल - दिसाल फिट सुडौल

गुलाब पाणी आणि कच्च्या दुधाचा वापर कसा करावा?

एका बाऊलमध्ये कच्चे दूध आणि गुलाब पाणी घालून मिक्स करा. तयार मिश्रण पायाला लावून मसाज करा. १० मिनिटानंतर पाय पाण्याने धुवा. यामुळे पायाचा काळेपणा दूर होईल.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी